विकी-लीक्स या संस्थळाविषयी नुकतंच वाचनात आलं. गेले २-३ दिवस या संस्थळावरील खालील वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था, माध्यमं आणि इंटरनेट यांना खळबळून टाकलं:
WikiLeaks has released a classified US military video depicting the indiscriminate slaying of over a dozen people in the Iraqi suburb of New Baghdad -- including two Reuters news staff. ....The video, shot from an Apache helicopter gun-site, clearly shows the unprovoked slaying of a wounded Reuters employee and his rescuers. Two young children involved in the rescue were also seriously wounded.
"Exposing significant injustice around the world" असा वसा घेतलेलं हे संस्थळ आहे.
माध्यमांमधून मी ऐकलं की विकी-लीक्स या संस्थळावर जाऊन कुणीही अनामिकपणे (anonymously?) आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचाराविषयी / मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी पुराव्यासहित माहिती नोंदवू शकतो, म्हणजे हे whistleblowers साठी सोयीचं स्थळ आहे.
या किंवा अशा संस्थळांचा फायदा भारतातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी करून घेता येईल का? (थोडाफार या पद्दतीचा प्रयत्न तेहेलका डॉट कॉम ने आणि तत्सम काही संस्थळांनी केलेला होता हे इथे नमूद करायला हवं.)
प्रतिक्रिया
7 Apr 2010 - 9:48 pm | विकास
हे संकेतस्थळ नंतर पाहीनच. व्हिसलब्लोअसाठी पुर्वी भारतात भ्रष्ट.कॉम नावाचे संकेतस्थळ मला वाटते एन.विट्ट्ल, हे Central Vigilance Commissioner होते, त्यांनी चालू केले होते. आत्ता ते संस्थळ कुठे दिसले नाही. :-(
मात्र सिव्हीसीचे संकेतस्थळ पण उपयुक्त असू शकते असे वाटते. जितके वापरले जाईल तितके अधिक त्याचे परीणाम दृष्टीपथात येतील.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
7 Apr 2010 - 9:56 pm | मुक्तसुनीत
टेहेलका डॉट कॉमची सुद्धा आठवण आली.
7 Apr 2010 - 10:04 pm | बहुगुणी
इथे तक्रार नोंदवताना ती anonymously नोंदवता येत नाही, नाव, पत्ता वगैरे माहिती भरावीच लागते. 'साधारण' तक्रारदारांसाठी (उदा. रेल्वे प्रवासात दिसलेल्या भष्टाचाराविषयी एखाद्या प्रवाशाने तक्रार केली तर) हा मार्ग जरी सोयीचा असला तरी एखाद्या सरकारी संस्थेत/आस्थापनात काम करणार्या कर्मचार्यांना whistleblowing साठी हा (वैयक्तिक माहिती द्यावी लागण्याचा) मार्ग चांगलाच त्रासदायक ठरू शकतो याची अनेक उदाहरणं आहेत. सिव्हीसी च्याच संस्थळावरील ही आकडेवारीही पुरेशी बोलकी आहे.
7 Apr 2010 - 10:41 pm | Nile
वा! मस्त आहे हे. धन्यवाद.
7 Apr 2010 - 11:00 pm | चिरोटा
कर्नाटकात लोकायुक्त नावाचे पद आहे. हे पद राज्यस्तरावर की शहरस्तरावर आहे की माहित नाही पण पदावर येणारी व्यक्ती अतिशय प्रभावीपणे काम करताना दिसते.राज्यस्तरावरची काही महत्वाची पदे सोडली तर लोकायुक्त सरकारी सेवेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या घरावर धाड घालू शकतात्.(अगदी पोलिस संचालकाच्या घरावर पण).धाड घालण्याआधी कोणत्याही राजकारण्याची/मंत्र्याची परवानगी लोकायुक्तांना लागत नाही.थोड्क्यात हे स्वतंत्र पद आहे.
६ वर्षापूर्वी मी वाहतुक खात्यात चालणार्या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांना email पाठवला होता.रीप्लाय नाही आला पण दोन महिन्यांत त्याच भागातल्या काही आयुक्तांच्या घरावर धाड पडल्याची बातमी वाचली!
महाराष्ट्रात्/इतर शहरांमध्ये हे पद आहे का?असल्यास त्यांना काय अधिकार आहेत?
P = NP
7 Apr 2010 - 11:16 pm | बहुगुणी
इथे आहे:
त्याच दुव्यातून थोडक्यातः
- to undertake an inquiry or cause an inquiry or investigation to be made into any transaction in which a public servant working in any organisation, to which the executive control of the Government of India extends, is suspected or alleged to have acted for an improper purpose or in a corrupt manner;
- to tender independent and impartial advice to the disciplinary and other authorities in disciplinary cases, involving vigilance angle at different stages i.e. investigation, inquiry, appeal, review etc.;
7 Apr 2010 - 11:12 pm | बहुगुणी
इथे त्यांची नावे आणि पत्ते आहेत. ई-मेल्स आणि फोन क्र. असते तर आणखी उपयोग होईल.
8 Apr 2010 - 12:06 am | चिरोटा
धयवाद.चांगली माहिती.
अन्य राज्यांमध्ये/शहरांमध्ये लोकायुक्त प्रभावीपणे काम करताना दिसत नाहीत असे वाटते आहे.कदाचित राज्या-राज्यांमध्ये त्यांना वेगळे अधिकार आहेत का? मिडिया,विरोधी पक्ष,वृत्तपत्रे ह्या विषयी जनजागृती करताना दिसत नाहीत.
भेंडी
P = NP
9 Apr 2010 - 10:54 pm | सुधीर१३७
या भारतीय संकेतस्थळाचा वापर करा व आपल्या तक्रारींचे निराकरण करा. बघा आपल्या देशात काही फरक पडतो आहे का ते .....
http://pgportal.gov.in/