तुमच्या गावाचे नाव काय?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
17 Dec 2009 - 6:08 am

तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार.
मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो.
उदाहरणच द्यायचे झाले तर:
पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त.
वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?)
हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात. ती नावे पुर्वीच्या लोकांनी कशी ठेवली असतील? त्या नावांचा इतिहास आपल्याला माहित नसतो. तसा इतिहास कोणी लिहीलेलादेखील नसतो. कर्णोपकर्णी आपल्याला त्या त्या गावांच्या कथा सांगीतल्या जातात. आपण त्या ऐकतोही. असल्याच इतिहास नसलेल्या गावांच्या नावाबाबतीत आपल्याला काही कल्पना लढवता येतात का? आपल्या गावाच्या नावामागे काही इतिहास लपलेला आहे का?
तुम्ही काही कल्पना लढवून त्या गावाचा इतिहास सांगू शकता का?

जशी सातारा गावाची माझी कल्पना:
सातारा : सात तारा किंवा तारां सहित (एक गाव होते. त्या ठिकाणी एक माणूस सात तारांची विणा वाजवायचा. एके दिवशी त्याच्या विणेत एक तार कमी दिसली. तो विणा वाजवणार कसा? तो तार शोधता शोधता वेडा झाला. म्हणून गावाचे नाव सातारा पडले.)

मी काही गावांची नावे देतो. तसे नाव रुढ होण्यामागची माझी कल्पना अशी:

गावाचे नाव नावाची पार्श्वभूमी
भुत्याणे (ओझर मिग जवळचे गाव): गावात भुते राहत असतील.
दात्याणे(ओझर मिग जवळचे गाव): गावातली लोकं दात विचकवत हसत असतील.

ओझर मिग (मिग विमान तयार करण्याचे): हे गाव ओझर च्या जवळ वसवले गेले.
ओझर: आता याला ओझर (तांबट) म्हणतात. वरील ओझर मिग चे हे मुळ गाव. पण आता ओळख होण्यासाठी तांबटांचे ओझर म्हणून नविन ओळख घ्यावी लागली या गावाला.
नाशिक: गावाच्या नावाचा इतिहास सांगायलाच पाहिजे का? :-)
पुणे: पुण्यनगरी
मुंबई: मुंबादेवी
दिल्ली: ???
पलासनेर / पळासनेर (इंदुरला जातांना लागते): - खरोखर गावाच्या आजुबाजूच्या जंगलात पळसाची झाडे खुप आहेत. बसमधूनही दिसतात. मी विचार करतो की गावाच्या नावात 'पळास' ठिक आहे, पण 'नेर' कुठून आले? अन बाकी नेर नावाचेही एक गाव आहे.
पांगराण: आजुबाजूला पांगरीचे रान आहे.
बारामती: बारा प्रकारच्या 'मती' असणारे गाव किंवा बारा प्रकारच्या मती असणार्‍या व्यक्तींचे गाव
लोणावळा: लोण्यासारखी 'स्मुथ' वळणे असणारे गाव (लोणावळ्याच्या आसपास बरीच 'स्मुथ' वळणे आहेत घाटात.)
कर्जत: कर्जात डुबलेली जनता
आजमगड: आजमाचा गड
कोयना: आब्यांची कोय सापडत नाही असे गाव
सांगली: पुलंनी म्हटल्याप्रमाणे 'चांगली' सांगली
बाणेर (पुणे): बाण मारेल तो गाव
धनकवडी : धन सापडणारी
हडपसर:---> हाडपसर----> हाड पसर
पिंप्री: ---> पिंपरी --> पिंपराचे झाड
चिंचवड: चिंचा व वडाची झाडे
घोरपडीगाव: घोरपड सापडणारे गाव.
खेड: गावाचे नावच खेड म्हणजेच खेडं आहे.
सासवड: वड पुजणारी सासू असलेलं गाव
राजगुरूनगर: हुतात्मा राजगुरू यांचे गाव

प्रवासभाषाइतिहासव्युत्पत्तीसमाजजीवनमानभूगोलविचारमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

17 Dec 2009 - 6:15 am | घाटावरचे भट

या न्यायाने 'अंमळ'नेर गावाचे नाव मराठी आंतरजालावरून आल्यासारखे वाटते... ;)

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 6:42 am | पाषाणभेद

नाही हो भटोबा, या गावचे लोकं अंमळ पिवून त्यांना जास्त चढल्यासारखी नशा येत होती म्हणून अंमळनेर. बाकी नेर बाबतीत प्रश्न आहेच.

