पुन्हा एकदा भ्रमणगाथा- १

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
27 Jun 2010 - 11:00 pm

अदिती खगोलशास्त्रीय कॉनफरन्ससाठी नेदरलँड मधील आसेन गावी येणार आणि नंतर फ्राफुमध्ये ४ दिवस राहणार असे निश्चित झाल्यापासून आमच्या भ्रमणमंडळातल्या हालचालींना वेग आला आणि "रोमांटिशं स्ट्रासं" अर्थात रोमँटिक रोड वर आमचा मोर्चा वळवायचा बेत रचला. आधी ठरले असले तरी काही अपरिहार्य कारणामुळे अभिर येऊ शकत नाही असे समजले, तरी आमच्या बेतात फारसा बदल न करण्याचे ठरवून अदितीची कॉनफरन्स (सुरु होण्याआधीच) संपवून ती फ्राफुत कधी येते याची वाट पाहू लागलो. पण तेवढ्यात अजून एक माशी शिंकली. दिनेशची एक बिझिनेस ट्रीप आडवी आली. अदितीला फ्राफु दाखवण्यासाठी दिनेश नसला तरी चालण्यासारखे होते त्यामुळे त्याला कचेरीच्या कामासाठी जाऊ देऊन मी तिला आणायला स्टेशनवर गेले. नंतरचे दोन दिवस आम्ही एवढ्या अखंड बडबडत होतो,की (सूज्ञ मिपाकरांच्या ते लक्षात आले असेलच, ) फ्रांकफुर्टातील गल्लीबोळही मिपाच्या उल्लेखाने पावन झाले आणि सतत तेच ऐकून ऐकून आईलाही मिपा आणि मिपाकरांचे , खवचे उल्लेख लक्षात यायला लागले.

जर्मनीची आर्थिक राजधानी असलेलं,युरोपातले सगळ्यात मोठे आर्थिक केंद्र असलेलं ट्रेड फेअरचं हे शहर तरीही जर्मनीतलं सगळ्यात मोठं सिटीफॉरेस्ट ह्या शहरात आहे! पुस्तकजत्रा आणि मोटारींची जत्रा हे वर्षातून एकदा येणारे धामधुमीचे दिवस.. त्या काळात हॉटेलांचे दर दुप्पट, तिप्पट होतात आणि मग येथले काहीजण आपल्याकडील जास्तीची खोली मेसंगेस्टं म्हणजे जत्रेसाठी आलेल्या लोकांना भाड्याने देतात. दुसर्‍या महायुध्दात अनेकदा बाँबहल्ल्याला बळी पडलेलं हे शहर जरी हिरवाईचं असलं तरी इतर गावांच्या मानाने सुंदरतेच्या बाबतीत जरा डावंचं आहे! पण तरीही ते माझं फ्रांकफुर्ट आहे, मला अर्थातच ते फार आवडतं. अदितीला फ्राफु दाखवण्याच्या निमित्ताने मी परत एकदा इथल्या गल्लीबोळातून भटकले. आई, मी आणि अदिती सक्काळीच भटकायला निघालो.ट्रामने भटकायला मजा येते हे अनुभवाने दोघींनाही पटले होते त्यामुळे शक्य तिथे ट्रामनेच आम्ही जात होतो. हाउप्ट बानहोफ म्हणजे फ्राफुचे मुख्य स्टेशन. आपल्या बोरीबंदराची आठवण स्टेशनाची दगडी बांधणीची,जुनी भक्कम वास्तू पाहून हटकून येतेच.

तेथून २ स्टॉप पुढे असलेल्या विली ब्रांड प्लाट्झ येथे युरोपियन सेंट्रल बँकेची बहुमजली इमारत आहे. ह्या बँकेतूनच युरोझोनची मॉनिटरी पॉलिसी ठरवली जाते. समोरच टुमदार नाट्यगृह आहे.

फ्राफुतली जुनी स्टॉक एक्स्चेंजची इमारतही पाहण्यासारखी आहेच पण येथली अजून एक पहाण्यासारखी इमारत म्हणजे माइन नदीच्या तीरावरची ही काचेची इमारत, वेस्टहाफन टॉवर आणि ह्या इमारतीची बांधणी अ‍ॅपलवाइनसाठीच्या खास पेल्यासारखी आहे हे तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य! युरोपियन मंडळी विशिष्ट पेल्यातून विशिष्ट पेय पिण्याबाबत फार काटेकोर असतात आणि ह्या खास अ‍ॅपलवाइनसाठीचा खास पेला तर असायला हवाच ना!

