स्पर्धेला कंटाळून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या...हे काय चाललंय?

बहुगुणी's picture
बहुगुणी in काथ्याकूट
9 Jan 2010 - 7:15 pm
गाभा: 

गेल्या ५ दिवसांतचः
'अभ्यासाचा ताण आणि मार्कांच्या स्पर्धेला कंटाळून आत्महत्या केलेल्या विद्यार्थीः प्राजक्ता क्षत्रीय (२१, नाशिक), विनित मोरे (१७, मुंबई), वृषाली काळे (१८, पुणे), रुपाली शिंदे (१४, ठाणे), रेश्मा धोत्रे (१७, मुलुंड), धनश्री पाटील (१९, नाशिक), भजनप्रीत भुल्लर (२०, मुंबई, पवई), सुशांत पाटील (१३, दादर), नेहा सावंत (११, ठाणे).'

हे काय चाललंय?

यात माध्यमांची जबाबदारी किती? (यातली प्रत्येक बातमी दिवसातून बरेच वेळा, चघळून चघळून, नको तेवढ्या detailsमध्ये impressionable मुलांपर्यंत पोहोचवली जातेय. आधीच्या बातम्या पाहून कमकुवत मनांवर परिणाम होण्याचा डॉमिनो इफेक्ट कितपत असावा?)

पालकांची आणि शैक्षणिक संस्थांची जबाबदारी किती? शिक्षणात अतिरेकी (आणि बरेचदा कृत्रिम) स्पर्धा का नसावी यावर बर्‍याच वेळा इथे आणि इतरत्र उहापोह झालेला आहे, पण या चर्चांमधून ठोस उपाय निघायला अशा आत्महत्त्यांचीच वाट पहायला हवी का?

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2010 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माध्यमं ताळतंत्र सोडताहेत. अशा बातम्यांना प्रसिद्धी देऊ नये असे वाटते.
पण ऐकणार कोण ?

-दिलीप बिरुटे

सहमत. माध्यमांनी ठरवुन आश्या बातम्या टाळल्या तर नक्कीच बरे होईल. अन्यथा त्या बात्म्या बघणा-या निष्पाप, कोवळ्या जिवाला आयुष्य संपविण्याचा माहीत नासलेला उपाय माहीत होतो+ आपण जे करणार आहे(आत्महत्या) ते शेवटच आणि योग्य उत्तर आहे असा सोयीस्कर (गैर)समज करुन घेतला जातो.+ नकळत प्रसार माध्यमांकडुन आत्महत्येचे उद्दतीकरण होते.

आयुष्य संपविण्याआगोदर कृपया पुढील मोफत २४ तास मेंट्ल हेल्थ लाईनला एकदा तरी फोन करा ०२२-२५७०६०००. आधिक तपशीला साठी वांद्रेवालाफाउंडेशनला भेट द्यावी

उपरोक्त फोन नंबर आणि संकेतस्थळाचा प्रसार आणि प्रचार करावा ही सर्वांना कळकळीची विनंती

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण's picture

9 Jan 2010 - 9:15 pm | मदनबाण

ताण ताण आणि ताण... शेवटी घेतला जातो "तो "निर्णय !!!
हे जग आपल्यासाठी नाहीच, असचं बहुतेक या सर्व आत्महत्या करणार्‍या मुलांना वाटत असावे. :(
हे सर्व कुठेतरी थांबल पाहिजे...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

विकास's picture

9 Jan 2010 - 9:25 pm | विकास

जे घडले/घडते आहे ते दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने बातम्या चर्चा होतात, त्यावरून त्याला नक्कीच माध्यमे अशंतः जबाबदार असतील. मात्र तसे या विद्यार्थीदशेतील मुलांना वाटण्याइतके आधी काही घडले होते म्हणूनच त्यांनी अशी प्रतिक्रीया दिली असे वाटते.

