मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला पुरते कळले....

झुम्बर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आज पहाटे ९ वाजता कसेबसे डोळे उघडले आणि घाबरत घाबरत मी बाथरूम गाठले मातृदेवातेची बडबड चिडचिड नेहमीसारखी आज कानावर माझ्या कशी ती पडलीच नाही उशिरा उठूनही कोणी माझ्यावर तोफ डागली नाही टेबला वरती आई ने पोहे काढून होते ठेवले कसेबसे कोंबून तोंडी धावत पळत कॉलेज गाठले प्रवेश द्वारी पाहुनिया सरांची रागीट स्वारी परत मुकाट्याने फिरवली मी माझी बापुडी सवारी थेट मग मी लाडक्या fashion street वरी शिरले मनसोक्त कपड्यांच्या खरेदीत बुडुनी गेले गम्मत अशी घडली की मला सगळे फुकट मिळाले कारण अस्तित्व माझे कुणाच्याही खिजगणितही नवते नंतर मग मलाच माझी भीती वाटू लागली आणि मग आईची मऊ कुशी मला आठवली वाटले जाऊनि धावत माझे ते घर गाठावे उबदार माझ्या घरट्यात हळूच शिरावे तशीच आले घराजवळी तोबा गर्दी जमली होती का कळेना डोळा सर्वांच्या अश्रुची धारा लागली होती हळू पायरी चढोनी मी घरामध्ये प्रवेशले आई बाबांचे चेहरे दुख्खाने होते व्याकुळले पाहुनिया दृश्य समोरचे पाऊल माझे थिजुनी गेले माझेच कलेवर पांढर्या वस्त्रातुनी सामोरी माझ्या पडले होते काल रात्री मृत्यूने अलगद मला कराल दाढेत ओढले होते क्षणात माझ्या जगपासुनी मला क्रूरपणे तोडले होते मूक गाळूनि मी अश्रू आई शेजारी जाऊनि बसले मरण म्हणजे काय असते आज मला पुरते कळले.... अनुजा(स्वप्नजा)

वाचने 1590 वाचनखूण प्रतिक्रिया 5

मीनल 20/04/2010 - 17:52
सॉलिड टचिंग आहे. वैकुंठ काय आणि हे काय ? आताशा सर्वांनाच स्वःताचा मॄत्यू दिसायला लागला आहे की काय? नुसते तेवठेच नाही त्या नंतरचे ही !!! मीनल. http://myurmee.blogspot.com/

टारझन 20/04/2010 - 18:04
भयभित झालो :) खरोखरंच अशी कल्पना करुन पाहिली :) - टींबर

शुचि 20/04/2010 - 20:50
मस्त रंगवलीये. आई वडीलांवर काय दारुण दु:ख ओढवेल : ( त्याची कल्पना करून खूप वाईट वाटलं. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.