फिर आया मौसम आयपीएल का !

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
15 Mar 2010 - 9:26 am

फिर आया मौसम आय पी एल का । पुन्हा एकदा धूमधडाका आय पी एलचा.

मनोरंजन का बाप …इति सोनी टिव्ही :)

पुन्हा ते तासनतास टीव्ही ला चिकटून बसणं, पुन्हा संध्याकाळच्या सगळ्या कार्यक्रमांना कात्री !! टिव्ही वर फक्त सोनी मॅक्स !! गेल्या दोन वर्षांपासून ह्या आय पी एल नं जो काही धुमाकूळ घातलाय ना की ज्याचं नाव ते ! त्या ललित मोदीला एक कडक सॅल्यूट !! त्याने हे जे काय प्रकरण सुरु केलंय त्याला खरंच तोड नाही. पैशांचा पाऊस पाडून खेळाडूंना त्याने आकर्षित केलं आणि प्रेक्षकांनाही !

मला क्रिकेटमधलं फार काही कळतं अशातला भाग नाही. पण आजूबाजूचं सगळं विश्व जेव्हा ह्या आयपीएल मधे गळ्यापर्यंत अडकलेलं असतं तेव्हा मलाही त्यात उडी मारावीच लागते. “मारलेला शॉट काय सही होता”, रनरेट कसा काढायचा, वाईड बॉल, नो बॉल, हॅट्रीक, फ्री हीट कधी मिळते, विविध देशांतल्या देखण्या खेळाडूंची नावं …… इतपत व्यवस्थित कळतं आणि इतक्या माहितीच्या जोरावर सकाळी फिरायला जाताना अगदी तावातावात चर्चाही नक्कीच करता येते. कारण तसंही बाकी सिरीयल्स बंद असल्यामुळे बोलायला काही फारसे ज्वलंत विषय नसतात

आयपीएल सुरु व्हायच्या आधी खरं तर हॉकी इतक्या प्रेमाने बघत होतो पण पहिल्या पाकिस्तानवरच्या विजयानंतर सगळ्याच मॅचेस फ्लॉप झाल्यामुळे तिकडे सेमीफायनल, फायनल ह्यात काहीच राम उरला नाही. इकडे आयपीएलच्या पहिल्याच मॅचपासून जी काय धम्माल सुरु झाली की त्यामुळे हॉकीकडे दुर्लक्ष करण्यावाचून पर्यायच उरला नाही. “फिर दिल दो हॉकी को” हे फक्त जाहिरातीतच राहिलं.

क्रिकेटबद्दल मला फार काही पुळका आहे अशातला भाग नाही. पण मुलगा आणि नवरा इतक्या आत्मीयतेने बघतात ना की अगदीच आऊट ऑफ क्राऊड फील यायला नको म्हणून बघते इतकंच ! पण एकदा का कुठलंही काम करायचं म्हटलं की झोकून द्यायचा स्वभाव !! त्यामुळे २५ एप्रिल पर्यंत आता फक्त आयपीएलच :)

पिल्लू आणि नवरा मॅच व्यवस्थित आणि शांतपणे बघत असतात पण मी बघायला लागले की माझा माझ्याही नकळत आरडाओरडा सुरु होतो. अरे, मॅच काय शांतपणे बघायची गोष्ट आहे…..?? तिकडे सचिनचं शतक होत आलं की माझी भाजी करपते, रनरेट वाढला की पोळ्या वातड होतात. युवराज च्या सिक्सरमुळे झकास मूड बनतो. इन्व्हॉल्व्ह झालं की हे असं होणारचं ना !!

आयपीएलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे “सर्वसमभाव” . सगळ्या देशांमधले खेळाडू अगदी गुण्यागोविंदाने (?) एकत्र खेळत असल्यामुळे बघायला वेगळीच मज्जा येते. सचिनमुळे “मुंबई इंडियन्स” जरी आवडती टीम असली तरी पंजाब च्या युवी ला सुद्धा झुकतं माप असतंच. धोनीमुळे चेन्नई कडे पण सॉफ्ट कॉर्नर असतोच. जयसूर्या, तेंडूलकर विकेट मिळाली की एकमेकांना मिठी मारतात, युसुफ पठानच्या झुंजार शतकानंतर शेन वॉर्न खुश होतो…हे बघायलाच किती छान वाटतं ना !! मॅच बघतांना पण काही टेन्शन नसतं. मस्तपैकी एंजॉय करता येते. सगळ्या खेळाडूंच्या खेळाचं स्वच्छ मनानं कौतुक करता येतं. हेच आहे आयपीएल चं यश !!

