कारे प्रिया दूर जाशी,

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
2 Feb 2010 - 7:28 pm

चिम्ब चिम्ब वाटा,
चिम्ब चिम्ब झाडे,
आसमंती मन होते,
चिम्ब चिम्ब वेडे.....

वरुण राजा आज कैसा,
धरित्रिला कुरवाळितो
सोडुनिया आकाश घरटे,
प्रिये कड़े झेपावतो.....

कारे प्रिया दूर जाशी,
अश्या चिम्ब वेळी,
दाट धुक्याचे कोंदण माझे,
अंग अंग जाळी.........

सागर लहरी

कविता