३ इडीयट्स पाहीला आणि खूप दिवसांनी/वर्षांनी हिंदी आवडला. प्रत्येकाने तो चित्रपट आवर्जून पहावा असे वाटले. त्यातून खूप पॉझिटिव्ह संदेश दिला असे वाटले (विशेष करून त्यामुळे जुने "बोल बाबी बोल" हे नाटक आठवले जे शेवटी नकारात्मक घेतलेले वाटले). मात्र तरी देखील तो चित्रपट पाहून काहीजणांनी आत्महत्या केल्याचे नंतर वाचले. याचा अर्थ सरळ आहे, कावळा बसायला आणि फांदी मोडायला एखाद्या प्रसंगाने गाठ पडली खरी, पण फांदी तुटायलाच आली होती.

माध्यमे ही निव्वळ माहीती पोचवण्याचे साधन आहे. ती माहीती कोण कसे घेते त्याला कारणे अनेक आहेत असे वाटते: सर्वप्रथम आई-वडील, नंतर शाळा-कॉलेजमधून शिक्षक आणि शिक्षण पद्धती. सरते शेवटी स्वतःची जबाबदारी म्हणूनपण काही असते असे वाटते. जर चांगल्या वाचनाची, कलांची, मित्राची, विचारांची - यातील किमान कसली तरी आवड असली, काही छंद असला तर कितीही डिप्रेशन मधे कोणी गेले तरी त्यातून एकवेळ तात्कालीक निष्क्रियता येऊ शकेल, काही पण आत्महत्या करण्याचे विचार देखील मनात येणार नाहीत असे वाटते....

आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे संपूर्न समाज - समाजाला यातून काहीतरी धड घेऊन स्वतःसाठी (अर्थातच कलेक्टिव्हली) करावेसे वाटले पाहीजे आणी केले पाहीजे. यात सामाजीक संस्था येतात, पत्रकार, लेखक, विचारवंत अगदी राजकीय पुढारी आणि शेजारीपाजारी देखील येतात. केवळ आत्महत्या करू नका हे सांगायला नाही तर मुलांना आल्टरेनेटीव्ह सांगायला...

मधला एक काळ असा होता की हुंडाबळींनी अनेक स्त्रीयांचे महाराष्ट्रात जीव घेतले. सतत वाचायला येयचे. तेंव्हा माध्यमांनीच जागृती घडवून आणली होती. आज त्याचीच गरज नवीन पिढीसाठी आहे असे वाटते...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

नितिन थत्ते's picture

11 Jan 2010 - 11:39 am | नितिन थत्ते

>>त्यातून खूप पॉझिटिव्ह संदेश दिला असे वाटले

सहमत.

>>कावळा बसायला आणि फांदी मोडायला एखाद्या प्रसंगाने गाठ पडली खरी, पण फांदी तुटायलाच आली होती

सहमत.

>>चांगल्या वाचनाची, कलांची, मित्राची, विचारांची - यातील किमान कसली तरी आवड असली, काही छंद असला तर कितीही डिप्रेशन मधे कोणी गेले तरी त्यातून एकवेळ तात्कालीक निष्क्रियता येऊ शकेल,

सहमत. कदाचित डिप्रेशनच येणार नाही. छंदामुळे आपणही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वासही निर्माण होतो.

तू नापास झालास (किंवा ९५/९८/१०० टक्के मिळाले नाहीत) तर घराबाहेर काढीन/तोंड दाखवू नकोस वगैरे म्हणणारे पालक अनेक घरात असतील. पण ते काही खरोखर घराबाहेर काढणार नाहीत असा विश्वास मुलांना वाटू शकेल काय?
(अनेकदा बोलताना पुन्हा इथे दिसलास तर तंगडं मोडीन असे बोलले जाते. पण खरेच कोणी तंगडे मोडीत नाही!!)

बहुतेक वेळा आपला निर्णय मुलांवर लादण्याची प्रवृत्ती पालकांच्यात दिसते. तर मुलाला त्या क्षेत्राची आवड नसेल तर परिस्थिती बिकट होते. त्याचबरोबर मुलाची कुवत न ओळखता "तो हुशार आहे पण अभ्यास करीत नाही म्हणून कमी मार्क मिळाले" असे म्हणून पालक स्वतःची फसवणूक करून घेतात त्याचबरोबर मुलांचेही नुकसान करतात.

