दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन

अक्षय पुर्णपात्रे's picture
अक्षय पुर्णपात्रे in जनातलं, मनातलं
11 Dec 2009 - 3:13 am

ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन झाल्याची बातमी नुकतीच वाचली. आदरपूर्वक श्रद्धांजली.

समाजबातमी

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

11 Dec 2009 - 3:20 am | मुक्तसुनीत

माझीही श्रद्धांजली.
त्यांच्या एका कवितेवर मिसळपाववर झालेली चर्चा :
http://www.misalpav.com/node/9059#comment-142346

Nile's picture

11 Dec 2009 - 4:31 am | Nile

माझीही विनम्र श्रद्धांजली.

भानस's picture

11 Dec 2009 - 6:35 am | भानस

माझीही श्रध्दांजली.

मुक्तसुनीत's picture

11 Dec 2009 - 7:10 am | मुक्तसुनीत

हिंदीतले प्रसिद्ध लेखक श्री. उदय प्रकाश यांनी चित्र्याना वाहिलेली श्रद्धांजली.

http://uday-prakash.blogspot.com/2009/12/blog-post.html

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Dec 2009 - 7:52 am | llपुण्याचे पेशवेll

दिपुंना श्रद्धांजली.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

चतुरंग's picture

11 Dec 2009 - 8:08 am | चतुरंग

चतुरंग

पाषाणभेद's picture

11 Dec 2009 - 9:19 am | पाषाणभेद

तुकाराम.कॉम या वेबसाईटसाठी त्यांनी घेतलेली मेहनत आपल्या विचाराबाहेरची आहे.

त्यांना आदरांजली.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

मुक्तसुनीत's picture

11 Dec 2009 - 9:54 am | मुक्तसुनीत

तुकारामाबद्दलचे चित्र्यांचे कार्य ऐतिहासिक आहे असे मानले जाते हे अगदी खरे आहे.
मात्र प्रस्तुत साईट त्यांनी बनवलेली नव्हे.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

11 Dec 2009 - 9:53 am | कालिन्दि मुधोळ्कर

मनस्वी आणि बंडखोर कवीला श्रद्धांजली. येथे आणखी काही लोकांची त्यांच्याबद्दलची प्रकटने.

चेतन's picture

11 Dec 2009 - 10:57 am | चेतन

माझिही आदरांजली

असो

पण हेच त चित्रे ना 'थोडासा नाराज आणि बराच शरमिंदा' लिहणारे

कट्टर मराठी चेतन

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Dec 2009 - 4:58 pm | बिपिन कार्यकर्ते

खरे तर साहित्यातले अथवा विशेषेकरून कवितेतले काही कळत नाही. पण दिपुंच्या जाण्याने मराठी साहित्य विश्वातला एक मोठा माणूस गेला एवढं नक्की जाणवलं. त्यांच्या तुकारामांच्या अभंगावरील मेहनतीची आणि कामाची दाद आणि त्याचे कौतुक दुर्गाबईंनीही केले होते.

असे लोक गेले तरी त्यांचे अस्तित्व जात नाही... सुजाण वाचक ती आठवण कायम जपून ठेवतात.

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2009 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिलीप पुरुषोत्तम चित्रेंच्या पुस्तकाचा वाचक म्हणून परिचय 'पुन्हा तुकाराम' पासून झाला. एम.ए.ला शिकत असतांना, एका लेखकाच्या अभ्यासात 'संत तुकाराम' आणि 'डॉ.भालचंद्र नेमाडे' पैकी एक लेखक अभ्यासाला घ्यायचा होता. आम्ही 'संत तुकाराम निवडला' तुकारामाच्या गाथेतून अध्यात्मिक,उपदेशात्मक,सामाजिक, वगैरे असे भाग पाडून त्याचा अभ्यास करायचा होता. पण मनाजोगते पुस्तक मिळत नव्हते. तेव्हाच 'पुन्हा तुकाराम' या पुस्तकाची भेट झाली. पुन्हा तुकारामाची 'प्रस्तावना' वाचली तर दिलीप पुरुषोत्तम चित्रे काय असावेत त्याची एक झलक त्यात पाहता येते. आमचं तुकोबावरील प्रेम [आणि अभ्यासपत्रिकेत गुण] वाढवायला या पुस्तकानं खूप मदत केली. तुकोबा केवळ वारकरी संप्रदायातला नुसता एक संत होता या पुढे जाऊन एक आगळी-वेगळी आणि अभ्यासपूर्ण ओळख 'पुन्हा तुकाराम' यात वाचायवयास मिळते. चित्रे म्हणतात उदा. पाहा....