आता तर फक्त दोनच दिवस झालेत. झालेल्या सगळ्याच मॅचेस चुरशीच्या झाल्या आहेत. सध्या तरी युसुफ पठान जोरदार चर्चेत आहे. बघूया पुढे काय काय होतं ते…… कोणकोणते विक्रम घडतात, मोडतात, कोण जिंकतं !!

Just Watch n Enjoy !!!!

This is Jayashree from Kuwait signing off for today :)

क्रीडाप्रकटन

प्रतिक्रिया

टारझन's picture

15 Mar 2010 - 9:39 am | टारझन

आयपियेल .. बापपियेल ... पोर्गापियेल ... घरातले सगळे पियेल.. (झी सिनेअ‍ॅवॉर्ड मधलं एक वाक्य) :)

बाकी आय.पी.एल. डझंट अ‍ॅट्रॅक्ट मी सो मच !! आमच्याच लाडक्या झहीर खान ला आमचाच लाडका सेहवाग बदडतोय हे दृष्य आनंद देत नाही.

- (ब्याट्समन) टारेंद्र सेहवाग

मी-सौरभ's picture

15 Mar 2010 - 9:47 am | मी-सौरभ

पाठींबा कोणाला द्यायचा हा प्रश्न पड्लाय......

:?

-----
सौरभ विचारकर :)

मदनबाण's picture

15 Mar 2010 - 10:18 am | मदनबाण

हेच म्हणतो म्या... :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

जयवी's picture

15 Mar 2010 - 12:00 pm | जयवी

अहो इथे हेच तर खास आहे......पाठींबा कुणाला द्यायचीच गरज नाही. आपण फक्त खेळाचा आनंद लुटायचा :)

नितिन थत्ते's picture

15 Mar 2010 - 2:21 pm | नितिन थत्ते

नुसतेच चौकार षटकार मारले जातायत यात मला काही आनंद मिळत नाही. त्यामुळे २०-२० म्याच बघत नाही. :(

चांगल्या बॉलवर षटकार मारता येत नाही म्हणून असा बॉल नोबॉल ठरवण्याचा नियम लागू होईल याची वाट पाहतोय. ;)

(मेडन ओव्हरनेही तेवढाच आनंदित होणारा) नितिन थत्ते

टारझन's picture

15 Mar 2010 - 2:58 pm | टारझन

द्रविडांचे चाहते काय आपण ? द्रविडला म्हणे सगळे किपर लोक शिव्या शाप द्यायचे म्हणे .. हा म्हणे बॉलच्या बॉल किपर्स कडे सोडायचा न त्यांचे हात शेकुन लाल लाल व्ह्यायचे =))

- किरण किरमाणी

नितिन थत्ते's picture

15 Mar 2010 - 3:18 pm | नितिन थत्ते

:D गावसकरांचे पण. (६० ओव्हरमध्ये ३६ नाबाद धावा करणार्‍या).

नितिन थत्ते

विसोबा खेचर's picture

15 Mar 2010 - 3:01 pm | विसोबा खेचर

जय हो..! :)

मेघवेडा's picture

15 Mar 2010 - 3:12 pm | मेघवेडा

अरे, मॅच काय शांतपणे बघायची गोष्ट आहे…..??

सहमत! :)

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेडा!

प्राजु's picture

15 Mar 2010 - 9:01 pm | प्राजु

सह्ही लिहिले आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

नि३'s picture

16 Mar 2010 - 1:06 am | नि३

आपल्याला आपीएल मधे सर्वात जास्त काही आवडले असेल तर फेक आपीएल प्लेयर चा ब्लोग.
आणी यावेळेस हा ब्लोग.

http://realiplplayer2010.blogspot.com

---नि३.