थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार
कवटाळल्या उजेडाला हाताचा आधार |
थेम्ब थेम्ब ओघळून सारे मोती गेले
वेदनेच्या सहवासाला सुख भुलले
हाताचाच माझिया माझ्यावर वार
थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार |
किती क्षण सुने गेले किती फुलले
अंतरात ओले कधी दंव भिजले
प्रेमाचा तो क्षण नेई आयुष्याच्या पार
थरथरत्या ज्योतीला अंधाराचा भार |
-- सागर लहरी ०७-१-२०१०