म्हातारा बाप

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
21 Jul 2010 - 4:29 pm

त्यादीवशी थोडा excited state मधे होतो.चहा व सिगरेट पियावी म्हणून बाहेर गेलो.
दुकानाबाहेरच्या टेबलावर बसलो.
"एक चाय दे रे!"
मोबाईल वाजला.
"हॅलो"
"तुला कुठल हवय PSP 2000 की 3000?
"3000 आण..2000 नको आणु"
"ओके,घेतल्यावर फोन करतो"
"हा पण 2000 नको घेउ,बाय"
कॉल कट केला.
चहा आली.सिगरेट पेटवली.आकाशाकडे तोंड करुन धुर सोडला.तेव्हा मागुन कोणीतरी येताना दीसल.पायात नवीन कोरी स्लीपर्,त्यावर तीन चार फोल्ड्स मारलेली पँट्,कमरेतला भाग गोल्,शर्ट साफ,गोल चेहरा,पिकलेली मिशी व काळे पांढरे केस.....................एकुनच personality बघुन हसायला आल.तो चेहरा मला बघुन जबरदस्तीने हसला तेव्हा ओळखल.
"अरे मामा तुम्ही!!.......या ना,बसा."
मी उभा राहीलो,पाठीवर हात ठेवल्यासारख करुन त्यांना बसवल.
"चहा घेणार का?"
उत्तराची वाट न बघता....."और एक चाय दे रे"
मामा मला खुप वर्षांनी भेटले म्हणून न्याहाळत होते.मला बघुन परत जीवावर आल्यासारखे हसले.
"सिगरेट घेणार का?"
पुन्हा उत्तराची वाट न बघता,सिगरेट घेउन आलो.
"ही घ्या"
मामांनी सिगरेट तोंडाला लावली.मी लायटरने जळवली.
'ह माणूस कोण्?हा त्याला एवढा भाव का देतोय?' असे काहीसे चेहरे मालकाचे व चहा देणा-याचे झाले होते.म्हणुन चहा देणारा हातात ग्लास घेउन तसाच उभा होता.
"अरे येsss.........चाय ला ना!"
तसा तो मागुन पिन लागल्यासारखा टेबलापाशी आला व मामांकडे निरखुन बघायला लागला.मामांनी त्याच्याकडे पाहील व मंद हसले.तो चहावाला न हसता,तसाच मामांकडे बघत राहीला.माझी सटकली............"चाय रखा ना?...चल अब सलट!!!"
अरे कशाला ओरडतोस? : मामा
"काय मामा,खुप दीवसांनी.........उदास दीसताय,काय झाल?"
"काही नाही रे.तु कसा आहेस?"
"बस मजेत.तुम्ही बोला,खुप दीवसांनी भेटलो ना?
"हो" तुटक उत्तर.
मी जरासा वैतागलो.ती उदासिनता बोचत होती.सिगरेटचा मोठा दम मारला व धुर वर सोडला.
(ह्यावरुन माझ्या व मामाच्या संबंधांची पुसटशी कल्पना आली असावी.)
"काय झालय?कसला त्रास आहे का? सांगा,मी बघिन मदत करता आली तर..........."
'हो बोलु की नाही' असे काहीसे भाव दीसले.
"हा बोला बोला"
मामा गप्प होते.हळुच चहा पियाले.
"काहीच नाही रे,काही नाही".मामा हे बोलले व शुन्यात पाहु लागले.
"आता काय करता?"
हे एकल्यावर त्यांनी एक अंवढा गिळला.डोळे पाणावल्यासारखे झाले.
आता मी मामा स्वःताहुन काहीतरी सांगतिल म्हणुन गप्प बसलो.
मामा :तुम्ही परत काम करा बोललाय पण आता ह्या शरीराने काम नाही होत.
हे बोलुन मामा आपल्या हातांकडे बघु लागले."थकलोय रे मी खुप,जास्त वेळ उभ नाही राहवत्,चालताना त्रास होतो"
मी(थोडा रागात) : ह्या वयात तुम्हाला कोण काम करायला सांगतय?.
मामा : तेच ते...............
मामांच्या डोळ्यातुन पाणी यायला लागल.चेह-याला सवय होती,म्हणुन त्यानी काही हलचाल नाही केली.
मी ते नाही पाहु शकलो,दुसरीकडे बघुन मोठा श्वास घेतला.
मी : काय झालय ते तरी सांगाल का?
मामा : पोरानी दुस-या घरात टाकलय,बायको कटकट करते म्हणुन बाप परका झाला त्याला.काम करत होतो तेव्हा घरी नसायचो.आता काम नाही म्हणुन खाता पिता एकाव लागत"
मामांच्या चेह-यावर राग व हतबलता दोन्ही दीसल.
मी : अच्छा ...............(माझ्याकडे बोलायला काहीच नव्हत.)
मामा : ही खोली भाड्याची आहे,तुम्हाला काम मिळेपर्यंत भाडे देईन बोललाय.
मी : वॉट द ..............मी आवरत घेतल.........."हा मग?"
मामा : दहा दीवसांपासुन फीरतोय.म्हातारा म्हणुन काम नाही मिळत.
सिगरेट तशीच जळत होती........"सिगरेट पिया"........मी त्यांना रेलॅक्स व्ह्यायला वेळ दीला.
मामांनी झुरका घेतला व हाताने डोळे पुसले.
मला हे सर्व असह्य झाला होत.मी माझ कार्ड काढुन दील.
मी : तुमच्या मुलाच मन तर मी नाही वळवु शकत्,पण उद्या संध्याकाळी ह्या नंबरवर कॉल करा,मी काहीतरी करीन...चला येतो.
मला तिथुन जायच होत्,खुप अस्वस्थ वाटत होत.एका म्हाता-या माणसाच दु:ख काय असत हे कळल.
'म्हाता-या बापाला त्याचा मुलगा घराबाहेर भाड्याच्या रुममधे ठेवतो व म्हाता-याने काम करुन भाड भराव अशी अपेक्षा करतो!' हे खुप संतापजनक होत.
मी : चला येतो,उद्या नक्की कॉल करा.
अस बोलत मामांकडे न बघता चालु लागलो.भावनांना आवरण्यासाठी मोठा श्वास घेतला.तोच मोबाईल वाजला.
"अरे PSP 2000 व 3000 दोन्ही आहेत"
" 2000 घे"
अरे पण मघाशी 3000 बोललास?"
"घे यार कुठल पण..बाय"
मनात खुप गोंधळ माजला होता.आपण आईबाबांची कीतपत काळजी घेउ,ह्याचा विचार करु लागलो
व हे बापाला म्हातार वयात काम करायला सांगणारे अस का करतात,असे काही प्रश्न डोक्यात आले.काहीच उत्तर मिळाल नाही.