नितिन थत्ते

त्यामुळे समाजावर काही फरक पडेल असे वाटत नाही.
ज्याना आपल्या समस्या सोडवता आल्या नाहीत त्यानी ह्या आत्महत्या केल्या आहेत.त्यामुळे उगाचच शाळा व कॉलेजेस बदनाम झाली आहेत.
आत्महत्या केलेले मृतात्मे परत माणुस म्हणुन जन्माला येवु नयेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
वेताळ

स्वाती२'s picture

10 Jan 2010 - 5:22 pm | स्वाती२

मेले ते मानसिक रुग्ण होते. त्यामुळे समाजावर काही फरक पडेल असे वाटत नाही.
का? मेली ती कुणाची तरी मुले होती. निदान त्या दुर्दैवी आईबाबांसाठी नक्कीच महत्वाची होती.
दुसरे असे की मेले ते खरोखर मानसिक रुग्ण होते की तात्कालिक नैराश्य आणि आधाराचा अभाव या मुळे कोंडी झालेले दुर्दैवी जीव होते ते आपल्याला माहित नाही. पण जरी ते मानसिक रुग्ण होते असे जरी धरुन चालले तरी मानसिक अजार आहे म्हणजे जगायला नालायक हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
आत्महत्या केलेले मृतात्मे परत माणुस म्हणुन जन्माला येवु नयेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
मला तुमची फक्त कीव वाटते.

II विकास II's picture

11 Jan 2010 - 11:52 am | II विकास II

स्वातीताई शी किंचीत सहमत,
आत्महत्या केलेल्यांना आत्महत्या म्हणजे काय? हे सुध्दा नक्की माहीत नसेल?
त्यांना व त्यांच्या आई वडीलांना समुपदेशनाची गरज आहे असे वाटते.

भारतात जीवन जगण्यासाठी कमी माहीतीतील पर्याय, सरकारी पातळीवर असेलेली नागरीकीप्रती अनास्था त्यातुन उदभ्वणारी जीवघेणी स्पर्धा, आपला मुलागा/मुलगी हीच सगळ्यात पुढे राहावी हा अट्ठास ही ह्याची मुळ कारणे आहेत.

वेताळ's picture

11 Jan 2010 - 9:40 pm | वेताळ

निदान त्या दुर्दैवी आईबाबांसाठी नक्कीच महत्वाची होती.

अहो कशी का असेनात कोणतीही मुले जवळ जवळ सर्वच आईबापांना आपल्या प्राणाहुन प्रिय असतात.आपले अपत्य चांगल्या शाळेत शिकावे,त्याला चांगले कपडे मिळावेत,त्याना जीवनात चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात म्हणुन सगळे आईबाप जीवाचे रान करत असतात. दोघेही स्वःताचा विचार न करता फक्त मुलाच्या भवितव्यासाठी झटत असतात. आणि हे दिवटे सरळ सरळ त्याच्या स्वप्नावर पाणी फिरवुन आत्महत्या करतात. हे तुम्हाला तरी पटते का? त्याचे आईवडीला ह्याच्या आत्महत्येनतंर कोणत्या नरकयातना भोगत असतील ह्याची कल्पना असह्य होते. मेले ते सुटले पण त्याना जगवणारे व त्याच्या साठी कष्ट करणार्‍याचे काय?

मला तुमची फक्त कीव वाटते.

माझी किव करण्या बद्दल धन्यवाद.

फक्त कोणत्या धर्मात वा पंथात आत्महत्या हे पुण्यकर्म सांगितले आहे हे मला सांगण्याची कृपा करावी.

