अजीब दास्ता हैं ये..... मध्य

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
8 Dec 2009 - 6:37 pm

गाण्याच्या नादात..... का ठंडी हवाच्या नादात दिशा स्टेशनवर पोचली, गाडी स्टँडवर चढवून दोन नंबरवर जायचे म्हणून पुलाकडे वळली खरी पण मन काही पुढे जाईना. काळजात हुरहुर, पोटात फुलपाखरे उडत होती. " ए लडकी, आज बहोत नादान बन रही हो. नक्को करू ऐसा..... क्यूं न करू? मेरी जान तुझे तो सब पता हैं, फीर भी...?" स्वतःशीच अविरत चालणारा झगडा पुन्हा जोर धरत होता. तोच कोणीतरी हाक मारतेय असे वाटून दिशा वळली आणि पाहते तो काय समोर संपूर्ण ग्रुप उभा अन मधोमध समीर.

माझा आवडता पांढरा शुभ्र चिकनचा झब्बा, नुकतीच अंघोळ केली असावी - त्यामुळे तकाकणारा चेहरा, तेच जीवघेणे स्माईल, डोळ्यात आर्जव...... आईगं, का जीव घेतो आहेस असा माझा समीर. " दिशू, पुलाकडे नको इकडे वळव पावलांना. अग या गाड्यांच्या गोंधळात अन मरणाच्या गर्दीत कुठे निघालीस? आम्ही सगळ्यांनी दांडी मारायचे ठरवलेय, शिवाय हा सम्याही अचानक उगवलाय तेव्हा मस्त धमाल करूयात. याला पिडूयात. रजतच्या घरी कोणी नाहीये. त्याच्या नवीन नोकरीची प्री-पार्टी आज उकळूयात. तुझीच वाट पाहत होतो, चल चल. " अनुजा उत्साहाने चिवचिवत होती.

बापरे! दिशा आज तू गयी काम सें. हे लोक तुला सोडणार नाहीत. समीर बोलत नाहीये काही पण या सगळ्यांना यानेच फूस लावली असावी. अनुजाचा उत्साह बरोबरच आहे, पण माझे काय? समीर संध्याकाळी पाच मिनिटे एकटा भेटला असतास....... तेवढेच पुरेसे होते रे मला. आता दिवसभर समोर असशील, तुझ्या नेहमीच्या पद्धतीने सगळ्यांना अवतींभोवती नाचवशील मला मात्र अवघडल्यासारखे होईल. काय, काय करते आहेस दिशा? आधीच तुझा चेहरा पारदर्शी आहे. सगळे कसे टक लावून वाचायचा प्रयत्न करत आहेत बघ तुला. टर्न बेबी टर्न.

रुमालाने चेहरा, केसांवरचे पावसाचे बिंदू अन सम्याची ओढ टिपत लटक्या रागाने, " सम्या या सगळ्यांना माहीत होते ना तू येणार आहेस ते? अन मला पहाटे चार पासून कॉलून नुसते भंडावून सोडलेस. थांब आज तुला कशी धोपटते बघ. अनुजा तू पण हात धुऊन घे गं. चला लेको, आता तुम्ही सगळे तयारीनिशी आला आहात तेव्हा आपली सपशेल शरणागती. असेही ' मरे ' मेलीच आहे, सायबाला सांगते मी लटकलेय. ना इस स्टेशन में ना उस स्टेशन में बीचमेही अटकलेय. आणि आमच्या मातोश्रींनाही.... " तिला मध्येच थांबवत, " अग काकूंना सम्याने सांगितले सुद्धा, तुमच्या लेकीला पळवून घेऊन जातोय म्हणून. दिशा तुझी आई म्हणजे, एकदम कूल आहे गं. समीरला म्हणाली, तूच पळवतो आहेस ना? मग मला काळजी नाही. नाहीतर आमच्या मातोश्री, हजार प्रश्न विचारतील. " अनुजाची गाडी पुन्हा सुरू झाली.

ममा म्हणजे पण कमाल आहे अगदी. आणि हा समीरपण ना...... दिशाने त्याच्याकडे पाहिले तर तो टक लावून तिच्याकडेच पाहत होता. आरपार उतरत जाणारी नजर, नो नो समीर आता पुरे. आता लाइट मूडमे जानाही पडेगा. नाहीतर ये बेइमान आँखे भांडा फोड देगी. " अनुजा, आता इथेच गर्दी करत उभे राहायचे का? लेडीज डब्बा समोरच आहे, अचानक एकवर गाडी लावतील अन मी पटकन उडी मारून तुम्हा सगळ्यांना टुकटुक करून पळून जाईन हं. मग मला दोष देऊ नका. तेव्हा हला इथून. रजतकडेच जायचे ना रे? गाड्या कोणी कोणी आणल्यात?" " दिशा अगं निमा, दिल्या व रजतला कॉंट्रॅक्ट बसवरून उचलून आणल्याने त्या तिघांकडे गाडी नाही. समीरची बाइक बरेच दिवसात चालवली नसल्याने रुसलीये. या तिघांना घ्या रे कोणीतरी वाटून. मी रजतला घेतो, मुद्देमाल आपल्याकडे हवा बाबा. आम्ही दोघे होतो पुढे तुम्ही यारे मागोमाग. " असे म्हणून श्री रजतला घेऊन निघालाही.

