शिवसेनेचा गुन्हा काय?

नील_गंधार's picture
नील_गंधार in काथ्याकूट
11 Mar 2010 - 12:36 pm
गाभा: 

सर्वप्रथम मी येथे हे नमुद करु इच्छितो कि मी शिवसेना ह्या पक्षाचा समर्थक/सदस्य वगैरे नाहि.
गेले काहि दिवस हवतर काहि महिनेच म्हणा,शिवसेनेवर चहुबाजुने हल्ले होताना दिसतात.
प्रसारमाध्यमे त्यातहि हिंदि/इंग्रजी माध्यमे,इतर राजकीय पक्ष,काहि मराठी वृत्तपत्रे,आयबीन नेटवर्कच्या सर्व वृत्तवाहिन्या
वगैरे मंडळि शिवसेनेच्या हात धुवुन पाठिशी लागल्याचे चित्र दिसतेय.
मुद्दा महाराष्ट्राच्या विकासाचा असो,मुंबईतील मराठी माणसाचा असो,हिंदुत्वाचा असो वा मराठीचा असो ह्या सर्वाच्या अधोगतीला
शिवसेनाच जबाबदार आहे असा सुर ही मंडळि लावत असतात.
निखिल वागळे,हेमंत देसाई,राजदीप सरदेसाई,प्रताब आसबे,राजीव खांडेकर,राजु परुळेकर, कुमार केतकर ह्यांसारखी मंडळी अगदि इमान इतबारे
शिवसेनेला लक्ष करताना आढळतात.हिंदि मिडिया तर इतर काहि बातम्या देण्यासाठी नसतील तर शिवसेना वगैरे विषय काढून बसतात.
त्यातल्या त्यात आयबीएन नेटवर्कच्या वृत्तवाहिन्यांनी शिवसेनेला संपविण्याची सुपारीच घेतलीय की काय असा
संशय येतो.परवाच्या आयबिएन लोकमत वाहिनीवरील ग्रेट भेट ह्या कार्यक्रमात देखिल श्री.पुष्पा भावे ह्यांनि असाच सुर लावला होता.
अर्थात शिवसेनेच्या काहि चुका निश्चितच असल्या पाहिजेत परंतु महारष्ट्रातला कुठलाच पक्ष धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ नाहि हे वास्तवाचे भान ह्या मंडळींना
नसावे का?
गेल्या साठ वर्षात जेमतेम ५ वर्षेच सत्तेत असणा-या ह्या पक्षाने महाराष्ट्राचे असे काय घोडे मारले आहे की ह्या पक्षाला ह्या सर्व टिकेला तोंड द्यावे लागत आहे?
राहुल गांधी व शाहरुख खान ह्यांच्याबद्दल शिवसेनेने घेतलेल्या भुमिकेबद्दल आपल्याला काय वाटते हे देखील वाचायला आवडेल.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

11 Mar 2010 - 2:57 pm | चिरोटा

मला नाही वाटत कोणी जाणून बुजुन टिका करत असेल. काँग्रेस्/राष्ट्रवादी/मनसे ह्या पक्षांवरही टिका अनेकवेळा होते.गेल्या पाच वर्षातला कारभार बघितला तर मनमोहनसिंग ह्यांचा अपवाद वगळता सर्वच व्यक्तींवर/पक्षांवर टिका झाली आहे.
शिवसेनेवर जास्त टिका होण्याचे कारण त्या पक्षातील व्यक्तींकडून वापरली जाणारी भाषा. गेल्या काही महिन्यांतली उद्धव ठाकरे ह्यांची वक्तव्ये तपासा-थोबाड फोडू,जिवंत ठेवणार नाही... एकदम बाळासाहेब इश्टाईल. ज्या व्यक्तींना समाजात स्थान आहे अशा व्यक्तींबद्दल सेनेच्या मुखपत्रात बर्‍याच वेळा अत्यंत हलकी भाषा वापरली जाते.मात्र तशीच भाषा सेनेबद्दल वापरली गेली की मग काळे फासणे,हल्ले करणे.
भेंडी
P = NP