समाजविचार

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

21 Jul 2010 - 4:42 pm | मराठमोळा

पर्वतीजवळ कुठेतरी Working Women's hostel आहे. तिथेही बर्‍याच म्हतार्‍या स्त्रिया राहतात. मुलं महिन्याकाठी मोजके पैसे पाठवतात.
वर्ष वर्ष होऊन जातात त्यांना, कधी साधा भाजलेलं कणीस खायची ईच्छा झाली तरी जवळ पैसे नसतात म्हणुन इच्छा मारतात. तिथे राहणार्‍या माझ्या एका मैत्रिणीने त्यांची व्यथा सांगितली होती मध्यंतरी.
तिने त्यांना पाहुन कणीस घेऊन दिले त्यांच्या डोळ्यातुन पाणी वाहिलं आणी तिला भरभरुन आशिर्वाद दिला.

काही प्रश्नांना उत्तरे नसतात, शोधायला गेलं तर त्रास होतो.
मागच्या वेळी कुणीतरी असाच धागा टाकला होता, तेव्हाही मला नटसम्राट नाटकाची आठवण झाली होती आणी आजही.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 4:47 pm | यशोधरा

कठीणच आहे सगळे.. त्रासदायक आहे.. :(
केलीत का मग त्या म्हातारबाबांना मदत?

शानबा५१२'s picture

21 Jul 2010 - 6:36 pm | शानबा५१२

होय ते private chef म्हणुन काम करतात(अनुभव आहे).ज्यांच्याकडे काम करतात,ते स्वःता मोठे निधी देतात,तेव्हा मामांचे पुढचे आयुष्य बरे जाइल अस वाटत.

सहज's picture

21 Jul 2010 - 4:59 pm | सहज

कठीण आहे.