वेताळ

चतुरंग's picture

11 Jan 2010 - 10:35 pm | चतुरंग

अहो कशी का असेनात कोणतीही मुले जवळ जवळ सर्वच आईबापांना आपल्या प्राणाहुन प्रिय असतात.आपले अपत्य चांगल्या शाळेत शिकावे,त्याला चांगले कपडे मिळावेत,त्याना जीवनात चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात म्हणुन सगळे आईबाप जीवाचे रान करत असतात. दोघेही स्वःताचा विचार न करता फक्त मुलाच्या भवितव्यासाठी झटत असतात. आणि हे दिवटे सरळ सरळ त्याच्या स्वप्नावर पाणी फिरवुन आत्महत्या करतात. हे तुम्हाला तरी पटते का? त्याचे आईवडीला ह्याच्या आत्महत्येनतंर कोणत्या नरकयातना भोगत असतील ह्याची कल्पना असह्य होते. मेले ते सुटले पण त्याना जगवणारे व त्याच्या साठी कष्ट करणार्‍याचे काय?

तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. आपल्याला न मिळालेले सगळे मुलांना मिळावे ही आई-बापांची अपेक्षा चूक नसते.पण अपेक्षा वास्तवाकडून अवास्तवाकडे जात आहेत ह्याचे भान पालकांना नको का? मुले ही आमची मालकी हकाची संपत्ती असून ती फक्त आमची अधूरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेली आहेत अशी जर पालकांची समजूत असेल तर ती बरोबर आहे का? त्या बालकांना त्यांची स्वप्ने, त्यांचे विचार असू नयेत का? त्यांना मेहनत आणि ढोरमेहनत ह्यातला फरक समजायला नको का? कोणतीही गोष्ट आपण का करतो आहोत? ठराविक शिक्षण आपण का घेतो आहोत ह्याची थोडीतरी जाणीव नको का? हे काम कोणी करायचे आहे? सर्व गोष्टी शाळा आणि शिक्षकांवर सोडून चालत नाहीत. मुलं आधी तुमची असतात आणि मग ती समाजाची असतात त्यांची जबाबदारी ही तुमचीच असते. त्या बालकांना सगळ्या गोष्टी देताना तुम्ही मानसिकदृष्ट्या ते मूल अपंग तर करुन ठेवत नाही आहात ना हे भान पालकांनी ठेवायला हवे. सगळीच मुले मार्कांच्या रेसमध्ये शेपट्या पिळून कुठे जाणार आहेत? अमूक एका ठिकाणी प्रवेश मिळाला नाही तर त्याला इतर सक्षम पर्यायी वाटा तुम्ही द्यायला मदत केली आहे का? तिथे प्रवेश न मिळणे हा जीवनातला अंतिम मोठा गुन्हा असणार आहे अशी त्याच्या/तिच्या मनाची समजूत तुमच्या वागण्याने झाली आहे का? मुलांनी आत्महत्या केली ही शेवटची पायरी पार करण्याआधी त्यांचे पालक काय डोळ्यांना झापडं लावून बसले होते का? ज्या मुला/मुलीसाठी आपण हे सगळे कष्ट करतोय असं पालकांना वाटत होतं ते मूल खरंच नीट आहे का ह्याकडे त्यांचं लक्ष कसं गेलं नाही? आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात पालकांनी काय दिवे लावलेले होते आणि त्यामुळे ते जगायला नालायक ठरले आहेत का?
आपण आपले विचार हे जबरदस्तीने मुलांवर लादून नकळत पुढची पिढीही अशीच अधूर्‍या स्वप्नांची आणि मोठे झाल्यावर त्यांच्या बालकांवर अत्याचार करणारी निर्माण करतो आहोत ह्याची जाणीव पालकांना नको का?
योग्य मार्गदर्शन, स्पर्धेचे योग्य महत्व, करिअरचे महत्त्व आणि मर्यादा, पैशाचे महत्त्व आणि मर्यादा, पैसे मिळवण्यासाठी काय करायला हवे आणि नको ह्याचे तारतम्य ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी आपल्या वागणुकीतून द्याव्यात ही अपेक्षा आहे. एकदा विचारांना योग्य दिशा मिळाली की मुलं सक्षम असतातच आपण नको इतके मधे मधे करुन त्यांना पायात पाय घालून पाडायला जात असतो हे भान आपण सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे!

मागे एकदा प्रभूमास्तरांच्या सांगण्यावरुन मी खलील जिब्रानच्या कवितेचा भावानुवाद केला होता. तो वाचून आपण आत्मसात करायला हवा!