अनामिका's picture

11 Mar 2010 - 3:49 pm | अनामिका

माझ्या मते आपण वर नमुद केलेल्या कारणांची दखल घेता सेनेची चुक एकच
पक्ष स्थापनेच्या वेळी घेतलेल्या "८०% समाजकारण व २०% राजकारण" या मुलभूत भुमिकेशी कालांतराने घेतलेली फारकत.........सेनेने समाजकारण सोडून राजकारणाच्या या दलदलीत उतरायलाच नको होते असे मनापासुन वाटू लागले आहे.अर्थात हे माझे व्यक्तिशः मत आहे.......
बाकी कुणी कितीही आग पाखड केली म्हणुन कुणी संपत नाही..........
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

तिमा's picture

11 Mar 2010 - 5:17 pm | तिमा

अगदी १००% सहमत! मूळ धोरणाशी फारकत घेतली हे मुख्य कारण! त्याशिवाय काँग्रेसला वैतागलेल्या मराठी मनाला यांचा आधार वाटत होता. पण नंतर अवाच्यासवा बेहिशोबी संपत्ती कमावणे, राडेबाजी, दादागिरी या अवगुणांमुळे यांच्यात आणि काँग्रेसमधे फरक काय असे वाटत असतानाच 'घराणेशाही' चालवून काँग्रेसमधे व आमच्यात काहीच फरक नाही हे ह्यांनी दाखवून दिले आहे.
एवढे झाल्यावर कोण समर्थन करणार ?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

कवितानागेश's picture

11 Mar 2010 - 6:43 pm | कवितानागेश

..म्हातार्या वाघाला दगड मारायला सगळेच येतात पूढे!

============
माउ

अन्या दातार's picture

11 Mar 2010 - 10:40 pm | अन्या दातार

मूळ लेखाशी सहमत.
समस्त माध्यमे शिवसेना, भाजप(त्यातही जास्तीकरुन मोदी) यांना लक्ष्य करुनच बातम्या(?) देत असतात. राजदीप सरदेसाई तर जे ओपन डिबेट वगैरे घेतो, त्यात कधीच या पक्षाच्या लोकांना बोलण्याची पुरेशी संधी देत नाही आणि इतर पक्षांची तरफदारी करतो.
शिवसेनेचा प्रभाव कमी होण्याची कारणे:
१. कार्यकर्त्यांशी तुटलेला संवाद- जेंव्हा शिवसेना जोशात होती (म्हणजे बाळासाहेबांचा काळ) तेंव्हा कोणताही कार्यकर्ता मातोश्रीवर जाऊ शकत होता; कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय! नंतर मात्र दलालांचे प्रस्थ वाढल्यावर तेथे जाणे मुश्किल तर झालेच; वर कार्यकर्त्यांचा उत्साहही कमी झाला.
२. बेताल वक्तव्ये: कोणत्याही व्यक्तिवर केलेली अवास्तव चिखलफेक

शाहरुखबद्दल जी भूमिका घेतली ती योग्यच होती. जर शाहरुखला असे वाटत असेल की पाक खेळाडूंनी आयपीएल मधे खेळावे तर त्याने बोली लावायला हवी होती. नंतर त्यांची बाजू घेण्यात काय मतलब आहे?
रॉल (राहूल) गांधीना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे कार्यकर्ते फक्त घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवत असताना केलेली पोलिस कारवाई ही नक्कीच भूषणावह नव्हती.

योगी९००'s picture

12 Mar 2010 - 12:25 am | योगी९००

मुळ लेख आणि ह्या प्रतिसादाशी सहमत..

बाळासाहेबांविषयी खूप सहानभूती वाटते....

उद्धव शिवसेना इतकी काही वाईट चालवत नाही आहे. पण चहूबाजूंनी होणार्‍या हल्ल्याने बावचळल्यासारखा वाटतोय. त्यातही घरचीच मंडळी (राज, स्मिता) अधिक...