इंटरनेटस्नेही's picture

21 Jul 2010 - 5:23 pm | इंटरनेटस्नेही

चांगला आहे लेख. असेच दर्जेदार लेखन येऊ द्या.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

स्पंदना's picture

21 Jul 2010 - 6:30 pm | स्पंदना

हलल बघा मन.
आम्ही तर दुर देशी राहुन या जबाबदार्‍या झटकत तर नाही ना अस आजकाल सारख मनात येत.
आमच्या कडे तर नविनच फॅशन आहे. मुल सांभाळण्या साठी म्हणुन आई वा सासु या पैकी कोणीतरी आलच पाहिजे. माझा एकच सवाल असतो या लोकांना तुम्हाला सांभाळुन झालय ना? मग राहु दे ना त्यांना थोड मजेत, पण नाही होइल तेव्हढ राबवुन घेतात.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

आमोद शिंदे's picture

21 Jul 2010 - 6:47 pm | आमोद शिंदे

चांगला लेख. मुलाची बाजूही मांडायला हवी होती. बर्‍याचदा म्हातारे लोकही कटकटे असल्याने त्यांच्यावर अश्या वेळा येतात.
PSP 2000 म्हणाजे काय?

शानबा५१२'s picture

21 Jul 2010 - 11:12 pm | शानबा५१२

Portable Sony Playstation

३००४ घेउ नये

अरुंधती's picture

21 Jul 2010 - 10:20 pm | अरुंधती

ह्या संदर्भात कालच सकाळ वृत्तपत्रात एक बातमी वाचली... पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईनची.....

http://72.78.249.125/esakal/20100720/5309199033047152633.htm

असे उपक्रम आता सर्वच ठिकाणी सुरु करायची गरज भासू लागली आहे.

शानबा, चांगल्या विषयाला वाचा फोडलीत.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jul 2010 - 10:46 pm | बिपिन कार्यकर्ते

अरेरे!!! वाईट वाटलं.

अवांतरः शानबा लिहिते रहा असेच.

बिपिन कार्यकर्ते

शिल्पा ब's picture

21 Jul 2010 - 11:22 pm | शिल्पा ब

सुनेला आधी नीट वागवलं तर म्हातारपणी असल्या वेळा येणार नाही...कधी कधी सुना त्यांच्या माहेरच्या शिकवणीनेसुद्धा काही कारण नसताना केवळ म्हातारे नकोत म्हणून त्यांना वाईट वागणूक देतात..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

22 Jul 2010 - 11:14 am | जाई अस्सल कोल्हापुरी

.... विचार करण्यासारखी गोष्ट आहे.... !
पण इथे एक बोलाव वाटत.... कधी कधी काही वडिलधारे पण विक्षिप्तपणा करतात्....माझे एक मामा आजोबा आहेत. रिटायर्ड फोरेस्ट ऑफिसर्....दोन्ही मुल्..म्हणजे माझे मामा....अतिशय् प्रेमळ्... well settled..! त्यान्च्या बायका पण तशाच लाघवी... !
त्यामुळे कधीहि त्यान्च्या कडुन आजोबा - आजी चा अपमान होण / वाईट वागणुक मिळण शक्या नाही. नातवन्ड तर अ़क्षरश: तळ्तळ करतात की आजी आजोबानी आप्ल्या घरी रहाव म्हणुन...
पण आजोबा?......मुद्दाम वॄद्धश्रमात राह्तात......
आहे कि नाही गम्मत्?...आणि अलिकडे नाहि .....जेन्व्हा रिटायर्ड झाले ना तेन्व्हा पासुन!
...त्यामुळे कोणतहि नात जपायची जबाब्दारी दोन्हीकडे असते...

अर्धवट's picture

22 Jul 2010 - 11:21 am | अर्धवट

खरय..

आणि हे बाप-मुलाच्याच नाही तर प्रत्येक नात्यात सत्य आहे..

मी वैयक्तीक तरी दोन्ही बाजुची उदाहरण बघितलियेत..

बापाच्या सरळ स्वभावाचा फायदा घेणारा मुलगा पण बघितलाय आणि पोरगा एखाद्या मुलीशी लग्न करायचय म्हणाल्यानंतर केवळ अहंकारापोटी त्याची सर्व बाजूंनी कोंडी करणारा अडगा बाप पण पाहिलाय..

त्यामुळे हल्ली पटकन प्रतिक्रियाच देववत नाही अशा फ्यामीली म्याटरमधे..

क्रेमर's picture

22 Jul 2010 - 7:04 pm | क्रेमर

शानबांचे लेखन नेहमीच आवडते.

-(टिंबशैलीचा फॅन) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.