अजून घ्या :

ठाणे : येथे वेड्यांचे ईस्पितळ आहे. म्हणून वेड्यांचे ठाणे. (बघा: मिपा साक्ष आहे.)
डहाणू : 'ड' नावाच्या व्यक्तीला हाणू काय?
तारापुर : तारा असणारे पुर
अंबाला : अंबे ला ला (म्हणजे अंबा या देवीला घेवून ये)
पालघर: पालीचे घर
वडाळा: वड जास्त असणारे गाव
वाडा : पुन्हा वड (मला वाटते महाराष्ट्रात वड/ पिंपळाचे नावे असलेली जास्तीत जास्त गावे सापडतील.)
मुरबाड : मुरबाड माती असलेले गाव
नागोठणे : नागाचे ठाणे असलेले गाव
भिवंडी ---> भिववंडी---> भिववाडी--- भिवा नावाच्या सरदाराची वाडी
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

विशाल कुलकर्णी's picture

17 Dec 2009 - 9:47 am | विशाल कुलकर्णी

पाभेभाऊ, माझ्या गावाचे नाव 'घोटी' आहे, तुम्हाला काय वाटते?
आता असे नका म्हणु की गावच्या सगळ्या लोकांचा मेंदु घोट्यात (गुडघ्याच्याही खाली) असेल म्हणुन ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 10:19 am | पाषाणभेद

घोटी हे गाव ईगतपुरीजवळ आहे. गावात पावसाळ्यात भरपुर पाऊस पडतो. ही दोन्ही गावे नाशिक जिल्ह्याची चेरापुंजीच जणू.

ब्रिटीशांच्या काळात येथे पावसाळ्यात वस्तीला असणारे ब्रिटीश अधिकारी पावसाळ्यामुळे थंडीने काकडायचे. ते त्यांच्या नोकरांना नेहमी 'go for tea' 'go for tea', म्हणजेच गो फॉर टी म्हणायचे.
आपल्या लोकांना काय अपभ्रंश करायची सवयच. त्यांनी गोफोटी म्हणायला सुरूवात केली. त्याचेच आताचे रुप म्हणजे घोटी.

संपली आमची गोष्ट, भरले तुमचे पोष्ट.
झोपा आता लवकर. सकाळी शाळेत जायचे ना विशाल बाळा.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

विशाल कुलकर्णी's picture

17 Dec 2009 - 1:25 pm | विशाल कुलकर्णी

चुकले, चुकले आता तुम्हाला उद्या शाळेत छड्या. बस्सा.. तस्संच पाहीजे.. ;-)

आमची घोटी इगतपुरीजवळ नाही काय तर सोलापूर जिल्ह्यात करमाळा या दुष्काळी तालुक्यात आहे. जिथे पावसाचे दर्शन दुर्लभ असते . पाषाणभेद काकांना काहीच येत नाही, आहेत नुसते.

:O) <:P :O) <:P >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

jaypal's picture

17 Dec 2009 - 1:34 pm | jaypal

दोन , दोन घोट्या (तिकडी ही एक) अस्ल्याचे माहीत नसावे ;-)

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पाषाणभेद's picture

18 Dec 2009 - 4:01 am | पाषाणभेद

कुलकर्णीसाहेब, एकाच तालूक्यात किंवा जिल्ह्यात एकसारखी गावांची नावे असल्याचे आढळते,असे आम्ही आधीच म्हटलेले आहे. तरी तुम्ही आम्हाला डिटेलवार सांगाया पाहिजे व्हत. काय हरकत नाय. तुमच्या गावात वरला किस्सा सांगुन द्या. एकच नाव आसल्यानं चालून जाईल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

jaypal's picture

17 Dec 2009 - 10:42 am | jaypal

गुंतागुंतीचा आहे. सोडवायला मजा येइल.
>ठाणे : येथे वेड्यांचे ईस्पितळ आहे. म्हणून वेड्यांचे ठाणे. (बघा: मिपा साक्ष आहे.)
खरं तर ईथे वेड्यांना शाहण करण्याकरता घेऊन येतात. ठाण्याचा श्रीस्थानक असा देखिल नमोल्लेख आढळतो.
ठाणेकर जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण's picture

17 Dec 2009 - 6:24 am | मदनबाण

चाळीसगाव च्या मागे काय बरं इष्टोरी असेल ? :?