खादाडमाऊ

नील_गंधार's picture

12 Mar 2010 - 11:14 am | नील_गंधार

उद्धव शिवसेना इतकी काही वाईट चालवत नाही आहे. पण चहूबाजूंनी होणार्‍या हल्ल्याने बावचळल्यासारखा वाटतोय. त्यातही घरचीच मंडळी (राज, स्मिता) अधिक...

अगदी हेच म्हणु इच्छितो.
कालच स्मिता ठाकरे(कि चित्रे?) ह्यांची मुलाखत पाहण्याचा योग आला.
शिवसेनेत वा ठाकरे परिवारात २३ वर्षे काढल्यानंतर ,शिवसेनेची भुमिका योग्य नसल्याचा साक्षात्कार ह्या बाईंना झालाय व आता ह्या काँग्रेस प्रवेशाच्या वाटेवर आहेत.
वास्तविक ह्यांचे आडनाव ठाकरे नसते तर ह्या बाईंनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला असता तरी ह्यांना एवढी प्रसिध्दी मिळाली नसती.

नम्रता राणे's picture

12 Mar 2010 - 1:15 pm | नम्रता राणे

स्मिता ठाकरे म्हणतात " मी शिवसेनेत कधीही नव्हते..
बाईग.. शिवसेना आणी ठाकरे या वजनदार नावामुळेच फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश मिळाला.. अन्यथा 'एक्स्ट्रा' म्हणुन जायची तरी लायकी होती का?

घर फिरलं तर घराचे वासेही फिरतात अशी सेनेची सद्यस्थिती आहे... दुसरं काय... असो...

अनामिका's picture

12 Mar 2010 - 3:05 pm | अनामिका

स्मिता ठाकरे यांच्याविषयी तर न बोललेलच बरं
त्यांनी फक्त ठाकरे आडनावापासुन फारकत घेऊन स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करावा........"खाल्ल्या घरचे वासे मोजतायत".......काँग्रेसचा अतिशय उमाळा आलाय सध्या ......राहुल सोनियांचे गोडवे गाणे सुरु झालेय ......आता बघु कधी प्रवेश करतायत काँग्रेसमधे ते?.एकदा प्रवेश झाला की वहिनीसाहेब स्टाईल एक थिल्लर व अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी मालिका .....सोनियादेवींवर देखिल प्रसवून प्रेक्षकांच्या माथी मारली नाही म्हणजे मिळवले!
बाकी प्रसारमाध्यमे तर विडा उचलल्याप्रमाणे नव्हे सुपारी घेतल्याप्रमाणे बातम्या देत आहेत.......त्याला मराठी वृत्तवाहीन्यादेखिल अपवाद नाहीत.....अतिरेक्यांना आर्थिक मदत करुन त्यांना पळुन जाण्यास मदत करणारे अबु आझमी व सलाम सारखे नेते हे राष्ट्रभक्त आणि केवळ प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करत हिंदुत्वाच व मराठीच राजकारण करणारा सेनेसारखा पक्ष हा या तथाकथित विचारवंताच्या व पत्रकारांच्या मते राष्ट्रद्रोही ठरतोय......
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

ठाकरे नाव सोड मग कोण विचारतय पाहु - परवाच न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ठाकरे आडनाव वापरता येत नाही

शाहरुखबद्दल जी भूमिका घेतली ती योग्यच होती. जर शाहरुखला असे वाटत असेल की पाक खेळाडूंनी आयपीएल मधे खेळावे तर त्याने बोली लावायला हवी होती. नंतर त्यांची बाजू घेण्यात काय मतलब आहे?
रॉल (राहूल) गांधीना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे कार्यकर्ते फक्त घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवत असताना केलेली पोलिस कारवाई ही नक्कीच भूषणावह नव्हती.

१००% सहमत
सर्वांचे फोडा व झोडा हे तंत्र सुरु आहे