विश्वास
लेखनविषय:
काव्यरस
गोड शब्द, गोड वचनं
आणि निरागस चेह-यावर
कधीच विश्वास टाकू नकोस
असं तु म्हणायचीस.
मुखवट्यांच्या चेह-यात
तुझाच एक चेहरा खरा वाटायचा,
पण कालांतरानं कळलं
तोही फसवाच.
आता तुझे स्पर्श बोलतात
आणि पाणवतात डोळे.
तेव्हा मात्र धैर्य होत नाही
तुझ्यावर,तुझ्या शब्दांवर
विश्वास ठेवायला.
वाचने
1453
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
कविता बरी वाटली मास्तर!
सत्य हे कधी कधी कल्पनेपेक्षाही अद्भूत असतं. जेव्हा ते समोर येतं, तेव्हा आपला आपल्यावरचाच विश्वास जरी नाही उडाला तरी जगावरचा विश्वास नक्कीच उडतो.
मुखवट्यांच्या चेह-यात
तुझाच एक चेहरा खरा वाटायचा,
पण कालांतरानं कळलं
तोही फसवाच.
झेंडामधील आजवर ज्यांची वाहीली पालखी, भलताच त्यांचा देव होता या ओळींची आठवण झाली.
- फटू
लेखक पावन मनाचा | साही प्रतिसाद जनाचा ||
जाणते रागें झाले वन्ही । "संजा" सुखें व्हावें पाणी ||
प्रतिसाद शस्त्रें झालें क्लेश । घ्यावा नव्या लेखाचा ध्यास ||
मिपा "प्ल्याटफार्म" "नेट" द्वारा । लेख पाडा कोज्ञानेश्वरा ||
बाबूराव, लगे रहो राव. अजूनही येवू द्या.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
बरी वाटली