दफोराव तुम्ही अती गाव भटकंती केल्यामुळे असेल हटके इचार टकुर्‍यात यायला लागले हायेत काय ? ;)

(कोल्हापुरी)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 6:31 am | पाषाणभेद

चाळिसगाव: चाळिस उंबर्‍यांचं गाव.
थोडी मजाच करायची झाली तर या गावात चाळीस चोर राहत असत.
एकदा अलिबाबा फिरत फिरत येथे आला व त्याने चाळिस चोरांना आपल्याकडे चोरी करण्यासाठी नोकरीला ठेवले.
पुढची कथा तुम्हाला ठावूकच आहे.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

प्रशान्त पुरकर's picture

17 Dec 2009 - 6:41 am | प्रशान्त पुरकर

नमस्कार मन्डळी, मी मुळचा चळीसगावचाच आहे. गावाच्या नावा बद्दल बर्याच अख्यायीका आहेत, त्यातलि एक -
चाळीसगावात फार पुर्वि एक राजा होउन गेला. त्याच्या मुलिला एकदा कोनितरि पळवुन घेउन गेले. रजाने दवन्डि पिटलि कि जो कोनि माझ्या मुलिला परत घेउन येइन त्याल मी ४० गाव बक्षिस म्हनून देइन. एका शुराने खरच राजाचि मुलगि शोधुन आणलि. पण नन्तर राजाच्या लक्षात आले कि याला जर ४० गाव दिलित तर अपल्याकडे काहिच शिल्लक रहात नाही. म्हणुन राजाने एका गावाचे नाव ४० गाव ठेवले व त्याला बक्षिस म्हनून दिले.

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 6:46 am | पाषाणभेद

म्हंलं ना कायतरी गोस्ट आसलंच. आवं म्या वर सांगेल आलीबाबाचीच गोस्ट खरी हाय.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

विकास's picture

17 Dec 2009 - 6:58 am | विकास

ठाणे : येथे वेड्यांचे ईस्पितळ आहे. म्हणून वेड्यांचे ठाणे. (बघा: मिपा साक्ष आहे.)

निषेध! :-) वास्तवीक उलटे आहे. ठाण्याच्या माणसाने मिपा काढून इतरांना मिपाचे वेड लावले आहे! - ठाणेकर विकास

ठाण्याबद्दल आम्हाला आमच्या एका शाळामास्तरांनी सांगितल्याप्रमाणे ठाणेश्वरी नावाची देवी पण होती (तीचे देऊळ म्हणे मूळ सेंट जॉन बॅप्टीस्ट स्कूलच्या आवारात होते) आणि स्थानक होते म्हणून ही....

मुंबईतील पायधुणीचे नाव म्हणे जिथे पाय धूवून नंतर पुढे जायचे अशा भागावरून पडले आहे.

शीव (सायन) म्हणजे मूळ मुंबई शहराची वेस होती....

सातार्‍याच्या बाबतीत वर पाषाणभेदांनी सांगितलेले बरोबर आहे. कधी तरी अशा काव्यात्मक ओळी (कुणाच्या ते माहीत नाही) ऐकल्या होत्या: "सातार्‍याची सतार सुंदर, नसती तिजला तारा, अजिंक्यतारा म्हणूनी चढतो कोणिही म्हातारा!"

आता शास्त्रापुरते एक पुलं चे वाक्य ;) (आठवणीतून): "चर्चगेटहून लोकलने बोरीवलीला गर्दीतून जाताना केवळ डोळ्यासमोरच नव्हेतर अंधेरी नावाचे स्टेशनही येते..."

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 8:10 am | पाषाणभेद

ईकास राव म्या सातार्‍याची गोस्ट सांगायाअधी माला तुमी सांगेल गान बिनं काय ठाव नवतं बगा. पन त्या गान लिवनार्‍यानंबी माझ्यासारकाच इचार क्येला आसल आन गान लिवलं आसल.

