Skip to main content

"नेत्यास इशारा"

लेखक अरुंधती
Published on शुक्रवार, 09/04/2010
विडम्बन काव्य 'देवा तुझे किती सुन्दर आकाश ' वर आधारित : नेत्या तुझा किती | भकास प्रभाग | लुटोनी बोडका | झाला ऐसे ||१|| उजाड़ शिवार | कोरडे कालवे | घोडे नाचविले | कागदांमाजी ||२|| भुकेली लेकरे | खंगली हो गुरे | शेतकरी झुरे | उदासोनी ||३|| कर्जाचे डोंगर | डोईजड झाले | रस्त्यावर आले | सारे लोक ||४|| तुम्बडी भरोनी | हाव आटपेना | भस्म्या, क्षयरोग | माणुसकीचा ||५|| नको आता तुझी | फोल आश्वासने | नादी न लागणे | चोरट्यान्च्या ||६|| तुझी प्रकरणे | लटके बहाणे | भारता ग्रहणे | ग्रासियेले ||७|| --- अरुंधती कुलकर्णी http://iravatik.blogspot.com/
लेखनविषय:

याद्या 1622
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

फारच छान आणि (दुर्दैवाने) वास्तववादी... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विकासदादा आणि बेला शी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

प्राजु शी सहमत :) भण्णाट राजकिय कविता :) - (भ्रष्ट नेता (होता आलं नाही म्हणुन निराष असलेला) ) टारझन