विडम्बन काव्य 'देवा तुझे किती सुन्दर आकाश ' वर आधारित :
नेत्या तुझा किती | भकास प्रभाग |
लुटोनी बोडका | झाला ऐसे ||१||
उजाड़ शिवार | कोरडे कालवे |
घोडे नाचविले | कागदांमाजी ||२||
भुकेली लेकरे | खंगली हो गुरे |
शेतकरी झुरे | उदासोनी ||३||
कर्जाचे डोंगर | डोईजड झाले |
रस्त्यावर आले | सारे लोक ||४||
तुम्बडी भरोनी | हाव आटपेना |
भस्म्या, क्षयरोग | माणुसकीचा ||५||
नको आता तुझी | फोल आश्वासने |
नादी न लागणे | चोरट्यान्च्या ||६||
तुझी प्रकरणे | लटके बहाणे |
भारता ग्रहणे | ग्रासियेले ||७||
--- अरुंधती कुलकर्णी
प्रतिक्रिया
9 Apr 2010 - 8:38 pm | विकास
फारच छान आणि (दुर्दैवाने) वास्तववादी...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
10 Apr 2010 - 12:15 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
10 Apr 2010 - 2:04 am | प्राजु
विकासदादा आणि बेला शी सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
10 Apr 2010 - 2:41 am | टारझन
प्राजु शी सहमत :)
भण्णाट राजकिय कविता :)
- (भ्रष्ट नेता (होता आलं नाही म्हणुन निराष असलेला) ) टारझन