बाकी ठान्याचं म्या सांगेल मजाक मदी घ्या राव. तुमी म्हंता त्येच खरं हाय. मिपानं यडं क्येल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

विकास's picture

17 Dec 2009 - 11:07 pm | विकास

अहो पाषाणराव, जसा मी ठाण्याचा आहे तसा मी सातार्‍याचा पण आहेच :-)

इतकेच कशाला मध्यंतरी एका इतिहास संशोधकाने मला मी (म्हणजे आमची, ज्याला भारतात जातकुळी म्हणतात ती) मुळचे कुशाण आहोत म्हणून सांगितले. लगेच मी "गर्वसे कहो हम कुशाण है" असे म्हणू लागलो पण कुठल्या गावाचे ते काय कळलं नाय. तेव्हढ्यात दुसर्‍या संशोधनाप्रमाणे मी "हूण" ठरलो, परत पत्ता शोधू लागलो, पण काही उपयोग नाही... मग मला सगळ्यांचाच "शक" येऊ लागला आणि फक्त स्वतःला ठाण्याचा आणि सातार्‍याचा म्हणतो आणि कधी कधी बॉस्टनचा म्हणतो...:)

मदनबाण's picture

17 Dec 2009 - 7:10 am | मदनबाण

ठाणे : येथे वेड्यांचे ईस्पितळ आहे. म्हणून वेड्यांचे ठाणे. (बघा: मिपा साक्ष आहे.)

ही हा हा हा... ही हा हा हा... (इति रावण हास्य... ;) ) ओ दफोराव, मिपा चे चालक-मालक ,सर्वेसर्वा श्री श्री श्री विसोबा खेचर उर्फ तात्याराव अभ्यंकर याच शहरात राहतात बरे... ;) नाय उध्या गचकन खाते गोठवले गेले तर ईस्पितळास दोष देऊ नये काय... ;)
बाकी पुणे शहरा बद्धल आपले काय म्हणणे आहे ते वाचायला नक्कीच आवडेल...

(पक्का / कट्टर... आणि जे काय समजायचे असेल तो ठाणेकर... ;))
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

विजुभाऊ's picture

17 Dec 2009 - 9:17 am | विजुभाऊ

सातारा : सात तारा किंवा तारां सहित
सातारा म्हणजे सात तारा. तारा हा डोंगर टेकडी या अर्थाने वापरतात.
सातारा हे खरोखरच सात डोंगरांच्या मधोमध वसलेले गाव आहे.
गुरगाव = गुरुचे गाव. महाभारतात द्रोणाचार्याना हे गाव दिलेले होते.
दिल्ली = देहली = दहलीज = उंबरा. खैबरखिंडीतून भारतात यायला दिल्ली हे एक प्रकारे उंबराच होते.
ज्या गावाच्या पुढे आबाद असे लागते ती गावे मुसलमान अम्मलदारानी वसवलेली आहेत. उदा हैदराबाद ,औरंगाबाद, अहमदाबाद,
अपवाद : इस्लामपूर , अहमदनगर , अहमदपूर

विनायक प्रभू's picture

17 Dec 2009 - 9:42 am | विनायक प्रभू

कणंग म्हणजे रताळे

अनिकेत वैद्य's picture

17 Dec 2009 - 10:53 am | अनिकेत वैद्य

श्रीवर्धन. जि. रायगड. पिन. ४०२११०.

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 11:01 am | पाषाणभेद

आव वैद्य साह्येब, म्या तुमाल गावाच्या नावाचा इतिहास विचारुं र्‍ह्यायलोय आन तुमी माझीच कल्पना वापरू र्‍ह्यायले. काही हारकत न्हायी. माला बी आवडल कल्पना लढवाया. तुमी सांगा मी वळखतो आसा खेळ खेळूया.

तर श्रीवर्धन. श्री. म्हंजे द्येव. चांगली गोस्ट. आन वर्धन म्हंजी वाढ.
आता तुमीच डोकं लावा, आन् सांगा माला.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

पर्नल नेने मराठे's picture

17 Dec 2009 - 12:34 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख गाव हो तुम्चे,, लाल माती न नारळाची झाडे
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

17 Dec 2009 - 10:54 am | पर्नल नेने मराठे

माझ्या गावाचे नाव गिरगाव. आधी गिरणी कामगार तिथे राहात असत म्हणुन गिरणगाव होते असे म्हणतात. मग कालांतराने गिरगाव झाले असावे. सध्याचे गाव दुबई. कालपरवा पर्यत डुबणारी ती दुबई असा अर्थ लावता आला असता पण शे़ख खलिफांच्या क्रुपेमु़ळे आता तसे म्हणता येणार नाही ;) .
चुचु

प्रमोद देव's picture

17 Dec 2009 - 12:40 pm | प्रमोद देव

लालबाग,परळ वगैरे भागात बर्‍याच गिरण्या होत्या....म्हणुन त्याला गिरणगाव म्हणतात.

