असाच व्हावा शेवट माझा......

झुम्बर's picture
झुम्बर in जे न देखे रवी...
23 Apr 2010 - 10:39 am

असा यावा मृत्यू मला की वेदनांनी सुखावून जावे
आणि सुखानीही माझ्या कडे आता असूयेने पाहावे

मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे
लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे

मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे
खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे

जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी
मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी

मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब
मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब

असाच व्हावा शेवट माझा थेट भिडवा मृत्यू मला
आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला

अनुजा(स्वप्नजा)

करुणकविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Apr 2010 - 10:45 am | विसोबा खेचर

छान आहे काव्य..

तात्या.

पिंगू's picture

23 Apr 2010 - 12:04 pm | पिंगू

अबोल....

- पिंगू

निरन्जन वहालेकर's picture

23 Apr 2010 - 12:09 pm | निरन्जन वहालेकर

" मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे
लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे "

व्वा ! क्या बात है ! ! अप्रतिम कल्पना आणि काव्य ! !
शब्दान्च्या फेररचनेने सौन्दर्य अजुन खुलवता येईल असे वाटते.

मराठमोळा's picture

23 Apr 2010 - 12:14 pm | मराठमोळा

काव्य आवडले!!!

जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी
मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी

मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब
मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब

क्लास!!!!

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

राघव's picture

23 Apr 2010 - 2:32 pm | राघव

कल्पना चांगल्या आहेत. पैलू पडावे लागतील.. मग आणखी खुलेल कविता!
पु.ले.शु.

राघव

झुम्बर's picture

23 Apr 2010 - 4:03 pm | झुम्बर

आभार ,

पैलु पडायला हवे आहेतच .....
मार्ग दाखवा ....

चालोत्सुक

झुम्बर....

राजेश घासकडवी's picture

24 Apr 2010 - 4:02 am | राजेश घासकडवी

कवितेला पैलू पाडण्याबाबत माझे काही विचार.
सर्वांनी लिहिल्याप्रमाणे कविता चांगली झाली, कल्पना छान आहेत. गेयता आणि नादमयता वाढली तर खूपच फायदा होईल असं वाटतं. तुम्ही लिहिलेल्या पहिल्या ओळींचं वजन आणि 'मुसळधार...' कडव्याचं वजन वेगवेगळं आहे.
दुसरी सूचना अशी की जवळपास प्रत्येक कडव्यात मृत्यू शब्द येतो. त्याने एक प्रकारचा बटबटीतपणा येतो. त्याऐवजी नुसतं जाणं, किंवा तू एवढंच म्हटलं तर त्याची अर्थघनता वाढेल असं वाटतं.

हे माझे व्यक्तीगत विचार आहेत, तुम्हाला मान्य होतीलच असं नाही. फक्त एक वेगळा दृष्टीकोन म्हणून पहा.

असा यावा मृत्यू मला की वेदनांनी सुखावून जावे
आणि सुखानीही माझ्या कडे आता असूयेने पाहावे

असे मला तू भेटावे की सुखावून जखमांनी जावे
आनंदाच्या क्षणानिंही मज असुयेच्या डोळ्यानि पहावे

(इथे सुख या शब्दाचा द्विकार टाळला आहे. शिवाय एक लय ठेवली आहे...
टडा टडाडा डाडाडाडा टडा टडा टट डाडा डाडा... अशासारख्या वजनावर, हाताने ठेका देऊन गुणगुणता आली तर कविता जास्त लयबद्ध होते.)

मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे
लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे

अशीच मी गुणगुणता गाणे श्वास क्षणांनी गोठुन जावे
लिहिता कविता नकळत अल्लद, हळू तुझ्या मीठीत शिरावे

(दुसरी ओळ अजून पक्की करता येईल... पण मृत्यू प्रियकरासारखा यावा हे थोडं त्यात येतं. मग तुम्हाला हवं असेल तर तो कोण हे शेवटी उघड करता येईल. तसं करण्याची आवश्यकताच आहे असं नाही. )

मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे
खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे

सहज गळावे वेलीवरुनी तसे स्वत:ला सोडुन द्यावे
हुंगुन वा मी फूल सुगंधी, वासापरते विरून जावे

(इथे वाक्यांची उलटापालट केली आहे, राखऐवजी जास्त चपखल बसणारं वास हे रूपक वापरलं आहे. पहिल्या ओळीत व वरती अनुप्रास साधला आहे. तो संपूर्ण कविताभर करता आला, तर अधिक नादमय होऊ शकेल.)

जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी
मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी

(इथे लाटा बनून तू गर्जावे, किंवा साद घालावी, हे रूपक व नदीने मिळण्याचं, विलीन होण्याचं रूपक चांगलं आहे, फक्त पुन्हा मृत्यूऐवजी तू आलं तर जास्त चांगलं होईल. करून बघा)

मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब
मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब
(रूपक चांगलं, शब्दरचनेने वजन बदलता येईल...)

असाच व्हावा शेवट माझा थेट भिडवा मृत्यू मला
आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला

(इथे पुन्हा ओळी बदलून शेवटच्या दोन शब्दात 'तू' कोण हे कळलं तर प्रभावी होईल असं वाटतं. 'असाच व्हावा..' या ओळीला जवळपास वरच्या ठेक्यावर म्हणता येईल असं वजन आहे [मला ऐवजी मजला केलं तर]. तोच ठेका कविताभर जपता आला तर बघा.)

मदनबाण's picture

23 Apr 2010 - 4:33 pm | मदनबाण

वा.... अप्रतिम कविता.

मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे
खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे
क्लासच... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

मीनल's picture

23 Apr 2010 - 4:53 pm | मीनल

क्लास आहे कवितेचा आशय .
कविता खूप आवडली .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

अनिल हटेला's picture

23 Apr 2010 - 4:55 pm | अनिल हटेला

आवडली कविता......:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

sagarparadkar's picture

23 Apr 2010 - 6:37 pm | sagarparadkar

वा फारच छान ...

आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला ...

हि ओळ वचुन कविवर्य सुरेश भट यान्च्या दोन ओळि आठव्ल्या

सरणावर जाताना इतकेच मला कळले होते,
जग्ण्याने सुटका केली मरणाने छळले होते ....

प्राजु's picture

23 Apr 2010 - 11:20 pm | प्राजु

क्लास!!
मस्त लिहिले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

शुचि's picture

24 Apr 2010 - 1:22 am | शुचि

>> आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला >>
खूप छान आहे कविता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.

sur_nair's picture

24 Apr 2010 - 1:33 am | sur_nair

कल्पना खूप सुरेख आहेत. पण वाक्यरचना काहीठिकाणी जराशी तुटक, ओबड-धोबड वाटते. पुन्हा पुन्हा वाचली तर कदाचित तुम्हालाच सुचेल काय बदल करावेत. (स्पष्ट सांगितल्याचा फायदाच होईल अशी अपेक्षा बाळगतो)

अरुंधती's picture

24 Apr 2010 - 3:01 am | अरुंधती

कवितेचा आशय खूप छान आहे.....
वेगळी! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/