सध्याचे वाचन - सात सक्कं त्रेचाळीस
नुकतेच किरण नगरकर यांचे "सात सक्कं त्रेचाळीस" हे पुस्तक वाचले ...
मुख्प्रुष्ठाच्या तळाशी लिहिलय - "क्या फर्क पडता है ??" आणि त्या खाली "पडता है .. ". कादंबरी ची हीच थीम आहे.
जरी कोणी म्हणलं, की "सात सक्कं त्रेचाळीस", काय फरक पडतो ? फरक पडतो ... !! "कुशांक" ला तरी पडतो ...
कुशांक चा फारसा थरारक नसणारा, इन फॅक्ट "झंड" असणारा हा जीवनपट आहे. आणि त्यात जगण एवढेच प्राप्त असते.
आशय बिशय घंटा शोधणार त्यात. माणसाचं "प्राणी" पण यात उघडं पडत. काय लिहिल आहे यात ते तुम्हीच वाचा.
ही कादंबरी वाचावी ही त्यातल्या भाषा प्रयोगात रस घेऊन. डोक गरगरून टाकणारे हे लिखाण आहे. (माझा एक मित्र वाचता वाचता १० पान संपली की डोक गरगरून झोपायचा !!) आणि अत्यंत उघडी भाषा. त्यात पुणेरी भाषाशुद्धीचा आव नाही. बर्याचदा एक-दोन शब्दांचं वाक्य! घटनांचे सेक्वेंसींग देखील असेच गुंतागुंतीचे - फ्लॅशबॅकस, जंपकट्स ...
मराठी साहित्यविश्वाने ही कादंबरी बराच काळ अपचन झाल्याप्रमाणे दूर ठेवली. आपल्या पिढीला झेपल अस वाटतय. हा सगळा इतिहास प्रस्तावनेत आहेच...परंतु प्रस्तावना कादंबरी वाचून झाल्यावर वाचा... त्याचा खरच फायदा होईल.
नक्की वाचा आणि तुमचे विचार, इंटरप्रिटेशन कळवा ...
माझ्या ब्लॉगवर विंग्रजी मधे लिहिलय या का. वर.
http://koustubhkulkarni.blogspot.com/2010/06/saat-sakkam-trechalis.html
सात सक्कं = साहित्यातला माईलस्टोन !! (केवळ मराठी म्हणले तर जी.ए. वरून मारतील मला :))
धन्यवाद !!
वाचने
2357
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
चांगली झाली आहे, कौस्तुभराव. पण अधिक विस्ताराने लिहिलंत कादंबरीबद्दल तर वाचायला आवडेल.
अवांतर - डग्लस अॅडम्सच्या 'हिचहायकर्स गाईड टू गॅलक्सी'मध्ये ४२ हे सार्या प्रश्नांचं उत्तर म्हणून येतं. शीर्षक निवडताना किरण नगरकरांच्या डोक्यात हा संदर्भ होता की काय, असा विचार मनात डोकावून गेला.
अतिअवांतर - ४२ मागची प्रेरणा शोधण्याचा एक प्रयत्न.
यावर बहुतेक एक धागा येऊन गेल्यासारखा वाटतो..इंद्रराज पवार यांनी लिहिला असावा..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
पुन्हा एकदा वादाची उबळ कशाला ? असो.
थोडे विस्तारानी लिहीले असते तर कादंबरी कळायला मदत झाली असती .
मी बर्याचदा वाचली कॉलेजला असताना पण कळली नव्हती.
ओळख