मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
26 Dec 2009 - 4:11 pm

मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही
उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही....

दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही,
कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही..

रोज रोज गा-हाणे मित्र ऐकून ऐकणार काय ?
भर दुपार मैफल माझी साकी कोणी सजवत नाही ..

ढगाळ दुपार ओसरून
सांज त्यावर कलताना ..
रिता पेला रिते मन
घेउन गाणे म्हणताना ...

मीच मला संगतीला ताल कोणी धरत नाही ....
उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही....
-- सागर लहरी ३/८/२०0९

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Dec 2009 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही
उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही....

दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही,
कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही..

मस्त, अजुन येऊ दे...!

-दिलीप बिरुटे

फ्रॅक्चर बंड्या's picture

28 Dec 2009 - 5:48 pm | फ्रॅक्चर बंड्या

दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही,
कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही..

छान आहे

binarybandya™