हेसनमध्ये सफरचंदे फार त्यामुळे सफरचंदाचे अनेकानेक प्रकारचे केक,मार्मलाडं आणि अ‍ॅपलवाइनची तितकीच प्रसिध्द! अ‍ॅपलवाइनला हेसिश भाषेत एब्बेलवाय म्हणतात आणि फ्राफु दर्शनाच्या रंगीबेरंगी ट्रामला एब्बेलवाय एक्सप्रेस असे सार्थ नाव आहे.

पुढच्याच थांब्यावर आहे रोमर/पाउलकिर्श म्हणजे सेंट पॉल चर्च. शहरातला हा महत्त्वाचा चौक. दुसर्‍या महायुध्दात येथे बरीच पडझड झाल्यामुळे येथे जुन्यानव्याचा मिलाफ दिसतो. आता हे चर्च धार्मिक कारणासाठी कमी तर प्रदर्शने आणि ख्रिसमस मार्केटासारख्या महत्त्वाच्या इव्हेंट्ससाठी जास्त प्रसिध्द आहे. तेथल्या समोरच्या मोठ्ठ्या अंगणात नाताळचा बाजार फुलतो तर एरवी त्या अंगणातले मेपल्स थकल्याभागल्या प्रवाशांवर सावली धरतात. तिथल्या पारांवर घटकाभर बसून ताजेतवाने होता येते.तेथूनच डावीकडे गेले की 'झाइल' सुरू होते. आपल्या फोर्ट भागासारखाच हा सारा शॉपिंग एरिया! येथे असलेल्या गॅलेरिया काउफहाउफ मध्ये कलात्मकतेने रचलेले जर्मन,स्वीस,फ्रेंच,बेल्जियन चॉकलेटांचे दालन प्रत्येकाला भुरळ पाडतेच, त्याला आम्ही तरी कसे अपवाद असणार?

उजव्या बाजूला गेले की मोठ्ठे मैदान आहे.बाजूची मोठी रोमरबेर्ग म्हणजे सिटीहॉलस्क्वेअरची इमारत लक्षवेधी तर आहेच पण ह्या चौकातही नाताळचा मोठ्ठा बाजार भरतो. एरवी तेथे डोंबार्‍याचे खेळ चालले असतात, पालं ठोकून फ्राफुच्या आठवणी म्हणून पोस्टकार्डे, टीशर्ट्स, कीचेन्स्, रंगवलेले बियरमग्ज, बेंबेल म्हणजे अ‍ॅपलवाइन सर्व करण्यासाठीचा खास जग इ. विकणारे विक्रेते काहीतरी आठवण घ्यायला मोहात पाडतात.

त्या दगडी अंगणात लक्ष वेधून घेतो तो न्यायदेवतेचा पुतळा! डोळ्यावर पट्टी न बांधता एका हातात समानता दर्शवणारा तराजू तर दुसर्‍या हातात चमकणारी धारदार तलवार घेतलेली ही न्यायदेवता मला नेहमीच कर्तव्यकठोरतेचे काटेकोर पालन करण्याचे प्रतीक वाटते.

त्या दगडी बांधणीच्या रस्त्यावरून उतरणीला खाली गेले की माईनचे विशाल पात्र,त्यावर डुलणार्‍या नौका,विहरणारी बदके,हंस,पाणकोंबड्या,तीरावर हिरवळीत उन्हे अंगावर घेत पहुडलेली तरुणाई, बाकड्यांवर निवांत बसलेले आजीआजोबा, खेळणारी,बागडणारी मुले, सायकली चालवणारे ,जॉगिंग करणारे उत्साही वीर असे उन्हाळ्यातले नेहमीचे दृश्य दिसले. पूलावर उभे राहून वारा खात, माइनचे विशाल पात्र नजरेत साठवत रेलून उभे राहिले की मन शांत शांत होतं जातं,असा कितीही वेळ तिथे जाऊ शकतो आणि तसेच त्या दिवशीही झालं. शेवटी तंद्री भंग करुन आम्ही एशनहाइमर टोअर ह्या १७ व्या शतकातल्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या त्या काळच्या वेशीपाशी गेलो. आता ही वेस गावाच्या मध्यात आली आहे पण अजूनही ती जुनी खूण दाखवणारं वेशीचे भक्कम प्रवेशदार तेथे दिमाखात उभे आहे.