चतुरंग

स्वाती२'s picture

11 Jan 2010 - 10:57 pm | स्वाती२

मी कुठेही आत्महत्येचे समर्थन केले नाहिये. माझा आक्षेप तुम्ही मनोरुग्णांबद्दल काढलेल्या उद्गारांना आहे. माझ्या मैत्रीणीच्या आईने आत्महत्या केली होती तेव्हा अशा वेळी मागे राहिलेल्यांची होणारी तडफड खूप जवळुन पाहिलेय/ अनुभवलेय. मित्राच्या आईच्या बाबतीत आत्महत्या टाळण्यात यशस्वीही झालेय. माझ्यासाठी म्हणाल तर every life is precious. माझ्या पाप-पुण्याच्या कल्पना या माणूसकीवर आधारित आहेत. कुठल्याच धर्मग्रंथांच्या दाखल्याची मला गरज नाही.

फक्त कोणत्या धर्मात वा पंथात आत्महत्या हे पुण्यकर्म सांगितले आहे हे मला सांगण्याची कृपा करावी

समाज हा कुठ्ल्या तरी धर्मात लिहले आहे 'जगा' म्हणून जगतो कि काय ? अन असे केविलवाणे जगणे म्हणजे पुण्यकर्म असते काय ?

I don not mean to annoy you but sometimes I feel you reply
just for the sake of replying without applying Brain

Nobody give-up the life for Pleasure. Will you do the same ?? So that you will be hanged on any Tree and Prove yourself Vetal ??? Will you live-up to your name Mr. Vetal – The Ghost ' ??? Kindly Die and Hang - Up Yourself on Lonely Tree .

I wish you should be little sensitive about the topic
~ वाहीदा

वाहीदा's picture

11 Jan 2010 - 2:24 pm | वाहीदा

मेले ते मानसिक रुग्ण होते. असे म्हणून समस्या सुटतात का ?
उद्या सगळा समाजच मानसिक रुग्ण होईल
आपल्या घरात / शेजारी पाजारी यांच्याकडे जर असे झाले त मग काय असेच हात झटकणार ?
I think there is too much expectations from today's
young kids. If the child does not complete the expections
why parents and teachers are making him feel as if
he or she has committed some sin ? Why it is END OF THE WORLD ? THE LIFE IS STILL BEAUTIFUL ...
सध्या मी माझ्या अपार्टमेट मधल्या मुलांचे प्रोजेक्ट कंपलीट करत आहे ... रोज ओफीस मधून आल्यावर कोणाचा तरी रडवा चेहरा बघायला मिळतो. .. रोज नविन रामायण ऐकायला मिळते..परिक्शा जवळ आली आहे अन हे काय नव-नविन प्रोजेक्ट्स करायला देतात ... घरी आई - बाबा ओरडतात , शाळेत बाई अन ट्यूशन टीचर तर नुसत्याच मारतात मग मुलांनी करायचे तरी काय ? या सर्वांनी आपल्या लहानपणी एवढा अभ्यास केला होता का ?
मग स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता कोवळ्या जिवांकडून अशी करून घ्यायची ?? कालच मी आमच्या शेजारच्या भाभींना बडबडून आले...किती मारायचे मुलांना तुम्हाला पाहीजे ते परसेंटेज नाही मिळाले म्हणून ?
~ वाहीदा

स्वानन्द's picture

12 Jan 2010 - 12:38 pm | स्वानन्द

मुळात आपण जन्माला तरी का येतो...याचे उत्तर आहे का आपल्याकडे?
मग एखाद्याने जगावे की आपले जीवन संपवावे हा त्याचा प्रश्न आहे.
मला माहीत आहे, की बरेच जण यावर म्हणतील की आई वडीलांनी त्या मुलासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या त्याचे काय?

पण जर त्याला त्याच्याजवळ अस्सलेल्या गुणांचा वापर करून समाधानाने जगता येत नसेल तर त्याने काय केवळ आई वडीलांचे पांग फेडण्यासाठी आयुष्य ढकलत रहायचं?
तसंही आपल्या आयुष्याची आपल्याला तरी काही शाश्वती आहे का? तरीही आपण काहीतरी भविष्याचा विचार करून जगण्याची सोय पाहत असतो. पण दर वेळेस आपण जसं ठरवलं आहे तसं नाही ना होत. तसंच त्या पालकंचं ही.
उद्या मीही बाप झालो तर मलाही ते लागू पडतं.

