युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
24 May 2010 - 6:03 pm

युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (दोन आवृत्या)
सिच्यूऐशन: हिरो्+ हिरॉइन. दोघे बाहेर निसर्गरम्य वातावरणात आलेले आहेत.

चालः लावलेली आहे. एखाद्या वेळी युनळी वर टाकेन.

(खालील गाण्यात तो अन ती च्या जागा बदलल्या तरी काही अर्थात फरक पडत नाही. )
गाण्याच्या दुसर्‍या आवृत्तीत जाणीवपुर्वक काही बदल आहेत. त्याचाही आस्वाद घ्यावा. (लग्नपत्रिकेत नाही का लिहीत की आहेर आणू नये. जेवणाचा आस्वाद घ्यावा तसे. प्रतिसाद दिला नाही तरी चालेल पण आस्वाद घ्या.) त्यातच तो अन ती च्या जागा उदाहरणादाखल बदललेल्या आहेत.

कॅमेरा रोलींग....साँग आवृत्ती नं वन....स्टार्ट......अ‍ॅक्शन......
--------------------------------------------------

तो: चल दुर दुर दुर दुर ग जावू
ती: हो ना! मग एकमेका जाणूनी घेवू
तो: टेकडी बुटकी लांब जराशी तेथपर्यंत का जावू
ती: हो ना! दुर दुर दुर दुर रे जावू ||धृ||

तो: शितल जल हे चमके चमचम (तान(स्त्री स्वर): आआआआआआआआ)
ती: निळेच आभाळ बघ दिसे त्या निळाईतून (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)
तो: हिरवे गवततृण जणू भासे मखमल
ती: रानफुले बघ कितीक डोलती त्यातून
तो: असल्याच निसर्गी तृप्त होवोनी न्हावू

ती: हो रे! चल दुर दुर दुर दुर मग जावू ||१||

तो: कसले जग उरले आता अन कसल्या भिंती (तान(स्त्री स्वर): आआआआआआआआ)
ती: तोडोनी नच का आलो त्या आता कसली भीती (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)
तो: दुरवरी होते तेथे आभाळधरती मिलन
ती: घर दोघांचे ते क्षितीजापर्यंत असे अंगण
तो: चल वेगाने चल, थांबलीस का? आता लाग तू धावू

दोघे: चल दुर दुर दुर दुर आता जावू ||२||

---------------------------------------------------------------------

युगलगीत: चल दुर दुर दुर दुर जावू (आवृत्ती क्र. २)

ती: चल दुर दुर दुर दुर रे जावू
तो: हो ना! दुर दुर दुर दुर ग जावू
ती: टेकडी बुटकी लांब जराशी तेथपर्यंत का जावू
तो: हो ना! मग अधिकच जवळी येवू ||धृ||

ती: शितल जल हे चमके चमचम (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)
तो: निळेच आभाळ बघ त्या निळाईतून (तान(स्त्री स्वर): आआआआआआआआ)
ती: हिरवे गवततृण जणू भासे मखमल
तो: रानफुले बघ लाल पिवळी डोकावती त्यातून
ती: असल्याच निसर्गी तुडूंब आपण न्हावू

तो: हो ग! चल दुर दुर दुर दुर मग जावू ||१||

ती: कसले जग उरले आता अन कसल्या भिंती (तान(पुरूष स्वर): आआआआआआआआ)
तो: सोडोनी नच का आलो ते आता कसली भीती (तान(स्त्री स्वर): आआआआआआआआ)
ती: बघ तेथे होते तेथे आभाळधरती मिलन
तो: घर दोघांचे ते क्षितीज म्हणती सारे जन
ती: चल वेगाने चल, थांबलास का? आता लाग तू धावू

दोघे: चल दुर दुर दुर दुर आता जावू ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०५/२०१०

शृंगारप्रेमकाव्यकविताचित्रपट