अजून एक महत्त्वाची इमारत म्हणजे मेसटुर्म! शेंड्याशी पेन्सिलीसारखी निमुळती होत गेलेली ही इमारत युरोपातली सर्वात उंच इमारत होती आता तिची जागा कॉमर्सबँकेच्या टॉवरने घेतली आहे.

नेपोलियनच्या काळात फ्रांकफुर्ट अनेकदा फ्रेंचांनी काबीज केले, त्यांचे सैन्य जेथवर आले तो आल्टनिडचा ब्रिज आणि नेपोलियन जेथे २ रात्री राहिला तो बोलंगारो पलास्ट म्हणजे आताची इथली मामलेदार कचेरी दाखवली.

फ्रांकफुर्टातल्या अजून कितीतरी गोष्टी दाखवायच्या राहिल्या होत्या पण पावसाचा इतका जोर होता की आता घरी परतणे आवश्यक झाले.
जर्मनीत यायच्या व्हिसाला "शेंगनव्हिसा" असे नांव नसून "राकलेट व्हिसा" असे नाव आहे असे नंदनला प्रामाणिकपणे वाटते , त्यामुळे संध्याकाळी राकलेटचा बेत अपरिहार्यच होता.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

27 Jun 2010 - 11:06 pm | मस्त कलंदर

व्वा: स्वातीतै!!! मस्तच जमलीय ही पण भ्रमणगाथा!!!!
वाटच पाहात होते या लेखमालिकेची. :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शानबा५१२'s picture

27 Jun 2010 - 11:17 pm | शानबा५१२

अदिती खगोलशास्त्रीय कॉनफरन्ससाठी

- ओह्व!!!........हेवा वाटतो तुमचा पण खगोलशास्त्र व माणासाच जीवन(सामान्य माणसाच) ह्यात फारच थोडा संबंध असल्याने कींवा ह्या शास्त्राचा मानवी जीवनाशी कोणताच प्रत्यक्ष संबंध नसल्याने ह्यात मला कधी रस नाही वाटला.

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

टारझन's picture

27 Jun 2010 - 11:25 pm | टारझन

जबरा !!

छोटा डॉन's picture

27 Jun 2010 - 11:33 pm | छोटा डॉन

स्वातीताई, ते फ्रांफु पुन्हा एकदा डोळ्यासमोर आले गं.
मस्त लेखमाला आहे, चालु देत !

हाऊप्ट बॉनहाफ तर माझ्या रोजचे जायचे-यायचे स्टेशन होते.
कंपनीतुन येताना तिथे उतरले की समोरच्या मुन्शनर स्ट्रीटवरुन चालत चालत इंडियन स्टोअरमधुन शॉपिंग करायची, मदन किंवा भट्टीमधुन 'समोसे' हादडायचे व मस्त कॉफी मारुन पुन्हा ट्राममधनु रिटर्न.
तु झे "झाईल ( आम्ही त्याला झैल, सैल असे काहीही म्हणायचो, असो. ) स्ट्रीट " लिहले आहेस ते माझ्या घरापासुन चालत ५ मिनिटाच्या अंतरावर होतो, विकेंडला सॉलीड मज्जा यायची, जणु जत्राच तिकडे.
रोमर एक नंबर, त्याच्या पुढे २ स्टॉप म्हणजे 'अल्लर्हेलिगन्स्ट्रासा'ला माझे घर :)
यु-बानने आलीस की कॉन्स्टेब्लरवाका.

मस्त, पुढच्या भागाची वाट पहात आहे.
उद्या माझ्याकडचेही अजुन फोटो अपलोड करतो, ढिगाने आहेत ( त्यातले फक्त निवडक टाकावे म्हणतो ), फक्त ते जरा हुडकुन टाकावे लागतील.

------
छोटा डॉन

सुनील's picture

28 Jun 2010 - 12:04 am | सुनील

मस्त वर्णन!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

केशवसुमार's picture

28 Jun 2010 - 12:23 am | केशवसुमार

निषेध.. निषेध..
आम्हाला सोडून राकटेल खाणार्‍यां त्रिवार निषेध..
डॉनराव म्हणतात तशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. क्रिसमस मार्केट..मदन चे सामोसे आणि गुलाबजामुन........यादी मोठ्ठी आहे..
स्वातीताई लेख नेहमी प्रमाणेच उत्तम हे वे सा न..
(एक्स फ्रांफु)केशवसुमार

छोटा डॉन's picture

28 Jun 2010 - 12:31 am | छोटा डॉन

अरे हो, हे राहिलेच की.