गिरगाव....म्हणजे चर्नीरोडची पूर्व बाजू.

ramjya's picture

17 Dec 2009 - 11:26 am | ramjya

माझ्या गावाचे नाव आहे बीड्...(अपभ्रन्श भिर चा...भिर म्हन्जे पान्यचा भवरा)...आणी बीड म्हन्जे सैन्या चा तळ्.....जुन्या काळात देवगिरी वरून दक्शिने कडे जाताना बीड ला सैनीकान्चा तळ असायचा

लवंगी's picture

17 Dec 2009 - 11:31 am | लवंगी

फारा वर्षांपूर्वि तिथे म्हणे मोठ्ठी लढाई झाली आणी खूप 'नर' पडले..
म्हणून गावाच नाव नरपड .. हि आमच्या आजीची स्टोरी.. :)

अविनाशकुलकर्णी's picture

17 Dec 2009 - 12:17 pm | अविनाशकुलकर्णी

माझ्या गावाचे नाव अहमदनगर...साधे गाव ना काना ना मात्रा..लोक पण खुप सरळ..ते बरे त्यांचे काम बरे..कलाकारांचे गाव..नाटक वेड्यांचे गाव....गावाला इतिहास आहे..चांदबिबिचा किल्ला..आहे..त्या किल्ल्यात प.नेहरुंना नजर कैदेत ठेवले होते..

योगी९००'s picture

17 Dec 2009 - 1:18 pm | योगी९००

चि.वि. च्या भाषेत अहमदनगर म्हणजे

"दिवस (अह) गर्व (मद) नसे (न) विष (गर) ज्या पुरी"

खादाडमाऊ

योगी९००'s picture

17 Dec 2009 - 1:25 pm | योगी९००

पाषाणभेद..

मस्त आणि मजेशीर धागा.

मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो.

मला पहिल्यांदा वाटले की 'बुवा' नावाचे गाव आहे काय..हॅ हॅ हॅ

तुमच्या मते खालील शहरांच्या नावाचा उगम काय..?

इचलकरंजी
रूकडी
गडमुडशिंगी (कोल्हापुर)
हातखंबा(रत्नागिरी)
ऑस्लो (नॉर्वे)
ओटावा(कॅनडा)

खादाडमाऊ (हे माझे नाव आहे..गावाचे नाही)

मी-सौरभ's picture

18 Dec 2009 - 12:03 am | मी-सौरभ

नावातच 'हात' अन् 'खंबा' दोन्ही पण आहे...

फक्त पुरुष राहत असतील त्या गावात ..... ;)

-----
सौरभ :)

jaypal's picture

17 Dec 2009 - 1:59 pm | jaypal

दांडा या शब्द प्रयोगावरुन काही गावांची नावे अस्ल्याचे कळले आहे.
माहीतगारांनी या विषयी आधिक प्रकाश टाकावा हे विनंती.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मी-सौरभ's picture

17 Dec 2009 - 11:57 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

माझ्या गावाचे नाव झरी.....कसे पडले हा प्रष्न मला छळतोय माझ्या लहानपणापासुन!!!!!!......

बाकी नाव मात्र (भारी....) झरी अन पाण्याचा मात्र पत्ताच नाही.

प्रशु's picture

17 Dec 2009 - 6:09 pm | प्रशु

१. माझे गाव कणकवली, पुराणांत ह्या गावाचा ऊल्लेख कनकवल्ली असा आहे.
२. नालासोपारा = शुर्पारक
३. ठाणे = श्री स्थानक
४. साळशी = सहा आळशी (पेशवाईतली गोष्ट)
५. जोगेश्वरी मुळचा योगेश्वर -> जोगेश्वर -> जोगेश्वरी (लोकसत्तेत आलेला लेख)
६. पे॑ठण = प्रतिष्टान
७. शेगांव = शिवगाव
८. मोरगांव = भरपुर मोर असलेले गाव किंवा मोराच्या आकारा सारखे गांव.

