एकच अमोघ उपाय: मराठी एकजूट

ज्ञानेश...'s picture
ज्ञानेश... in जनातलं, मनातलं
24 Dec 2009 - 10:49 pm

दोस्तहो,

सध्या लोकसत्तेच्या ’लोकमुद्रा’ पुरवणीत सलील कुलकर्णी यांची मराठी भाषेविषयक लेखमालिका सुरू आहे.

त्या मालिकेतल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखातील काही अंश इथे प्रकाशित करतो, आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नात आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो.

."...संपूर्ण जगात भाषकसंख्येनुसार मराठी ही पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे आणि भारतात हिंदी, बंगाली व तेलुगू भाषांच्या नंतर चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. महाराष्ट्रात सुमारे दहा कोटी मराठी भाषिक आहेत. ही लोकसंख्या जगातील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इटली, ऑस्ट्रेलिया, स्वित्र्झलड, कॅनडा, स्वीडन, अशा अनेक प्रगत राष्ट्रांपेक्षादेखील कितीतरी जास्त आहे. ग्राहक म्हणूनही मराठी जनतेचे संख्याबळ फार मोठे आहे. आपल्याला आपल्या भाषेत योग्य व सक्षम पद्धतीने सेवा मिळणे हा आपला अधिकार आहे. आपण मराठी ग्राहक एकजूट बांधू शकलो तर आपले रास्त विचार आपण विविध खासगी व्यापारी कंपन्या व सरकारी संस्था यांच्या गळी नक्कीच उतरवू शकू. बहुसंख्य मराठीजनांनी आपल्या भाषेची आणि भाषकांची प्रगती साधण्यासाठी एकजूट केली तर आपल्याला काय शक्य नाही?"

"...विविध उद्देशांसाठी ‘मराठी एकजूट’ साधण्याच्या दृष्टीने आपण एकत्र येऊन औपचारिकपणे एखादा संघ स्थापन करणे, एकमेकांच्या सतत संपर्कात राहणे व वेळोवेळी एकत्रितपणे कृती करणे फार महत्त्वाचे आहे.
यादृष्टीने मायबोली मराठीसाठी प्रामाणिकपणे कृती करू इच्छिणाऱ्या सर्व सज्ञान मराठीप्रेमींना मी ‘मराठी एकजुटी’मध्ये सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन करतो.

त्यासाठी
आपले नाव,
जन्मदिनांक,
संपर्कासाठी वास्तव्याचा संपूर्ण पत्ता,
चलध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक, शिक्षण, व्यवसाय आणि मराठीच्या हितासाठी करण्यासारख्या विविध लहान-मोठय़ा कृतीसंबंधी आपल्या सूचना, असे सर्व तपशील शक्यतो ई-मेलने marathi.ekajoot[at]gmail[dot]com या ई-पत्त्यावर किंवा पत्राने ‘मराठी एकजूट’, टपाल-पेटी क्रमांक १९२०, पुणे-४११ ०३८, या पत्त्यावर कळवावेत. आजच्या आधुनिक काळात ई-मेलद्वारे संपर्कात राहणे हे झटपट, बिनखर्चाचे व अत्यंत सोयीचे ठरते. त्यामुळे शक्य असेल तर इतर तपशिलाबरोबरच आपला ई-मेल पत्तासुद्धा नक्की कळवा. आपल्याकडे महाराष्ट व मराठी यांच्या संबंधातील चांगल्या कविता, लेख, माहिती व भाषणे किंवा काही विशेष अनुभव गाठीला असतील तर तेसुद्धा लिखित स्वरूपात अवश्य पाठवावेत."

मूळ लेख इथे वाचता येईल-
.
.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=327...

जीवनमानलेखशिफारस

प्रतिक्रिया

अभिशेक गानु's picture

25 Dec 2009 - 9:25 pm | अभिशेक गानु

दिलेल्या माहितीबद्दल आभार .. चळवळीस माझ्या मनापासून शुभेछा,,,सर्वाना विनम्र आवाहन हि आपण या उपक्रमात सहभागी व्हावे ..व आपल्या मित्रापारीवारास..नातेविकांमध्ये पण याचा प्रचार करावा..

II विकास II's picture

26 Dec 2009 - 9:07 am | II विकास II

माहीती पाठवली आहे.

KDNYANESH's picture

27 Dec 2009 - 7:53 am | KDNYANESH

धन्यवाद, सर्व मित्रपरिवाराला / नातेवाईकाना कळविले आहे.

ज्ञानेश कुलकर्णी, टोरोन्टो

सुधीर काळे's picture

27 Dec 2009 - 12:34 pm | सुधीर काळे

ज्ञानेश-जी,
धन्यवाद!
स्वतःची माहिती कळविली आहे व सभासदही झालो आहे.
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

ज्ञानेश...'s picture

27 Dec 2009 - 1:01 pm | ज्ञानेश...

अभिषेक, विकास, ज्ञानेश, सुधीर काळेसाहेब,
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

इतर वाचकांनीही तिकडे मेल्स पाठवून आपला सहभाग नोंदवला असेलच, त्यांचेही आभार.
अधिकाधिक लोक या उपक्रमात सहभागी होतील, असे पाहूया.

टुकुल's picture

28 Dec 2009 - 2:07 am | टुकुल

स्वःताची माहीती कळवली आहे..
काही खटकलेल्या गोष्टी.
>>जन्मदिनांक,
संपर्कासाठी वास्तव्याचा संपूर्ण पत्ता,
चलध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक <<
हे कशाला हव आहे, जर सभासदांच्या वयाबद्दल जाणुन घ्यायच असेल तर जन्मतारखेतल वर्ष पुरेस आहे.. वास्तव्याचा पत्ता आणी दुरध्वनी क्रमांक मि तरी दिले नाहीत, कारण ई-मेल आयडी दिले असताना याची काही गरज नाही, आणी सुरक्षीततेच्या द्रुष्टीने पण ते योग्य नव्हे.

--टुकुल