झाकोळ

स्मृती's picture
स्मृती in जे न देखे रवी...
20 Feb 2010 - 11:24 am

रिक्त म्हणू की संपृक्त
मनाची ही अवस्था
शांत निवांत तृप्त
स्वस्थ अस्वस्थता..

नाविन्याची ओढ नाही
जीवनाशी तेढही नाही
मिळालं न मागता
कसली मागणीही नाही

विरक्तीचा विचारही नाही
संसाराची आसक्तीही नाही
येतो असा क्षण कधी
'मी का आहे' हा प्रश्नही नाही

स्मृती चित्रे

शांतरसकविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

20 Feb 2010 - 2:04 pm | विसोबा खेचर

मस्त कविता..!

पण शीर्षक पटले नाही..

विरक्तीचा विचारही नाही
संसाराची आसक्तीही नाही
येतो असा क्षण कधी
'मी का आहे' हा प्रश्नही नाही

असं आहे तर मग 'झाकोळ' कशाचा?

तात्या.

शुचि's picture

20 Feb 2010 - 6:14 pm | शुचि

मला कविता पटली नाही - रिक्त आणि संपृक्त या परस्पर टोकाच्या गोष्टी आहेत मग समान लक्षणं कशी दाखवतील बरे?**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

स्मृती's picture

21 Feb 2010 - 7:29 am | स्मृती

तात्या, हा मनावर काही क्षणांपुरता पसरलेला भावनांचा झाकोळ आहे म्हणून झाकोळ. कधी कधी शांतपणे बसलेलं असताना, सांसारीक कटकटी डोक्यात पिंगा घालत नसताना असे विचार मनात डोकावतात.

शुची, इथे कुठलीही समानता वगैरे दाखवायची नाहीये. हा फक्त क्षणिक विचारांचा खेळ आहे. एखाद्या दुर्मिळ अशा स्वस्थ क्षणी असं वाटतं की अरेच्चा, पुरे झालं इथे.. करायचं ते करून झालं... आणखी आपलं असं काय contribution मिळणार आहे जगाला?! तेव्हा आता पुढे निघावं ....

पण पुढच्याच क्षणी आपल्या सभोवतालचं, जबाबदाऱ्यांचं भान येतं आणि आपण मुळपदावर येतो.

स्मृती