ब्रिटिश's picture

17 Dec 2009 - 6:32 pm | ब्रिटिश

ईंग्लंड ची इष्टोरी सांगा ना कोनीतरी

पक्का ब्रिटिश

दिनेश५७'s picture

17 Dec 2009 - 11:15 pm | दिनेश५७

महाराष्ट्र-कर्नटक सीमावादात, बेळगाव कर्नाटकात हवे म्हणून कानडींचा नावावरून युक्तिवाद होता. आचार्य अत्रेंनी तो हाणून पाडला. नावावरून ते गाव कोणत्या राज्यात असावे असा आग्रह असेल, तर अगोदर इंग्लंड महाराष्ट्रात हवे, असे ते म्हणत, असे सांगतात. मग, पोलंड, हॉलंड, आयर्लंड... महाराष्ट्र खरेच महा-राष्ट्र होईल!!!!

पाषाणभेद's picture

18 Dec 2009 - 3:44 am | पाषाणभेद

फॉरीनच्या नावाबाबत तेथील स्थानिक परिस्थिती माहित नसल्याने जास्त भाष्य करता येत नाही तरीही इंग्लंड England म्हणजे इंग्लिश लोकांची Land म्हणजे जमीन.

बाकी ब्रिटिशांचा रोख कळला अन दिनेश५७ तुम्ही तर अत्रेंचा किस्सा सांगुन त्यांच्या हजरजबाबीपणाचा नमुना दिलात. अत्रेंसारखा माणूस गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही अन येत्या दहा हजार वर्षांत होणार नाही.

बाकीचे फारीनचे जागे आसणारे लोकहो, तिथल्या गावांच्या नावाचे किस्से सांगा ना एखांदाव.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

वेदनयन's picture

17 Dec 2009 - 11:44 pm | वेदनयन

जळगाव - जळ (पाणी) नाही हो तिथे बिलकुल; पण काय करणार?
धुळे - इथे मात्र धुळ भरपुर
औरंगाबाद - औरंग्याचे गाव. संभाजीनगर हे नविन नाव ठेवले हे नशिबच आपले.

पाषाणभेद's picture

19 Dec 2009 - 8:39 am | पाषाणभेद

अहमदाबाद ला पण गुजराती लोक शहराच्या नावाबाबत वाद असल्याने अहमदावाद म्हणतात.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

ज्ञानेश...'s picture

18 Dec 2009 - 12:02 am | ज्ञानेश...

लावा अंदाज अपना अपना.

(गावाजवळ धरण वगैरे नाही. पाण्याचा तुटवडा आहे.)

बाकरवडी's picture

18 Dec 2009 - 9:17 am | बाकरवडी

आमचे गाव टारवणे.
तिकडे टायर्सचा धंदा जोरात चालतो.
म्हणून नाव पडले टारवणे !!!

:B :B :B बाकरवडी :B :B :B

विजुभाऊ's picture

18 Dec 2009 - 9:36 am | विजुभाऊ

खुर्द आणि बुद्रुक ही काय भानगड आहे

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Dec 2009 - 10:19 am | llपुण्याचे पेशवेll

बर्‍याच गावांच्या मध्यातून नदी वाहत असेल किंवा मोठा व्हाळ(ओढा) असेल तर त्या गावाचे जे २ भाग पडतात, त्यातला एक खुर्द आणि दुसरा बुद्रुक असे मानले जाते.
नदिच्या प्रवाहाच्या दिशेने तोंड करून उभे राहीले असता नदिच्या डाव्या हाताला जे गाव असते ते खुर्द आणि उजवीकडचे ते बुद्रुक.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

विजुभाऊ's picture

18 Dec 2009 - 11:37 am | विजुभाऊ

खुर्द आणि बुद्रुक हे दोन्ही शब्द अरबी/ फार्सी वाटतात. त्यांचे नक्की अर्थ काय आहेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Dec 2009 - 1:38 pm | llपुण्याचे पेशवेll

ते गूगलवर शोधा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

अविनाशकुलकर्णी's picture

18 Dec 2009 - 12:08 pm | अविनाशकुलकर्णी

.