''भक्ती ही निर्णायक जीवन पद्धतीची निवड आहे. भक्त आणि दैवत यांचे एकात्म अस्तित्व सिद्ध करणारी, जीवनातल्या प्रत्येक घटनेला आणि अनुभवाला उत्स्फूर्तपणे अर्थ देणारी श्रद्धा आहे. श्रद्धेचा अस्सलपणा आणि अढळपणा हे भक्तीचे गमक आहे. तुकोबांची गाथा हे भक्तीच्या उत्कटतेने उजळलेल्या समग्र विश्वाचे आणि मानवी आत्मभानाचे दर्शन आहे. तुकोबांचे दैवत, तथाकथीत 'तत्त्वज्ञान' किंवा 'दर्शना'ची मांडणी इत्यादींवर ह्या काव्याची श्रेष्ठता अवलंबून नाही आणि तुकोबाची संत म्हणून थोरवीसुद्धा त्यावर अवलंबून नाही. तुकोबांच्या काव्याची थोरवी त्यांच्या उद्गारसामर्थ्यात सरळच जाणवते. त्यांचे संतत्वसुद्धा त्यांच्या पारदर्शक माणुसकीत स्वच्छ दिसते. विठोबा आणि पंढरपुरची वारी हे सार्वभौम श्रद्धेचे संकेत आणि प्रतीके आहेत आणि ही श्रद्धा कोणत्याही बाह्य,मानवसदृश पण अतिमानुष ईश्वरी शक्तीवरची श्रद्धा नसून ती माणसाची स्वतःच्या अस्तित्वाच्या मूलभूत स्वायत्तेतेची जाणीव आहे. बाह्य 'विठोबा'च्या कल्पनेपासून तुकोबांनी सुरुवात केली आणि विठोबाला प्रतिबिंबित करता करताच त्यांना स्वत:च्या विठोबामय अस्तित्वात ह्या जन्मीच संपूर्ण आणि सर्व संदर्भापासून मुक्त झाल्याचा अनुभव मिळाला.''१

तुकारामांवर जागोजागी असे भाष्य पुन्हा तुकारामात वाचता येतात. तुकाराम संत आहेत. सामाजिकता, अध्यात्मिकता, उपदेश, यावर त्यांचे जसे परखड भाष्य आहे, तसे माणूसपणाची जाणीव करुन देणारा तो एक विचारवंत कसा आहे. तुकारामाची दृष्टी, सृष्टी कशी प्रगल्भ होती. तो संवेदना कशी व्यक्त करतो, या सर्वांचा परिचय चित्रे करुन देतात. संत तुकारामांचे कवी असणे,माणूस असणे,भक्त असणे,ज्ञानी असणे,संत असणे, ब्रह्मानंदी असणे, केवळ असणे, हे आणि असे सर्व असणे 'पुन्हा तुकारामात' उलगडलेले दिसतात.

सकाळीच दिलीप पुरुषोत्तम चित्रेंच्या निधनाची बातमी वाचली. आपण त्यांना पाहिलेलं नाही. ते आपले कोणीच नाहीत. आपली त्यांची ओळख नाही. पण आज 'पुन्हा तुकारामाची' अधल्या-मधल्या कोणत्याही पानावरील त्याचे विवेचन वाचतांना, आज अक्षरं अशी धुसर का दिसत आहेत, हे मात्र कळत नव्हते.

चित्रेंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

संदर्भ : १. पुन्हा तुकारामः दिलीप पुरुषोत्तम चित्रे. पृ.क्र.३८. पॉप्यूलर प्रकाशन मुंबई.

-दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

11 Dec 2009 - 9:24 pm | मुक्तसुनीत

पण आज 'पुन्हा तुकारामाची' अधल्या-मधल्या कोणत्याही पानावरील त्याचे विवेचन वाचतांना, आज अक्षरं अशी धुसर का दिसत आहेत, हे मात्र कळत नव्हते.

!!

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Dec 2009 - 9:33 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रा. डॉ... प्रतिसाद आवडला.

बिपिन कार्यकर्ते

कालिन्दि मुधोळ्कर's picture

11 Dec 2009 - 10:26 pm | कालिन्दि मुधोळ्कर

>आमचं तुकोबावरील प्रेम [आणि अभ्यासपत्रिकेत गुण] वाढवायला या पुस्तकानं खूप मदत केली.

>पण आज 'पुन्हा तुकारामाची' अधल्या-मधल्या कोणत्याही पानावरील..

:|

jaypal's picture

11 Dec 2009 - 9:30 pm | jaypal

दि पु चित्रें साठी ईथे भेटद्या

सुनिल पाटकर's picture

11 Dec 2009 - 10:00 pm | सुनिल पाटकर

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना माझीही विनम्र श्रद्धांजली

१७ सप्टेंबर १९३८ ते १० डिसेंबर २००९

अँन अँन्थाँलाँजी आँफ मराठी पोएट्री (१९६७)
आर्फियस (१९६८)
शिबा राणीच्या शोधात (१९७१)
कवितेनंतरची कविता(१९७८)
ट्रेव्हलिंग इन ए केज (१९८०)
दहा बाय दहा(१९८३)
चाव्या (१९८२)
तिरकस आणि चौकस (१९९०)
मिठू मिठू पोपट (१९८९)
सुतक (१९८९)
चतुरंग (१९९५)
पुन्हा तुकाराम ,सेज तुकाराम
आत्मचरित्रात्मक प्रवास वर्णन,काव्यसंग्रह,लेख,लघुकादंबर्‍या संकलन,नाटके स्फुट लेखन,चित्रपट कथा लेखन.
विनम्र श्रद्धांजली

धनंजय's picture

13 Dec 2009 - 8:22 pm | धनंजय

प्रतिसादांमधूनही माहिती कळली.
विनम्र आदरांजली.

भोचक's picture

14 Dec 2009 - 12:11 pm | भोचक

दिपुंना आदरांजली.
दिपुंचे मैत्र केवळ मराठी कवी नव्हती. त्यांची कविता महाराष्ट्र लंघून जगापर्यंत पोहोचली होती. त्यांच्या महाराष्ट्राहाबाहेरील सुह्रदांनी त्यांना वाहिलेली ही आदरांजली.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव