व्यवसायभिमुख शिक्षण

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जे न देखे रवी...
31 Mar 2010 - 6:02 pm

व्यवसायाभिमुख शि़क्षण
चित्रातला गुलाबाचा बुके पाहून
त्याला आठवले
तिच्या डाव्या वक्षावरचे गोंदण..
ते राहिलेच काल..
तो स्वतःशी पुटपुटला

प्रदर्शनात तिला मात्र
आवडले होते
हत्ती घोडे आणि मांजर

घरी आल्यावर ती
कामवाल्या बाईला सांगत होती
तिला आवडत ते त्याला कस पटत नाही..

"नवरा हाय म्हणून हाय सगळी कटकट
असला तरी कटकट आनि नसला तरी बी.."
फरशी पुसत बाईने उत्तर दिले.

शाळेत सहाव्या सातव्या वर्गातली मुले
सचित्र शिकत होती
नर मादी आणि
प्रजनन

व्यवसायाभिमूख शि़क्षणाचे
अवलंबन केल्याबद्दल
शिक्षणमंत्री टाळ्या घेत होते
-सोनाली जोशी

कवितासमाज

प्रतिक्रिया

शुचि's picture

31 Mar 2010 - 8:07 pm | शुचि

सुंदर ...... काहीतरी अस्फुट, अमूर्त आहे जे आवडलय या कवितेत ...... पण पकडीत येत नाहीये ......आणि तेच या कवितेच यश.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

धनंजय's picture

31 Mar 2010 - 8:22 pm | धनंजय

मुलांचे शिक्षण जीवनाभिमुख नसून व्यवसायाभिमुख! - फारच कसून खेचली आहे.

डावखुरा's picture

1 Apr 2010 - 12:30 am | डावखुरा

आता कसय नेम्की व्यवसायभिमुख शिक्षण आणि लैंगिक शिक्षण यात गफलत झाल्यासार्खी वाटते..............
पण व्यवसायभिमुख शिक्षणाचा लैंगिक शिक्षणाशी जोड्लेला उपहासात्मक संबंध थोडा मनाला बोचतो.......

"राजे!"

शुचि's picture

1 Apr 2010 - 12:49 am | शुचि

अशी गुलाबाच्या फुलांची गोंदणं, चांदणं खूप मुली करतात अमेरीकेत. त्याला त्याच्या मैत्रीणीची (जिचा व्यवसाय लैंगीक गरजा पूर्ण करणं आहे) आठवण झाली असेल का? भारतीय तर कोणी करत नाहीत गुलाबाच्या फुलांची गोंदणं.

त्या दोघांच्यात विसंवादी सूर आहेत हे तर खरच. ती (बायको) निरागस वाटते तर तो १२ घाटचं पाणी प्यालेला वाटतो.

For all i know i might be going totaly tangential.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

सुवर्णमयी's picture

1 Apr 2010 - 2:11 am | सुवर्णमयी

अमेरिकतल्या भारतीयांची नातवंड सुद्धा आता अमेरिकेतच वाढत आहेत. अमेरिकतली दुसरी पिढी अंगावर गोंदण करतांना दिसते. त्याशिवाय भारतातून आलेले काही देखील यात सह्भागी होतात.

आणखी एक म्हणजे आपल्याकडील साहित्यात श्र्रृंगारामधे शरीरावर वेगवेगळे रंगकाम करणे/मेंदी / गोंदणे याचे सुद्धा संदर्भ आहेत. त्यामुळे भारतीय असे काही करत नाहीत./ करतच नसत असे विधान करता येणार नाही.

दोघे चित्रांच्या प्रदर्शनात गेले आहेत आणि त्यावेळी कवितेत तो तिच्याच गुलाबाच्या फुलाविषयी बोलत असावी ही सुद्धा एक शक्यता आहेच ना?

कोण निरागस आहे आणि किती ते प्रत्येकाला जशी कविता कळली त्याप्रमाणे:)

डावखुरा's picture

1 Apr 2010 - 1:31 am | डावखुरा

=)) =)) =)) "राजे!"

डावखुरा's picture

1 Apr 2010 - 1:32 am | डावखुरा

=))
ती (बायको) निरागस वाटते तर तो १२ घाटचं पाणी प्यालेला वाटतो

=)) =)) =))

"राजे!"

शुचि's picture

1 Apr 2010 - 1:35 am | शुचि

=)) आता काय बोलू गुलाबाचं फूल पाहून त्याला भलतच आठवतय अन तो पुटपुटतोय काय ..... =))

आय मे बी राँग :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

चित्रा's picture

1 Apr 2010 - 5:50 am | चित्रा

शिक्षणमंत्र्यांनी कोणाला नक्की कसे व्यवसायाभिमुख केले कोणास ठाऊक?
सगळेच व्यावहारिक झालेले दिसतात.

sur_nair's picture

1 Apr 2010 - 7:24 am | sur_nair

'तो' नक्कीच कवी असला पाहिजे. चित्रातील बुके पाहून ज्याला अशा आठवणी येतात तो आणखी कोण असणार. 'जे न देखे......" वगैरे म्हणतात ते काही खोटे नाही.