>>निषेध.. निषेध..
>>आम्हाला सोडून राकटेल खाणार्‍यां त्रिवार निषेध..
+१, अगदी हेच म्हणतो.
केसुशेठशी तंतोतंत सहमत ...
निषेध निषेध निषेध !!!

------
छोटा डॉन

घाटावरचे भट's picture

28 Jun 2010 - 12:47 am | घाटावरचे भट

छान!!

नंदन's picture

28 Jun 2010 - 1:22 am | नंदन

फ्राफुचे फोटो आणि वर्णन मस्तच. अ‍ॅपलवाईनच्या पेल्यासारख्या इमारतीचा आणि जुन्या वेशीच्या प्रवेशद्वाराचा फोटोही खासच. लेख मात्र अचानक संपल्यासारखा वाटला; कारण 'फ्रांकफुर्टातल्या अजून कितीतरी गोष्टी दाखवायच्या राहिल्या होत्या पण पावसाचा इतका जोर होता की आता घरी परतणे आवश्यक झाले', ह्या वाक्यानंतर पुढे फक्त चौकोन दिसताहेत :p

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jun 2010 - 3:38 am | बिपिन कार्यकर्ते

हम्म!!! ठीक आहे. फार काही खास नाही... आय मीन, फार काही त्रास नाही... फोटो बघून आणि वर्णन वाचून. फक्त एक बाटली लागली, इनोची. असो.

बाय द वे, तुझ्याकडे मिपाचे नाव घेऊन कोणीही आले तरी तू ठेवून घेतेस का? जपून हो...

(देशपांडे)

रेवती's picture

28 Jun 2010 - 6:44 am | रेवती

अरे वा वा!! स्वातीताईचे पुनरागनम झाले.
स्वातीताई ष्टाईल लेख वाचून मस्त वाटलं.
लेख मस्त पण एक वाक्य खटकले.
नंतरचे दोन दिवस आम्ही एवढ्या अखंड बडबडत होतो
हेच ते वाक्य! अगं, अश्या गप्पा हाणून मला युगं लोटली.
राकलेटचे फोटू टाकले नसते तरी चालले असते, डोळ्यांना त्रास होतो.;)
पहिला फोटू ग्रेट आलाय!

रेवती

सहज's picture

28 Jun 2010 - 6:53 am | सहज

वर्णन उत्तमच की वो पडद्यामागचे सुत्रधार.

चमकणारी धारदार तलवार घेतलेली ही न्यायदेवता मला नेहमीच कर्तव्यकठोरतेचे काटेकोर पालन करण्याचे प्रतीक वाटते.

ऑ ऑ संपादकांना आहेर?

आणि हो, शेवटचा फटू राहीलाच की. वाचकांच्या सोयीसाठी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2010 - 10:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई, लेख मस्तच! ती न्यायदेवता पाहून मला माता राकलेटदेवी आठवल्या:

मज्जा आली चार दिवस! जय हो सर्कारी पांढरा हत्ती, उर्फ एयर इंडीया ज्यांच्या कृपेने मला फ्रान्कफुर्टवरूनच जावं लागलं!!
भ्रमणगाथेत आपले संवाद आणि मुख्य म्हणजे कुचाळक्या उर्फ नावं ठेवणं उर्फ गॉसिप लिहीलं नाहीस ते बरं केलंस! ;-)
देशपांडे, फ्राफुत रहायची सोय हवी असेल तर थोडंबहुत जर्मन शिकून घ्या, स्वातीताई बोलता बोलता जर्मन शब्द वापरते ते आपल्यालाच समजून घ्यावं लागतं... (पळा आता, नाहीतर पुढच्या वेळी मला फ्राफुत येंट्री मिळणार नाही!)

रेवतीताई, अखंड बडबड म्हणजे किती, तर स्वातीताईच्या आईने शेवटी छडी बाहेर काढायची ठेवली होती, नाहीतर आम्हाला एवढंच सांगायचं बाकी ठेवलं होतं, "आता बोललात तर अंगठे धरून टेबलावर उभं करेन!" शेवटीतर काकूंनाही "कोण बिपिन धन्यवाद!" इ.इ. सगळे संदर्भ समजायला लागले.

अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jun 2010 - 4:17 pm | बिपिन कार्यकर्ते

बाब्बौ!!! कसल्या ड्येंजार हायेत या तै... फोटो बघून देशपांडे घाबरले बरं का... बेत क्यान्सल.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

28 Jun 2010 - 12:23 pm | विसोबा खेचर

छान..:)

विजुभाऊ's picture

28 Jun 2010 - 12:45 pm | विजुभाऊ

लैच भारी... आख्खी इनोची नवी बाट्ली रीचवावी लागतेय बहुतेक.
अवांतरः आता पुण्याची त्यातही सदाशिव पेठ / व्हाया मंडई तुलशीबाग शनिवार पेठ / डेक्कन एक भ्रमणगाथा ल्ह्यावी म्हणतो.
चितळे /बापट/ तवकर/स्वीकार/ आपले घर/मार्झोरीन /कयानी/इंगवले वगैरे खानाखजिना लिहून जळवतोच सगळ्याना.

<img src="http://www.sdphadnis.com/sdphadnis_img_002.gif" width="202" height="100" alt="" />

जागु's picture

28 Jun 2010 - 12:52 pm | जागु

मस्तच.

राजेश घासकडवी's picture

28 Jun 2010 - 2:17 pm | राजेश घासकडवी

काय बोलणार? किती जळजळ व्यक्त करणार? शब्द अपुरे पडतात...

फ्राफुचं वर्णन छानच. अजून येऊ द्यात.

निखिल देशपांडे's picture

28 Jun 2010 - 6:27 pm | निखिल देशपांडे

लै भारी फोटो...
पुढच्या भागाची वाट पाहतोय
निखिल देशपांडे
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

प्रभो's picture

28 Jun 2010 - 7:11 pm | प्रभो

मस्तच!!!!

प्रियाली's picture

28 Jun 2010 - 7:36 pm | प्रियाली

मजा केलेली दिस्त्ये.

पुष्करिणी's picture

28 Jun 2010 - 8:25 pm | पुष्करिणी

छान वर्णन आणि फोटो.

पुष्करिणी

तुझ्या हातखंडा शैलीतला लेख छानच! :)

(खुद के साथ बातां : चला आता लवकरच 'राकलेट व्हीसा' काढावा लागणार असं दिसतंय रंगा! ;) )

रंगेन्स्टाईन

Nile's picture

28 Jun 2010 - 9:46 pm | Nile

सगळं पाहुन ठेवलेलं आहे. चुकुन माकुन फ्राफुला गेलो तर व्याजासहित वसुल करणार सांगुन ठेवतोय! ;)

-Nile

ऋषिकेश's picture

29 Jun 2010 - 1:23 am | ऋषिकेश

अदिती, राकलेट व्हीजा मिळावा म्हणून कुठल्या देवाला नवस बोलली होतीस? ;)
बाकी, फारच जळवून खाक करणारे लेखन.. असे लेखन अजून नाहि आले तरी चालेल ;) :P

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

शाल्मली's picture

3 Jul 2010 - 12:47 pm | शाल्मली

स्वाती ताई,
भ्रमणगाथेला परत एकदा सुरुवात झाल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन.. जरी तिथे प्रत्यक्ष नसलो तरी भ्रमणगाथेत तुमच्याबरोबर जरुर होतो याची खात्री आहे..
फ्राफूत येऊनही वेळेअभावी स्टाटरुंडफार्ट करता आली नाही याची आत्ता हे फोटो बघून फार रुखरुख वाटत आहे..
तू आणि अदितीनी भरपूर मजा केलेली दिसत आहे.. आता अदितीला भेटल्यावर सविस्तर वर्णन ऐकूच.. :)

लेख नेहमीप्रमाणेच प्रेक्षणीय व वाचनीय हे वे सां न ल.

--शाल्मली.

गुंडोपंत's picture

9 Jul 2010 - 6:48 pm | गुंडोपंत

भ्रमणगाथेला परत एकदा सुरुवात झालेली पाहून मस्त वाटले!
तुमच्या लेखनात जरी तिथे प्रत्यक्ष नसलो तरी तुमच्याबरोबर असल्यासारखे वाटते आहे..
फोटो असल्याने फार छान वाटते. अगदी शहरात फिरल्या सारखे.
लेख प्रेक्षणीय आणि वाचनीय आहेच

आपला
गुंडोपंत