असो.

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

तिमा's picture

10 Jan 2010 - 5:26 pm | तिमा

मेलेल्यांच्या आत्म्यांवर टीका करु नये असे मला वाटते. त्यांची नक्की काय परिस्थिती होती ते आपल्याला माहित नाही. पुनर्जन्माचे म्हणाल तर अशा अनैसर्गिक मृत्यु पावलेल्यांनाच जास्त पुनर्जन्म मिळत असतो असे म्हणतात.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

टारझन's picture

11 Jan 2010 - 12:14 pm | टारझन

बा**ला भां** ह्या मिडिया वाल्यांच्या आणि ...... !!! काय चाल्लय काय ? एक तर ण्युज चॅणल वाले हा मॅटर ओला ठेवत आहेत ... त्यात असल्या विषयावर धागे काढून पब्लिक अजुन काव आणतंय !

काय गुलाबजामाचा पाक संपला काय ? ह्या विषयांवरचे धागे काढणे बंद झाले तरी डोक्याचा ताण कमी होईल !

असो ..

- सद्-गुणी

II विकास II's picture

11 Jan 2010 - 9:50 pm | II विकास II

असले धागे विचार अदान प्रदानासाठी चांगले आहेत.
विकास व वाहीदा यांचा प्रतिसाद अगदी उत्तम.

हर्षद आनंदी's picture

13 Jan 2010 - 7:19 am | हर्षद आनंदी

ही भा****ऊ सिस्टीमच दोषी आहे.

आजच्या ४-५ वर्षाच्या बागडण्याच्या वयात मुलांना काय मिळते
१. संगणक, टीव्ही .. इलेक्ट्रॉनिक मिडीयाने व्यापलेले जग
२. सो कोल्ड सिनियर केजी \ ज्युनिअर केजीचा चौकोनी वर्ग
३. स्टांझा \ पोअम \ ABCD घोकणे
४. जरा वय वाढले की पाठीवर पुस्तकांचे आणि डोक्यावर मार्कांचे ओझे
आणि काय काय.. जे एवढ्या मोठ्या प्रमाणात नको मिळायला ते सारे

काय मिळाले पाहीजे
१. आजी-आजोबांकडुन संस्कार, ज्ञान
२. खेळायला मोकळी जागा, वेळ
३. माफक अभ्यास. .. पाठांतर नाही तर स्वाध्याय.. (पाढे, वाचन)
४. आई-वडीलांचा मोकळा वेळ, त्यांच्याशी गप्पा..मनमोकळे बोलणे

जमणार आहे का? नाही ना मग नैराश्य आले की करा आत्महत्या.. सोप्प आहे, टेन्शनसे छूटकारा .. २ मिनट सब खेल खतम ! आहे काय नी नाही काय?
विचार करायला, जीवनाशी जुळवुन घ्यायला आम्ही काय शिकलोय तर घंटा...

मिडिया तेच दाखवते.. उदाहरण घ्यायचे झाले तर सध्याच्या सुपरहीट ३ IDIOTS नावाच्या IDIOTIC चित्रपटात तेच दाखवले आहे,
एखाद्याला खलनायक ठरविण्यासाठी आत्महत्या दाखविणे, त्याचा बघणार्‍यांवर काय परिणाम होईल याची काळजी न घेणे ..
न्युज दाखविण्यार्‍या वाहिन्यांना आपण काय चघळतोय याचे भान कधीच नसते, पैशासाठी वाट्टेल ते. मग नागड्या बाया काय किंवा रक्तलांछित मुडदे काय.. त्यांना काय फरक पडतो.. TRP वाढला त्यांचे पोट भरले.. बघणार्‍यांच्या आईचा घो, रीमोट आहे ना म्हटले की झाले, संपली आपली जबाबदारी...

बघा .. पटतय का?

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..