अविनाशकुलकर्णी's picture

18 Dec 2009 - 12:03 pm | अविनाशकुलकर्णी

अंडोले मंडोले तु़झ गावाच नाव काय?
मा़झ्या गावाशि तुला करायच काय?
तुझ्या गावात मला यायच हाय
म्हणुन नाव तुला पुशित हाय
एक लहान पणाचे गाणे..

शैलेन्द्र's picture

19 Dec 2009 - 1:17 pm | शैलेन्द्र

माझे आत्ताचे गाव,

डोंबिवली= "डोंब" लोकांची वस्ती असलेले गाव.

जवळचेच "ठाकुर्ली" = ठाकरांची वस्ती असलेले गाव.

मुळ गाव "वावी" (ता. सिन्नर)= मोठी विहिर (वाव) असलेले , शिवरायांच्या पुर्वजांचे वतनाचे गाव.

अजुन काही गावे.

संगमनेर= प्रवरा व म्हाळुंगी यांच्या संगमाची जागा. ("नेर", "ठाण" हे शब्द "जागा" या अर्थी येतात, जसे पारनेर, सोमठान, देवठान.)

भंडारदरा= खुप पाणी साठायचे ती दरी.
ठाणे= लष्करी व मुलुखी मुख्यालय.
दीवा= कल्याणच्या खाडीतील प्राचीन दीपस्तंभ असलेले गाव.
अंबरनाथ= अंबरनाथेश्वर मंदीराचे ठीकान.
बदलापुर= प्रवासात घोडे/ बैल बदलायची जागा.
आंबिवली= खारट/ आंबट पाणी असलेली जागा.(खाडीमुळे)

अजुन टंकतो हळुहळु.

शैलेन्द्र's picture

19 Dec 2009 - 1:43 pm | शैलेन्द्र

प्रकाटाआ

शैलेन्द्र's picture

19 Dec 2009 - 1:39 pm | शैलेन्द्र

प्रकाटाआ

पाषाणभेद's picture

19 Dec 2009 - 8:16 pm | पाषाणभेद

शैलेन्द्र, मुळचे वावीचे काय?
उपयुक्त माहिती दिलीत आपण.

अजून गावांची नावे टाईप कराव येवू द्या. (एकदाच 'प्रतिक्रिया प्रकाशीत करा' हे बटन प्रेस करा. अन्यथा नॅट स्लो असेल तर तितक्या वेळा प्रतिक्रिया प्रकाशीत होते. )

विजूभौ, खुर्द आणि बुद्रुक ही नावे चिल्लर (आपण नाण्यांमध्ये मोजतो ती) या अर्थाने आलेली असावी.

बघा: खुर्दा म्हणजेच चिल्लर. तसा हा फार्सी शब्द असावा, कारण इराण मध्ये कुर्दिश हा प्रांत आहे. भाषा तज्ञ यावर प्रकाश टाकू शकतील. आपण सामान्यांनी मात्र आपल्या लायकीप्रमाणे विचार करायचा!

मला वाटते पानपताच्या लढाईच्या बखरीत असाच उल्लेख आलेला असावा. म्हणजे 'बरेच मोहरे गळाली. खुर्दा किती मारला गेला त्याची गणतीच नाही' आदी.

कोणी पानिपत वरची विश्वास पाटलांची कादंबरी वाचली आहे काय?

------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

शैलेन्द्र's picture

19 Dec 2009 - 10:21 pm | शैलेन्द्र

खुर्द व बुद्रुक हे चिल्लर या अर्थाने न येता गावात असलेल्या मुलकी आणि शेतकी विवरणावरुन येतात. मला त्याचे अचुक संदर्भ आठवत नाहीत पण मी ते वाचलेत, लवकरच ते सांगयचा प्रयत्न करतो.

पुण्याचे पेशवे यांचे स्पष्टिकरणही मला पटते.

पाषाणभेद's picture

19 Dec 2009 - 10:33 pm | पाषाणभेद

पुपेंचे व तुमचे म्हणणे एकदम मान्य. पण दोन गावे अल्याडपल्याड असतील तर शेतीचे शासकिय वितरण करण्यासाठी ही उप नावे केवळ सोईची केली असतील असे तर नसेल?

उदा. तुमच्याच वावी जवळ म्हरळ बुद्रूक व म्हरळ खुर्द आहे. तुमच्या म्हणण्यानुसार ब्रिटीशांच्या काळात असला प्रकार घडला असावा.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
(सध्या घरी, भारतातच मुक्काम)