हरी हे दयाळा कधी भेट देशी

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
19 Dec 2009 - 3:31 pm

हरी हे दयाळा कधी भेट देशी | उभे भक्त सारे तुझ्या पायरीशी |
जैसा रवी ये घनान्धारातुनी | तैसे कधी श्री मुख दाखविशी |

उभ्या धेनु वत्सासवे रान वाटे | गोपाळ मेळा दारात दाटे |
सर्वास रे भेटुनी निवविशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी |

संगे तुझ्या रे मन हारपते | संगे तुझ्या रे चित्त निर्वाण होते |
मायाजलाब्धी आम्हा पार नेशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी |

हरी सर्व चिंता तुला वाहियेल्या | तुझ्या पुष्पमाला आम्ही धारियेल्या |
निमिषात सा-या चिंता हरिसी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी |

मुखे गोड ऐसे तुजे नाम घेऊ | स-देही इथे सर्व वैकुण्ठ पाहू |
नामात तुझिया अम्हा प्राप्त होशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी |
-- सागर लहरी २८-१०-२००९

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

19 Dec 2009 - 10:31 pm | प्राजु

सुंदर भक्तीगीत आहे हे.
चाल लाऊन गायला हवं कोणीतरी.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

पाषाणभेद's picture

19 Dec 2009 - 10:39 pm | पाषाणभेद

सागर, काय चाललय? काव्याच्या लहरींवर लहरी पाठवतोयेस हल्ली. अरे मिपा ला भरती येईल ना?

बाकी दोन्ही अभंग काव्ये मस्तच.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

jaypal's picture

19 Dec 2009 - 10:42 pm | jaypal

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/