मंदाकीनी या शब्‍दाचा मूळ अर्थ काय

मड्डम's picture
मड्डम in काथ्याकूट
18 Dec 2009 - 6:58 am
गाभा: 

मंदाकीनी या शब्‍दाचा मूळ अर्थ काय? कृपया मराठीच्‍या जाणकारांनी त्‍यावर प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया

धनंजय's picture

18 Dec 2009 - 7:35 am | धनंजय

व्युत्पत्तिजन्य अर्थ असा :
मन्द + अञ्च् (+ स्त्रीप्रत्यय) = मंद चालणारी/जाणारी (किंवा वाहाणारी)

हिमालयात केदारनाथ धामाजवळ वाहाणार्‍या नदीचे नाव मंदाकिनी आहे. माझ्या आठवणीप्रमाणे काही ठिकाणी ती धीमी वाहात असेल, पण अन्य ठिकाणी ती वेगात वाहाते.

गंगानदीलाही "मंदाकिनी" हे नाव वापरतात. मंदाकिनी नावाचे कवितेतले वृत्तही आहे.

या सर्व रूढ अर्थात व्युत्पन्न "हळू चालणारी" हा अर्थ दुय्यम मानला जातो. नदी वेगवान असली तरी "मंदाकिनी" नाव बदलत नाही. दुसर्‍या कुठल्या धीम्या वृत्ताला "मंदाकिनी" म्हणता कामा नये, आणि मंदाकिनी वृत्तातले "पदजलरुहि यस्य मन्दाकिनी..." ही कवितापङ्क्ती अगदी लगबगीने म्हटली तरी वृत्त मंदाकिनीच! म्हणून "मूळ" अर्थ काय? हा प्रश्न तसा योग्य नाही.

आकडा's picture

18 Dec 2009 - 7:47 am | आकडा

शब्दाची ही व्युत्पत्ती माहीत नव्हती. धन्यवाद धनंजय. पण कवितेतलं वृत्त मंदाकिनी का मंदाक्रांता?

मंदाक्रांता नावेचे सुद्धा वृत्त आहे. पण ते वेगळे. त्याचा एक चरण असा :
मंदाक्रांतां प्रवरकवयस्तन्वि! तां संगिरन्ते ॥

विजुभाऊ's picture

18 Dec 2009 - 9:41 am | विजुभाऊ

मंदाक्रांता म्हणती तिजला ; वृत्त जे मंद चाले.
हे मात्रा गण वृत्त आहे
हिंदी भाषेत आकाशगंगा (गॅलेक्सी) या अर्थाने मंदाकिनी शब्द वापरतात.
अर्थात हिंदी शब्दांचे मराठी अर्थ वेगळेच होतात.
उदा :चेष्टा ,शिक्षा, गर्व ,गर्द ,

प्रशांत उदय मनोहर's picture

20 Dec 2009 - 11:45 pm | प्रशांत उदय मनोहर

मात्रागणवृत्त नव्हे. अक्षरगणवृत्त आहे मंदाक्रांता -

मंदाक्रांता म्हणति तिजला वृत्त हे मंद चाले |
ज्याच्या पादी म भ न त त हे आणि गा दोन आले |
एक्या पादी गणति सतरा अक्षरांचीच होते |
काढी रामा भवनदितुनी खातसे फार गोते ||

आपला,
(छंदशास्त्री) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

सुनील's picture

18 Dec 2009 - 10:29 am | सुनील

मंदाक्रांता सुलभ कविता, कालिदासी विलासी!

संपूर्ण मेघदूत मंदाक्रांता ह्या वृत्तात रचलेले आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पाषाणभेद's picture

18 Dec 2009 - 7:38 am | पाषाणभेद

हळूवार वाहणारी नदी असा अर्थ होतो.
तुम्ही का विचारता ते पण सांगा म्हणजे इतरही माहिती देता येईल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

sujay's picture

18 Dec 2009 - 7:44 am | sujay

हळूवार वाहणारी नदी असा अर्थ आहेच पण धबधब्याखाली अंघोळ करणारी हा ही एक अर्थ होउ शकतो ;) ;)

भडकमकर मास्तर's picture

18 Dec 2009 - 4:10 pm | भडकमकर मास्तर

खिखिखि....

