Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गमत्या on गुरुवार, 04/03/2008 - 19:20
  • Log in or register to post comments
  • 10967 views

प्रतिक्रिया

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 04/03/2008 - 19:47

Permalink

माझाही असाच अनुभव आहे.

माझा पण फडतरे मिसळीचा अनुभव असाच काहीसा आहे. माझ्या कोल्हापूरकर मित्राचा फडतरे मिसळीवरचा शेरा म्हणजे ती 'सपक' असते. सपक चा अर्थ थोडक्यात म्हणजे 'अगदीच मिळमिळीत'. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 04/03/2008 - 21:03

Permalink

खरयं.....

मी ऐकलयं की फडतरे मिसळमध्ये 'साजुक तुपाची' तर्री घालतात म्हणे ? असो, कधी खाण्याचा योग मात्र नाही आला. आपला, (रामनाथप्रेमी) टिंग्या ;)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 04/04/2008 - 18:20

In reply to खरयं..... by ब्रिटिश टिंग्या

Permalink

हाहाहा ...

"मी ऐकलयं की फडतरे मिसळमध्ये 'साजुक तुपाची' तर्री घालतात म्हणे ?" हा हा हा ... चांगलं हाणलयं ... बाकी माझा पण अशा सर्व प्रसिद्ध " खाद्यपेठांचा अनुभव" नाव मोठे आणि लक्षण खोते असाच आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 04/03/2008 - 23:17

Permalink

बेडेकर मिसळ...

अगदी थेट अस्साच अनुभव मला पुण्यात बेडेकर मिसळीचा आला. अर्धा-पाऊण तास तिष्ठत राहून शेवटी नंबर लागला. पण जी चिंच - गुळाची मिसळ समोर आली ती खाल्ल्यावर बेडेकर मिसळ हे नांव माझ्या, Eating Out, ह्या लिस्ट मधून कायमचे बाद झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/04/2008 - 01:12

In reply to बेडेकर मिसळ... by प्रभाकर पेठकर

Permalink

सहमत आहे..

पण जी चिंच - गुळाची मिसळ समोर आली ती खाल्ल्यावर बेडेकर मिसळ हे नांव माझ्या, Eating Out, ह्या लिस्ट मधून कायमचे बाद झाले अगदी सहमत आहे. अलिकडेच मी रामनाथची मिसळ खाल्ली ती मात्र लै भारी होती! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 04/04/2008 - 03:46

In reply to सहमत आहे.. by विसोबा खेचर

Permalink

रामनाथची मिसळ आहेच भारी.

माझी तर अगदी खास आवडती मिसळ आहे. आणि मिसळीच्या बोर्डावार तिथे लिहीलेले असते 'जवामर्द कोल्हापूरी मिसळ'. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/04/2008 - 10:09

In reply to बेडेकर मिसळ... by प्रभाकर पेठकर

Permalink

सहमत

सहमत. कोल्हापूरात मंदिराच्या २ चौक सोडून डावीकडे चोरग्यांची मिसळ चांगली वाटली. मला श्री उपहार गृहाची आवडते. आता रामनाथची पण ट्राय करायलाच हवी!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 04/04/2008 - 11:01

Permalink

चला

पण रिक्षावाल्या काकांच्या कृपेने का होइना 'कोल्हापुरी मिसळ' खायला मिळाली, हे ही नसे थोडके. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेश दामले on Fri, 04/04/2008 - 11:32

Permalink

कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव)

असे अनुभव वरचेवर लिहा धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/04/2008 - 11:41

In reply to कोल्हापुरी मिसळ......(फसलेला अनुभव) by शैलेश दामले

Permalink

का?

खालच्या खाली का नको?
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 04/04/2008 - 11:46

In reply to का? by मनस्वी

Permalink

हा हा हा...

