आज पहाटे ९ वाजता कसेबसे डोळे उघडले
आणि घाबरत घाबरत मी बाथरूम गाठले
मातृदेवातेची बडबड चिडचिड नेहमीसारखी
आज कानावर माझ्या कशी ती पडलीच नाही
उशिरा उठूनही कोणी माझ्यावर तोफ डागली नाही
टेबला वरती आई ने पोहे काढून होते ठेवले
कसेबसे कोंबून तोंडी धावत पळत कॉलेज गाठले
प्रवेश द्वारी पाहुनिया सरांची रागीट स्वारी
परत मुकाट्याने फिरवली मी माझी बापुडी सवारी
थेट मग मी लाडक्या fashion street वरी शिरले
मनसोक्त कपड्यांच्या खरेदीत बुडुनी गेले
गम्मत अशी घडली की मला सगळे फुकट मिळाले
कारण अस्तित्व माझे कुणाच्याही खिजगणितही नवते
नंतर मग मलाच माझी भीती वाटू लागली
आणि मग आईची मऊ कुशी मला आठवली
वाटले जाऊनि धावत माझे ते घर गाठावे
उबदार माझ्या घरट्यात हळूच शिरावे
तशीच आले घराजवळी तोबा गर्दी जमली होती
का कळेना डोळा सर्वांच्या अश्रुची धारा लागली होती
हळू पायरी चढोनी मी घरामध्ये प्रवेशले
आई बाबांचे चेहरे दुख्खाने होते व्याकुळले
पाहुनिया दृश्य समोरचे पाऊल माझे थिजुनी गेले
माझेच कलेवर पांढर्या वस्त्रातुनी
सामोरी माझ्या पडले होते
काल रात्री मृत्यूने अलगद मला कराल दाढेत ओढले होते
क्षणात माझ्या जगपासुनी मला क्रूरपणे तोडले होते
मूक गाळूनि मी अश्रू आई शेजारी जाऊनि बसले
मरण म्हणजे काय असते आज मला पुरते कळले....
अनुजा(स्वप्नजा)
प्रतिक्रिया
20 Apr 2010 - 5:52 pm | मीनल
सॉलिड टचिंग आहे.
वैकुंठ काय आणि हे काय ?
आताशा सर्वांनाच स्वःताचा मॄत्यू दिसायला लागला आहे की काय? नुसते तेवठेच नाही त्या नंतरचे ही !!!
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
20 Apr 2010 - 6:04 pm | टारझन
भयभित झालो :) खरोखरंच अशी कल्पना करुन पाहिली :)
- टींबर
20 Apr 2010 - 8:50 pm | शुचि
मस्त रंगवलीये. आई वडीलांवर काय दारुण दु:ख ओढवेल : ( त्याची कल्पना करून खूप वाईट वाटलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
21 Apr 2010 - 12:00 pm | झुम्बर
मन्ड्ल आभरी आहे...... :)
17 Aug 2010 - 4:01 pm | अनुप बंगाली
निशब्द झालो....