तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार.
मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो.
उदाहरणच द्यायचे झाले तर:
पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त.
वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?)
हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात. ती नावे पुर्वीच्या लोकांनी कशी ठेवली असतील? त्या नावांचा इतिहास आपल्याला माहित नसतो. तसा इतिहास कोणी लिहीलेलादेखील नसतो. कर्णोपकर्णी आपल्याला त्या त्या गावांच्या कथा सांगीतल्या जातात. आपण त्या ऐकतोही. असल्याच इतिहास नसलेल्या गावांच्या नावाबाबतीत आपल्याला काही कल्पना लढवता येतात का? आपल्या गावाच्या नावामागे काही इतिहास लपलेला आहे का?
तुम्ही काही कल्पना लढवून त्या गावाचा इतिहास सांगू शकता का?
जशी सातारा गावाची माझी कल्पना:
सातारा : सात तारा किंवा तारां सहित (एक गाव होते. त्या ठिकाणी एक माणूस सात तारांची विणा वाजवायचा. एके दिवशी त्याच्या विणेत एक तार कमी दिसली. तो विणा वाजवणार कसा? तो तार शोधता शोधता वेडा झाला. म्हणून गावाचे नाव सातारा पडले.)
मी काही गावांची नावे देतो. तसे नाव रुढ होण्यामागची माझी कल्पना अशी:
गावाचे नाव नावाची पार्श्वभूमी
भुत्याणे (ओझर मिग जवळचे गाव): गावात भुते राहत असतील.
दात्याणे(ओझर मिग जवळचे गाव): गावातली लोकं दात विचकवत हसत असतील.
ओझर मिग (मिग विमान तयार करण्याचे): हे गाव ओझर च्या जवळ वसवले गेले.
ओझर: आता याला ओझर (तांबट) म्हणतात. वरील ओझर मिग चे हे मुळ गाव. पण आता ओळख होण्यासाठी तांबटांचे ओझर म्हणून नविन ओळख घ्यावी लागली या गावाला.
नाशिक: गावाच्या नावाचा इतिहास सांगायलाच पाहिजे का? :-)
पुणे: पुण्यनगरी
मुंबई: मुंबादेवी
दिल्ली: ???
पलासनेर / पळासनेर (इंदुरला जातांना लागते): - खरोखर गावाच्या आजुबाजूच्या जंगलात पळसाची झाडे खुप आहेत. बसमधूनही दिसतात. मी विचार करतो की गावाच्या नावात 'पळास' ठिक आहे, पण 'नेर' कुठून आले? अन बाकी नेर नावाचेही एक गाव आहे.
पांगराण: आजुबाजूला पांगरीचे रान आहे.
बारामती: बारा प्रकारच्या 'मती' असणारे गाव किंवा बारा प्रकारच्या मती असणार्या व्यक्तींचे गाव
लोणावळा: लोण्यासारखी 'स्मुथ' वळणे असणारे गाव (लोणावळ्याच्या आसपास बरीच 'स्मुथ' वळणे आहेत घाटात.)
कर्जत: कर्जात डुबलेली जनता
आजमगड: आजमाचा गड
कोयना: आब्यांची कोय सापडत नाही असे गाव
सांगली: पुलंनी म्हटल्याप्रमाणे 'चांगली' सांगली
बाणेर (पुणे): बाण मारेल तो गाव
धनकवडी : धन सापडणारी
हडपसर:---> हाडपसर----> हाड पसर
पिंप्री: ---> पिंपरी --> पिंपराचे झाड
चिंचवड: चिंचा व वडाची झाडे
घोरपडीगाव: घोरपड सापडणारे गाव.
खेड: गावाचे नावच खेड म्हणजेच खेडं आहे.
सासवड: वड पुजणारी सासू असलेलं गाव
राजगुरूनगर: हुतात्मा राजगुरू यांचे गाव
वाचने
30303
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
या
नाही हो
In reply to या by घाटावरचे भट
पाभेभाऊ,
In reply to नाही हो by पाषाणभेद
घोटी हे
In reply to पाभेभाऊ, by विशाल कुलकर्णी
चुकले,
In reply to घोटी हे by पाषाणभेद
त्याणा
In reply to चुकले, by विशाल कुलकर्णी
कुलकर्णीस
In reply to त्याणा by jaypal
धागा मजेशीर आणि
In reply to नाही हो by पाषाणभेद
चाळीसगाव
चाळिसगाव:
In reply to चाळीसगाव by मदनबाण
चाळीसगाव
In reply to चाळीसगाव by मदनबाण
म्हंलं ना
In reply to चाळीसगाव by प्रशान्त पुरकर
ठाणे
ईकास राव
In reply to ठाणे by विकास
तसा मी
In reply to ईकास राव by पाषाणभेद
ठाणे : येथे
सातारा :
हातकणंगले
माझे गाव श्रीवर्धन
आव वैद्य
In reply to माझे गाव श्रीवर्धन by अनिकेत वैद्य
सुरेख गाव
In reply to माझे गाव श्रीवर्धन by अनिकेत वैद्य
माझ्या
गिरणगाव
In reply to माझ्या by पर्नल नेने मराठे
बीड
माझ्या गावाचे नाव नरपड
माझ्या
अहमदनगर
In reply to माझ्या by अविनाशकुलकर्णी
मजेशीर धागा.
हात़खंबा???
In reply to मजेशीर धागा. by योगी९००
वेंगुर्ल्यात.....
रेवदांडा...
In reply to वेंगुर्ल्यात..... by jaypal
बाकी नाव मात्र (भारी....) झरी अन पाण्याचा मात्र पत्ताच नाही.
कणकवली...
ईंग्लंड ची
इष्टोरी...
फॉरीनच्या
In reply to इष्टोरी... by दिनेश५७
जळगाव / धुळे / औरंगाबाद
अहमदाबाद
In reply to जळगाव / धुळे / औरंगाबाद by वेदनयन
धरणगाव.
आमचे गाव
खुर्द आणि बुद्रुक
खुर्द, बुद्रुक
In reply to खुर्द आणि बुद्रुक by विजुभाऊ
खुर्द आणि
ते गूगलवर
In reply to खुर्द आणि by विजुभाऊ
अंडोले
अंडोले
माझे
प्रकाटाआ
प्रकाटाआ
शैलेन्द्र,
In reply to प्रकाटाआ by शैलेन्द्र
खुर्द व
In reply to शैलेन्द्र, by पाषाणभेद
पुपेंचे व
In reply to खुर्द व by शैलेन्द्र