दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
2 Apr 2010 - 12:29 pm

ना़डीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से क्रमांक ३ भाग - १ -- किस्सा ३१ मार्चचा - दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद .

एका शंकराच्या मंदिरात उद्या जाऊन दोन दीप लावावेत. त्यानंतर अपेक्षित व्यक्ती वाटेत भेटतील.

गोपुराची वेस ओलांडताना एकदम लक्षात आले. अरे तू फक्त एकच दीप लावलास! दोन नाही! जा परत.लाऊन ये! मी पुन्हा गाभाऱ्यात पोचलो तर पुन्हा कोणीच नाही! तो पुजारी ही गायब! मी थांबून वाट पाहून ही कोणाच्या येण्याची चिन्हे दिसेनात. मी तसाच परतलो.

मी लांबून येताना पाहून नेहमी गल्ल्यावर दिसणारा मालक मोटर सायकलवरून घरी जायचे थांबवून वाटेत भेटला.

त्याच सुमारास तिकडे सर्व माध्यमातून एक बातमी झळकली होती "वैदीश्र्वरन कोईल मधील एका नाडी केंद्रवाल्याने मृत व्यक्तीचे केलेले कथन खोटे ठरले म्हणून त्याच्यावर कोर्टात फिर्याद "

माझ्या विचारांची बैठक दृढ होण्याला प्राचार्य अद्वयानंद गळतगे या ऋषी तुल्य महाभागांची वैज्ञानिक सत्यनिष्ठा व लेखणी कारणीभूत ठरली.

भाग १

उत्तर भारतातील होशियारपुरच्या किश्शाला अनेक वर्षे झाली. त्यानंतर मी हवाईदलातून निवृत्त झालो. पुण्यातील प्रतिष्ठित इंजिनियरिंग व मॅनेजमेंट कॉलेजात काही वर्षे काम केले. एक दिवस पदावरून विमुक्त ह्वावेसे वाटले. झालो.
नाडीग्रंथांवर विचार करता करता वाटू लागले की हवाईदलातील माझ्या नोकरीच्या निमित्ताने मला नाडी ग्रंथांची अभावितपणे ओळख झाली. त्यातील ताडपट्यांमधे व्यक्तीचे नाव व अन्य माहिती कूट तमिळमधे कोरून कशी येते ती लबाडीने मिळवता येते की त्यात ती खरोखरच कोरून लिहिलेली असते. याविचाराने मी नाडी ग्रंथांकडे आकर्षित झालो. शोध घेता घेता हवाईदलाच्या कामाच्या संदर्भात मला जेथे कधीच जावे वा भेटावे लागले नसते अशा इंडॉलॉजिकल संस्था, प्रतिष्ठित लायब्ररीज् , अनेक विद्वान व अनुभवी लोकांशी संपर्क झाला.मधल्या काळात अनेक महर्षींनी मला नाडी पट्यांमधून काही मार्गदर्शन केले. ते अनुभवले. विविध मंदिरांना भेटी झाल्या. अशी अनेक स्थळे, शहरे पालथी घातली ज्यांचा माझ्या काहीही संबंध नव्हता. आलेले अनुभव प्रामाणिकपणे लोकांसमोर मांडावेत असे वाटून लिहित गेलो. आधी मराठी, नंतर हिंदी, इंग्रजीत माझ्याकडून पुस्तके लिहिली गेली. तर तमिळ व नुकतेच गुजराथीमधे अनुवाद झाले. विविध ठिकाणी माझी भाषणे झाली. नियतकालिकातून लेख प्रसिद्ध झाले. प्रसिद्धी माध्यमांनी मुलाखती घेतल्या. एक वेळ अशी आली की आता मला नाडीग्रंथांबद्दल काही सांगायचे उरले नाही असे वाटू लागले.
मी नाडी ग्रंथांना पडताळून पहाताना आलेल्या अनुभवांच्या कथनांमुळे मी बावळट, भोळसट व अंनिस विरोधक असा माझ्यावर शिक्का बसला. सत्यस्थिती मात्र नेमकी याच्या उलटी होती, आहे. मी ही तितकाच विज्ञानवादी आहे जितके अन्य पुरोगामी विचारधारेचे लोक स्वतःला विवेकवादी मानतात. अंनिवाल्यांनी नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्यासाठी जे जे काम करावे असे अपेक्षित आहे ते ते प्रयोग मी प्रत्यक्ष अनेकदा करून मग मला जे वाटले ते लिहायला लेखणी उचलली. नाडीग्रंथांच्या ताडपट्टयात काही लबाडी न करता जर व्यक्तीचा माहिती १००टक्के अचुक येत असेल तर ती माझ्या विज्ञान निष्ठ विचारधारेच्या विरोधात तत्वतः जाते म्हणून मी नाकारली, दुर्लक्षिली तर त्या नाकारण्यात सत्यानिष्ठेशी प्रतारणा होत आहे असे मला लक्षात आल्यावर मी सत्यनिष्ठ असणे या शिवाय मला दुसरा पर्याय नव्हता.
माझ्या विचारांची बैठक दृढ होण्याला प्राचार्य अद्वयानंद गळतगे या ऋषी तुल्य महाभागांची वैज्ञानिक सत्यनिष्ठा व लेखणी कारणीभूत ठरली. आज हे मला मुद्दाम नमूद करावेसे वाटते. असो.
मी पदभार विमुक्त झालो. अचानक वाटले की श्री. रमणी गुरुजींच्या तांबरमजवळच्या काक भुजंदरांच्या आश्रमात जन्मदिवसाचा वार्षिक सोहळा अनुभवायला जावे. व गुरुचरित्राचे पारायण ही त्या पवित्र ठिकाणी करावे.
मी आश्रमात पोहोचलो. नंदिकेश्वराचे विवाह, काकभुजंदरांचा जन्मदिवसाचा सोहळा पंचतारांकित बड्या हॉटेलातील दक्षिणात्य पद्धतीचा रोज बदलता मेनू तिन्ही त्रिकाळ १०००-१२०० उपस्थित लोकांसाठी सलग १५ दिवस अन्नदान - भंडारा, रोज संध्याकाळी विविध बड्या गायक, वादक, नृत्यकाचे कला सादरीकरण, विविध देशातून सोहळ्यास आलेल्यां अभारतीयांना भारतीय पोषाख, साडी व कुमकूम, केसांच्या अनेक आकर्षक वेण्या, गजरे सप्रेम भेट म्हणून देण्याइतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात एकट्या रमणी गुरुजींच्या निदर्शनाखाली तो सोहळा उत्तम रितीने पार पाडला जात होता. यासाठी ऐच्छिक दानपात्र होते. कोणावरही दंडात्मक वर्गणीचा भाग नव्हता. खुद्द रमणी गुरुजी या सर्वाचे श्रेय महर्षी काकभुजंदरांच्या नाडपट्टीतून मिळणाऱ्या आदेशांना देत होते, असतात.
यामधे आणखी एक व्यक्ती पण महत्वाची व अनोखी असते. ती म्हणजे रमणी गुरुजींचा द्वितीय पुत्र श्री. शंकरजी. मात्र तेथे उपस्थित फारच थोड्या लोकांना हे माहीत होते की या काळात काकभुजंदर महर्षींचे नाडी वाचन उपस्थितांसाठी नसले तरी श्री. शंकरजींच्या मुखातून अगस्त्यार महर्षी बोलतात. तेही रात्री १२ च्या नंतर.