बट्ट्याबोळ's picture

18 Dec 2009 - 9:46 am | बट्ट्याबोळ

दाउदची आयटम !!
अपल्याला एवढा एकच अर्थ महित आहे :)

मंदाकिनी हा शब्द आकाशगंगेसाठी पर्यायी शब्द म्हणून पूर्वीपासून वापरला जातो.
आकाशात मंद तारकांचा दिसणारा जो पट्टा आहे त्याला त्याच्या मंद प्रभेमुळे मंदाकिनी हे नाव पडले. 'नक्षत्रलोक' ह्या पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या सुंदर पुस्तकात हा शब्द अनेकवेळा वापरला गेला आहे.

(खगोलप्रेमी) सागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2009 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दांची फोड केली तर मंद म्हणजे हळू ,पण किनी म्हणजे गंगा असा अर्थ होतो का ?

सागर म्हणत आहेत आकाश गंगेसाठी जसा तो पर्यायी शब्द वापरला जातो.
तसा स्वर्गातील गंगेसाठी मंदाकिनी शब्द वापरल्या जात असावा.

-दिलीप बिरुटे

आकडा's picture

18 Dec 2009 - 6:37 pm | आकडा

किनी म्हणजे गंगा असा अर्थ होतो का ?

किनी का आकिनी?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2009 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'आ' 'दा'लाच चिटकून गेला ना तिकडे ?
इकडे फक्त 'किनी' राहिला ना ?

-दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

19 Dec 2009 - 5:26 am | प्रियाली

मंदाकिनी म्हणजे धीम्या गतीने वाहणारी हे स्पष्ट झाले आहेच. पुराणांत मंदाकिनी अशी दिसते -

रावणाने कुबेराला लंकेतून हाकलून दिल्यावर कुबेराने कैलास आणि मानसरोवर भागात यक्षांचे राज्य स्थापन केले. या राज्यातून मंदाकिनी आणि अलका या नद्या वाहत असे आणि मंदार पर्वतही येथेच होता. या नद्यांतून सुवर्ण कमळे वाहताना दिसत. कुबेराच्या राज्यातील सरोवरांतही सुवर्णकमळे उगवत.

असो. प्रत्यक्षात मंदाकिनी ही अलकनंदेची उपनदी असून अलकनंदा ही गंगेची उपनदी आहे असे वाटते.

मंदाकिनी हि अलकनंदेची भगिनी, उपनदी नव्हे.

गंगोत्री जवळची भागीरथी, केदारनाथजवळची मंदाकिनी, बद्रीनाथजवळची अलकनंदा मिळून गंगा बनते.

रुद्रप्रयागला मंदाकिनी व अलकनंदेचा संगम होतो व नदीचे नांव अलकनंदा होते (जी नदी मोठी तिचे नांव संगमाच्या पुढे दिले जाते).

देवप्रयागला भागीरथी व अलकनंदेचा संगम होतो व नदीचे नांव गंगा होते.

गंगेला प्रयाग येथे यमुना येऊन मिळते व नदीचे नांव गंगाच रहाते.

उन्हाळ्यात मंदाकीनी गर्द हिरवी , अलकनंदा आकाशी तर भागीरथी मातकट (ह्यानदीत भरपूर वाळू आहे) असते.
प्रत्येक संगमानंतर बराच काळ ह्या नद्या आपापला रंग घेऊन वाहतात.
त्यामुळे दोन वेगळ्या रंगांचे पट्टे बरेच अंतर समांतर जातात व साधारण २ कि.मी. अंतरावर एकमेकात मिसळतात. संगमा नंतर मोठ्या नदीचा रंग पाण्याला प्राप्त होतो. भागीरथी ही थोरली, अलकनंदा मधली तर मंदाकीनी हि धाकटी म्हणावी लागेल.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संजा's picture

19 Dec 2009 - 10:51 am | संजा

मंदा शांताराम कीणी
आमच्या बाजुला रहाते.

विनायक प्रभू's picture

19 Dec 2009 - 12:04 pm | विनायक प्रभू

मंदाकिनी म्हणजे धबधबा.
(अंगे भिजली जलधारांनी)

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Dec 2009 - 9:49 pm | डॉ.प्रसाद दाढे

मास्तर, मंदाकिनी म्हटले की राम तेरी गंगा मैलीच का आठवते?
;)

विनायक प्रभू's picture

20 Dec 2009 - 1:10 pm | विनायक प्रभू

ही तर धबधब्याची किमया

अमोल जाधव's picture

20 Dec 2009 - 8:53 pm | अमोल जाधव

मन्द मुलगी