मनस्वी, तू म्हणजे ना... असो, शैलेश भाऊ, असे अनुभव वरचेवर लिहा म्हणताय म्हणजे? त्या गमत्यान॑ बिचार्‍यान॑ अस॑ उठसुठ फसवुन घेत, स्वतःचा पोपट करुन घेत फिरायच॑ का? (गम्मत करतोय मी! टेक इट ईझी) - (गमत्या न॑२) ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by कोल्हापुरवाले on गुरुवार, 12/06/2012 - 17:04

In reply to का? by मनस्वी

Permalink

तुमच लक्श सगल खलीच का?

तुमच लक्श सगळ खलीच का?
  • Log in or register to post comments

Submitted by गमत्या on Fri, 04/04/2008 - 11:59

Permalink

सर्वांचे आभार....

माझ्या पहिल्या लेखास दिलेल्या ऊस्फुर्त प्रतिसादाबद्द्ल आपणा सर्वांचे आभार.... पुण्यात कर्वे रोड वर कोल्हापुरी काटा किर्ररर.. नावाचे एक ठिकाण आहे (जनता बॅंकेच्या समोर विपुल स्नॅक्स च्या रांगेत) तेथे अतीशय चवीष्ट 'कोल्हापुरी मिसळ' खायला मिळाते. रामनाथच्या पेक्शाही १०० पटिने जास्त भारी..... - (गमत्या न॑१)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 04/04/2008 - 12:22

In reply to सर्वांचे आभार.... by गमत्या

Permalink

पुण्यात

पुण्यात कर्वे रोड वर कोल्हापुरी काटा किर्ररर.. जबर्‍या!!! आपल॑ एकदम फेव्हरेट ठिकाण. तिथ॑ जाऊन एकदम तिखट मिसळ घ्यायची आणि तिच्या स॑गतीला मठ्ठ्याचे ग्लासवर ग्लास !!! अरे त्याबरोबर मस्त हिरव्या मिरच्या पण हाणायच्या!!! बाकी त्या॑च्याकडे मठ्ठा इतका काही खास मिळत नाही :-(( - (मिसळ खाऊन काटा किर्रररर...) ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेश दामले on Fri, 04/04/2008 - 14:49

Permalink

मनस्वी

खालच्या खाली का नको कारण त्या खासगी असतात. मिसळ्पाव हे खालच्या गोष्टी करण्याचे व सान्गायचे स्थान नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 04/04/2008 - 14:55

Permalink

अहो दामले काका

खालच्या खाली म्हणजे सखोल, खोली असलेले, अभ्यासपूर्वक! म्हणजे काही खाजगी नई कई -- हेहे. मिसळपाववर तुम्ही कोणत्याही विषयावर दिलखुलास गप्पा मारू शकता. असे वरचेवर विचार करू नका दामले काका. हघ्या
  • Log in or register to post comments

Submitted by दिनेश५७ on Fri, 04/04/2008 - 16:48

Permalink

फडतरे

फडतरे मिसळीचा माझा अनुभव वेगळा आहे. मी जवळपास सहा महिन्यांपूर्वी, सकाळी साडेआठाच्या सुमारास, अर्धा तास रांगेत थांबून फ्डतरेंची मिसळ `चापली' होती. त्यानंतर, आजही, मुंबईत कुठेही मिसळ खाताना, त्या मिसळीच्या आठवणीने जिभेला पाणी सुटते. तेव्हा मी सकाळी कोल्हापुरात पाय ठेवताच रिक्षावाल्याला `फडतरे' एवढेच सांगितले, आणि रिक्शावाल्यानं तोंड भरून स्तुती करतच तिथपर्यंत नेऊन सोडले... पाठोपाठ तोही रांगेत उभा होता... या चर्चेत ठाण्याच्या मामलेदारच्या मिसळीची नोंद झाली नाही, तर `मिसळ्पुराण' पूर्ण होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Fri, 04/04/2008 - 17:21

Permalink

काटा

काटा किर्र् र्र ची मिसळ जितकी छान तितकाच तिथला मठ्ठा पा॑चट ! आताशा मी एक तत्व पाळतो, 'जिथे जी चीज फेमस आहे तीच खावी' अन्यथा निराशा पदरी येते..जेथे पाव-भाजी चा॑गली मिळते असा बोलबाला आहे तेथे जर पिझ्झा मागवाल तर पस्तावायचीच पाळी येते.बाकी उत्कृष्ठ मिसळ (हमखास) मिळण्याची ठिकाणे पाहा.. http://www.misalpav.com/node/683 (बर्‍याचदा पस्तावलेला) प्रसाद
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on Fri, 04/04/2008 - 17:59

Permalink

लोकमान्य

नाशिकची रविवार पेठेतील लोकमान्यची मिसळही भन्नाट. आठवली तरी पाणी सुटते. कळकट असलेल्या या हॉटेलात मळकट कपड्यातला वेटर ग्लासमध्ये हात बुडवून समोर आणून ठेवतो. पण मिसळ समोर आली की या सगळ्याकडे दुर्लक्ष होतं. नव्हे करावंच लागतं. ती मिसळ खाताना ब्रह्मानंदी टाळी लागणं किंवा समाधी लागणं नावाचं जे काही घडतं ना, तसा काहीसा अनुभव येतो, असं माझं बुवा मत आहे. वगैरे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 04/04/2008 - 20:18

In reply to लोकमान्य by भोचक

Permalink

विनोद..

वेटर ग्लासमध्ये हात बुडवून समोर आणून ठेवतो. ह्यावरून एक विनोद आठवला. एकदा एक वेटर असेच ग्लासात बोटे बुडवून पाण्याचा ग्लास आणतो. गिर्‍हाईकाला अर्थातच ते आवडत नाही. पण तो डोके शांत ठेवून वेटरला समजावून सांगतो. 'बाबारे! पिण्याच्या पाण्याअशी बोटे बुडवू नये. त्या पेक्षा ग्लास हा असा बाहेरून पकडावा.' वेटर मान्य करतो आणि त्याहून शांतपणे गिर्‍हाईकाला समजावतो. ' ठीक आहे हो. मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे ग्लास हा असा बाहेरून पकडून आणेन. पण, पाणी देणारा पोर्‍या पाण्याच्या पिंपात उभा आहे त्याचे काय?'
  • Log in or register to post comments

Submitted by कोल्हापुरवाले on गुरुवार, 12/06/2012 - 17:02

Permalink

पत्याची दुरुस्ती

गमत्या : "रमापुरी गल्ली नं. ६ " तुला राजारामपुरी गल्ली नं. ६ म्हनायच आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 12/07/2012 - 21:19

Permalink

कोल्हापुरीच्या नावावर

पुण्यात कोल्हापुरीच्या नावाखाली तिखट-जाळ असं कायबी खपवत्यात . जरा सांगा की त्यांनला, कोल्हापुरी हि एक 'चव' हाय..फकस्त तिखट खाणं म्हंजी कोल्हापुरी न्हवं.. ती ६ व्या गल्लीतली मिसळ मला बी आवडल्याली.. दही टाकुन.. अगायाया..लई भारी..
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Fri, 12/07/2012 - 22:50

Permalink

सपक, गोड इ. मिसळ.

फार्फार वर्षांपूर्वी बालगंधर्वच्या पाठीमागे (त्याच कँपस्मधे) एक उपहारगृह होते. आता आहे की नाही माहीत नाही. तिथे बरीच गोड अशी 'मस्तानी' मिसळ मिळत असे. मिसळीतले डेझर्ट म्हणता येईल अशी नाजुक डिलिशियस चव असे. गफ्रेंसोबत जाण्यास उत्तम जागा होती ;) तत्कालीण गफ्रेवंत असल्याने आनंदी (गोपाळ)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 12/08/2012 - 00:25

In reply to सपक, गोड इ. मिसळ. by आनंदी गोपाळ

Permalink

+१

+१... बालगंधर्वच्या 'मस्तानी' मिसळीसाठी... शिवाय तिथला बटाटावडाही मस्त होता. जुन्या आठवणी जाग्या केल्यात राव.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Sat, 12/08/2012 - 03:03

Permalink

ओ हे रमापुरी नक्की कुठंय

ओ हे रमापुरी नक्की कुठंय सांगा बघू. असं काही ठिकाण असल्याचं आठवत नाहिये.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com