सोहळा नेहमीच्या थाटात संपन्न होत होता. माझे वाचनही व्यवस्थित चालू होते. एकदा कळले की आज रात्री शंकरजींचे नाडीकथन होण्याची शक्यता आहे. आम्ही रात्रीची वाट पहात होतो, ओडोमॉस अंगाला चोपडून. १२.३० च्या सुमारास सतरंज्यांची मांडामांड झाली. एका ठिकाणी शंकरजी विराजमान झाले. गायनाच्या महफिलीत मुख्य गायक जसे सरसाऊन बसतात तसे शंकरजींनी आसन ग्रहण केले.
आणि ....पं. भीमसेनजी जसे ताना घेताना हातांची आवर्तने वा हावभाव करतात तसे करत एकदम तमिळभाषेत शंकरजी बोलायला लागले. त्यांच्या धाटणीवरून ते गात होते. डोळे मिटलेले. तमिल जुनी व काव्यमय होती. ते विविक्षित एकाकडे पाहून गात वा सांगत होते असे वाटत नव्हते. ती वाणी त्यांच्या नेहमीच्या टोनची नक्कीच नव्हती. काही काही शब्द कळतायत असे वाटत होते. २० मिनिटांनी ते थांबले तेंव्हा कळले की त्या कथनातील वचने उपस्थित स्त्रियांना उद्देशून होती. आता त्यांनी परतावे, मात्र उरलेल्या पुरुषांनी आणखी काही काळ थांबायला सांगण्यात आले. स्त्रिया पांगल्या. गुरुजी उठून थोडे पाय मोकळे करून आले. तेवढ्यात गरमागरम कॉफी सर्वांना मिळाली. पुन्हा सगळे सरसाऊन बसले. आलेल्या अनुभवामुळे मी शंकरजींच्या जवळ बैठक मारली. पण मला आधीच्या जागेवर जाण्याचे अनुभवींनी सुचवले.
आता अगस्त्य महर्षी पु्हा आगमन करून शंकरजींच्या मुखातून एका एकाला उद्धेशून सांगू लागले. माझ्यावर बोटाने इंगीत करत शंकजींनी अगस्त्य कथन केले. हळु हळू सर्वांची वेळ आली. नंतर मला माझ्या संबंधी काय बोलले गेले ते सांगण्यात आले. ते थोडक्यात असे होते, " एका शंकराच्या मंदिरात उद्या जाऊन दोन दीप लावावेत. त्यानंतर अपेक्षित व्यक्ती वाटेत भेटतील. त्यांना माझ्याकडून नाडीसंबंधात मार्गदर्शन केले जाईल. नाडी ग्रंथांच्या संदर्भात माझ्यातर्फे भावी कामगिरी काय असेल याचे कथन योग्य वेळी विविध महर्षींच्या नाडीग्रंथांतून मिळेल " कथन संपले.
दुसऱ्यादिवशी मी गुरुजींचा निरोप घेऊन तिरुवन्नमलईतील शिव मंदिराला जायला लागलो. शंकरजी म्हणाले, 'अगस्ती म्हणालेत की रस्त्यावर तुला लोक भेटतील. ते कसे घडते ते मला समजून घेण्याची खूप इच्छा आहे. परत येऊन मला सांगावे'.
तिरुवन्न मलाईला हॉटेलात पोचून पारायणातील भाग वाचनात तो दिवस गेला. तोवर कानावर आले की उद्या दिनाक ३१ मार्च २००७ काही कारणानी स्टेट स्प़ॉन्सर्ड 'तमिळनाडू बंद' घोषित झाला आहे. दुसरा दिवस उजाडला.मी पहाटे उठून सहाला चहा पिण्याला गेलो तर रस्त्यावर एकही हॉटेल, दुकान टपरी उघडी नाही. मंदिराच्या समोर दाटीवाटीने बसणारे फुलवाले, इतर दुकानदार एकदम गायब होते. इतका कडकडीत बंद मी प्रथमच अनुभवत होतो. सकाळी ११ पर्यंत वाट पाहून मी मंदिरात गेलो तर शुकशुकाट. पुजारीही गायब. साध्या दोन पणत्या विकत मिळायला मारामार झाली. तेवढ्यात एक पुजारी आले. मी अर्चना करायची असल्याचे हातवार करून सांगितले. त्याने मला प्रसाद देताना मी विचारले, 'मला दोन दीप लावायचे आहेत मिळतील का?' त्याने आधी कोणीतरी लावलेल्या दोन पणत्या तेल वात घालून दिल्या. मी एक वात पेटवली. मदत म्हणून त्याने दुसरी पेटवली. दोन्ही दीप मुख्य गाभाऱ्यात लावलेले मी पाहिले. कथनाप्रमाणे काम झाले असे म्हणत मी परतलो. गोपुराची वेस ओलांडताना एकदम लक्षात आले. अरे तू फक्त एकच दीप लावलास! दोन नाही! जा परत. लाऊन ये! मी पुन्हा गाभाऱ्यात पोचलो तर पुन्हा कोणीच नाही! तो पुजारी ही गायब! मी थांबून वाट पाहून ही कोणाच्या येण्याची चिन्हे दिसेनात. मी तसाच परतलो.
एकदम मनात आले. उठावे व वैदीश्वरनकोईलच्या मंदिरात जावे. तेथे दीप लावावेत. चालत स्टँडवर आलो. एक बस नव्हती. पण अचानक जाण्याची सोय झाली. मजल दर मजल करत मी वैदीश्वरन कोईलला पोचलो. तोवर बंदचा प्रभाव संपून सर्व काही स्थिरस्थावर झाले होते. तात्काळ मंदिरात जाऊन मी भरपूर दीप लावले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. पोटात कावळे कोकलत होते. म्हणून मी एका हॉटेलाक़डे निघालो. त्याचा मालक पुर्वीचा हवाईदलातील असलेला. नेहमी गल्ल्यावर बसलेला असायचा. मी जेवायला त्याच्याक़डे आवर्जून जात असे. मी लांबून येताना पाहून नेहमी गल्ल्यावर दिसणारा मालक आज मोटर सायकलवरून घरी जायचे थांबवून वाटेत भेटला.
त्याच सुमारास तिकडे सर्व माध्यमातून एक बातमी झळकली होती "वैदीश्र्वरन कोईल मधील एका नाडी केंद्रवाल्याने मृत व्यक्तीचे केलेले कथन खोटे ठरले म्हणून त्याच्यावर कोर्टात फिर्याद "
क्रमशः पुढे चालू .....

ज्योतिषप्रतिसादमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

आळश्यांचा राजा's picture

2 Apr 2010 - 10:17 pm | आळश्यांचा राजा

मला तरी आपण भोळसट वगैरे वाटत नाहीत. प्रसिद्धीसाठी हे लिहीत असाल असेही वाटत नाही. महर्षींनी आदेश दिलेला आहे या जाणीवेतून आपण हे लिहीत असणार.

आपले स्वत:चेच शरीर कसे चालते, मन कसे चालते हेही आपल्याला नीट समजत नाही, अशा वेळी या जगात आपल्याला समजू शकतील अशाच घटना घडल्या पाहिजेत असे वाटणे चुकीचेच आहे. या ठिकाणी आपली / आपल्या या लेखनाची होत असलेली टवाळी पाहिली आहे. तरी देखील ज्या क्षमाशील वृत्तीने तुम्ही त्याला संयत उत्तरे देता, त्यावरून आपली महर्षींच्या ठायी असलेली श्रद्धा ही अनुभवांवर आधारीत आहे हे लक्षात येते.

लिहीत रहावे ही विनंती.

आळश्यांचा राजा

भूंगा's picture

3 Apr 2010 - 12:50 pm | भूंगा

श्री. ओक
विज्ञानाधारित विचारसरणीच योग्य ही पण एक अंधश्रद्धाच नव्हे काय?
विज्ञानाचे आजचे ठोकताळे कालांतरानें बदलणे वा चुकीचे ठरणे होतेच की नाही?
आमचे एक शिक्षक सांगायचे की आपण फारतर ४ मितींबद्द्ल विचार करू शकतो वा पाहू शकतो, जर आपल्याला ५/६/७ वा अनण्त मिती मधले दिसू शकले तर हे जे दिसत आहे त्यापेक्षा फारच वेगळे दिसू शकेल. तसेच विज्ञानानुसार "१००%" अस्तित्वातच नाही. त्यामुळे अंनिस वाले ज्या विज्ञानाच्या आधारावर श्रद्धेला आव्हान देत आहेत त्यात माझ्या मते कांहीच अर्थ नाही.
भुंगा

विज्ञानाधारित विचारसरणीच योग्य ही पण एक अंधश्रद्धाच नव्हे काय?

होय. प्राचार्य गळतगे त्यांना वैज्ञानिक अंधश्रद्धा म्हणतात.वाचा. त्यांचा ग्रंथ विज्ञान आणि चमत्कार
नाडी ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत