प्रवास
नमस्कार मंडळी,
रोजचा ऑफिसला येण्याजाण्याचा सोडला तर सर्वांना आवडतो तो म्हणजे प्रवास. लहानगं मुल सुद्धा भुर्र जायचं म्हंटल की आनंदाने उड्या मारायला लागतं. मग हा प्रवास कोणत्याही कारणाने केलेला का असेना, लग्नकार्य, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, सहल, किंवा कामानिमित्त केलेला प्रवास. प्रवासात बरोबर ४ जण असले तर मग विचारायलाच नको, नुसती धमाल, मग बरोबर घरची मंडळी असो किंवा मित्र-मैत्रिणी. आपण केलेला प्रत्येक प्रवास आपल्या मनावर एक कायमचं चित्र कोरुन जातो.
कधी कधी एकट्याने सुद्धा प्रवास करावा लागतो आणी माझ्या मते यावेळेत झोपेची वेळ सोडली तर उरलेल्या वेळात आपल्याला विचार करायला खुप सारे विषय मिळतात. आजुबाजुला असणारे ईतर प्रवासी, त्यांची वेशभुषा, आचारविचार, बोलण्याची पद्धत, दिसणं, त्यांचे संवाद, खिडकीबाहेरुन दिसणारी चांगली वाईट दृष्य एक ना हजार गोष्टी. एखाद्या रडणार्या बाळाकडे पाहुन कीव यावी, तर एखाद्या भांडकुदळ बाईकडे पाहुन एकदमच हसु यावं, एखादा संवाद ऐकुन भुतकाळात जावं तर कधी एखादा निसर्गरम्य देखावा पाहुन प्रसन्न व्हावं. बस किंवा ट्रेन एखाद्या स्टेशनवर थांबली की चहाचे दोन घोट घ्यावेत, त्या नव्या ठिकाणच्या दुधा-पाण्याची चव घ्यावी, एखाद्या अनोळख्या व्यक्तीशी हसुन २ शब्द बोलावेत, कधी जमलच तर चार टाळके जमवुन मस्त गप्पा माराव्यात. कंडक्टर किंवा ड्रायवर ला उगाच "अजुन किती लांब आहे/ किती वेळ लागेल" असे विचारावे. गाडीतल्या आतल्या बाजुला खरडलेली "संजय लव्ज शिल्पा" अशी वाक्य वाचावीत, कोरलेले बदाम, त्यातुन जाणारा बाण पाहुन हसावं. विविध रोग बरे करणार्या क्लिनिकच्या, पोट साफ करणारे चुर्ण, अस्सल सोने कुठे मिळते अशा जाहीराती पहाव्यात.
प्रवासात गमतीजमती सुद्धा खुप घडतात. अशीच माझ्याबरोबर घडलेली एक गंमत. मी कॉलेजात असताना परिक्षा संपवुन घराकडे जायला रात्रीची १२ वाजताची बस पकडली. ५ तासांचा प्रवास, परिक्षेमुळे झालेलं जागरण झालेलं. पटकन तिकिट घेऊन एका खाजगी बसमधे बसलो (खाजगी बस स्वस्त असतात ना ;) ). बसल्या बसल्या झोप लागली. मधे चहापाण्यासाठी बस थांबली. मी झोपेतच उतरलो आणी सरळ वॉशरुमकडे गेलो. परत येऊन चहा घेतला, चहा अर्धा झाला असेल, मला एकदम जाणवलं की मला बसचा नंबर, रंग काहीच लक्षात नाहीये म्हणुन. चहाचा कप तसाच फेकला, ईकडे तिकडे नजर फिरवली, २०-२५ बसेस उभ्या होत्या. माझ्या खिशात बसचं तिकिट होतं, ते बाहेर काढलं आणी प्रत्येक बसच्या जवळ जाउन ड्रायवर, क्लीनर ला तिकिट दाखवुन विचारु लागलो की हे तिकिट कोणत्या बसच आहे म्हणुन. एजंट ने दिलेलं तिकिट, कोण ओळखणार?. प्रत्येक बस मधे जाऊन शोधाशोध करु लागलो, माझी बॅग बसमधेच ठेवलेली होती आणी त्यात बर्याच महत्वाच्या गोष्टी होत्या. कोणती बस जाणारी, कोणती येणारी काही कळत नव्हतं. मला घाम फुटला. शेवटी बसेस जिथुन बाहेर निघतात तिथे जाऊन थांबलो, बाहेर जाणार्या प्रत्येक बसला थांबवुन चेक करु लागलो. एका बसमधला क्लीनर मला पाहुन ओरड्ला "ओ भाइ किधर हो, कबसे होर्न बजा रहे है. चलो जल्दी अंदर" मी बसमधे बॅग पाहुन खात्री केली. त्याने मला कसे ओळखले देव जाणे, पण मग मी मात्र कानाला खडा लावला. बसमधुन उतरताना बसचा नंबर आणी रंग काहीही झालं तरी उतरण्याआधी लक्षात ठेवीन. :D
अशीच एक छोटी गंमत. एकदा एक जाड्या विंडो सीट साठी खुप भांडला, "एजंटने मला विंडो सीट सांगुन तिकिट दिले आहे" असे म्हणुन. मला ड्रायवरने विनंती केली आणी मी माझी विंडो सीट त्याला देऊ केली. बस सुरु झाली. थोड्याच वेळात त्या विंडोसीटवर एसीचे लीक झालेले पाणी पावसासारखे गळु लागली आणी जाड्याचा अवतार पाहुन मी त्याच्यासमोरच मोठ्याने हसु लागलो. बाकीच्यांना कळताच तेही हसु लागले आणी जाड्याचे हसु झाले. =))
असा हा प्रवास, मी एक गोष्ट प्रवासात नक्की पाळतो. प्रवासात चीडचीड न करता प्रत्येक गोष्टीची मजा कशी घेता येईल हे पहावे.
तुमच्याही काही गमती जमती असतील तर ईथे सांगा. :)
प्रतिक्रिया
"जगावेगळी"
नळकांड्या
अदितीशी
बाईक आणि
येयर
हे बसचे
खिडकीवरून
अगदी हेच
अगदी
मस्त लिहीलंय रे ममो
विमानातला
प्रवासाची
टारू,
तुम्हाला
हा बॉल आत्ताच टाकायची गरज होती काय ? ;(
ममो सहमत
माननीय
अशीच एक मजा..
प्रवास आणि
पॉझिटीव्ह
अरेच्च्या!
आम्ही
४-५
काय
शी बै...
एवढ सगळ ....
आता तुम्ही
काय दोन