मिळालेली सुटी, अचानक आलेला समीर आणि संपूर्ण ग्रुप जमल्याने सगळ्यांचा मूड मस्त बनत चाललेला. भराभर गाड्या निघाल्या. अनुजा समीर, दिशाला निमा चिकटलेली, दिल्याला रेश्माने पाणीपुरी खिलवशील असे वदवून लिफ्ट देऊ केलेली. सई, अशोक आणि केतन आपापल्या गाड्या घेऊन पुढे सटकलेही. स्टेशनच्या हाणामारीतून बाहेर पडून एकमेकाच्या टप्प्यात आले. तलावपाळीला प्रदक्षिणा घालता घालता अनुजाने मध्येच गाडी थांबवली. मागोमाग सगळे थांबले. " काय अनुजा, आता इथे कशाला स्टॉप?" केतन वैतागला. एकतर सगळ्यांना भुका लागलेल्या. " अरे थांब रे जरा केतन, निमा, दिशा या ना पटकन. आख्खी पाटीच घेऊयात का?" असे म्हणत अनुजा तरातरा चालू लागली. पाहिले तर ती गजऱ्यांनि भरलेल्या पाटीशी पोचलेली. पोरांनी कठीण आहे रे या मुलींचे, कधीही कुठेही यांना काहीही दिसते की निघाल्या, वगैरे सुरवात केली. मोगऱ्याच्या टपोऱ्या कळ्यांनी गच्च विणलेले गजरे निमा व अनुजाने घेतले. दिशाने चमेलीच्या अर्धवट उमललेल्या कळ्यांनी गुंफलेले संपूर्ण गुंडाळेच उचलले.

सगळे पुन्हा आपापल्या गाड्यांवर बसले तोच समीर गुणगुणतोय असे वाटून दिशा कान देऊन ऐकू लागली. समीर खरेच गुणगुणत होता. दिशाचे आवडते गाणे, नेमके आज. आत्ताच.....

रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन ...

जब घुंघरुओं सी बजती हैं बूंदे,
अरमाँ हमारे पलके न मूंदे
कैसे देखे सपने नयन, सुलग सुलग जाए मन.......

क्रमश:

सुरवात येथे वाचा: http://misalpav.com/node/10448

शेवट येथे वाचा: http://misalpav.com/node/10472

कथा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

8 Dec 2009 - 6:42 pm | श्रावण मोडक

चित्रपट पाहतोय...

मेघवेडा's picture

8 Dec 2009 - 7:15 pm | मेघवेडा

चांगला झालाय .. वाचतोय .. पुढचा भाग टाका पटपट!

--

मेघवेडा.

लवंगी's picture

8 Dec 2009 - 7:35 pm | लवंगी

वाचतेय..

लवंगी's picture

8 Dec 2009 - 7:35 pm | लवंगी

वाचतेय..

रेवती's picture

8 Dec 2009 - 8:34 pm | रेवती

नेहमीसारखेच छान लिहिले आहे!
आणि गजरे? किती वर्षे झाली गजरा पाहूनसुद्धा!
आता दिवसभर मोगर्‍याच्या गजर्‍याची आठवण येत राहणार!
तसंही टिचभर केसांमुळे गजरे पाहूनच समाधान मानते.

रेवती

भानस's picture

8 Dec 2009 - 8:37 pm | भानस

रेवती बरे झाले लक्षात आणून दिलेत..... चुकून क्रमशः टाकायचे राहूनच गेलेय. शेवट टाकते आहेच.
प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे अनेक आभार.:)

jaypal's picture

8 Dec 2009 - 8:55 pm | jaypal

"असेही ' मरे ' मेलीच आहे, सायबाला सांगते मी लटकलेय. ना इस स्टेशन में ना उस स्टेशन में बीचमेही अटकलेय. आणि आमच्या मातोश्रींनाही...."
दिशाचं यथार्थ वर्णन या पेक्षा वेगळं ते काय असणार. विश्वास ठेवा खुप म्हणजे खुप हळवं केलत.(मनात एकच गाण सारख वाजतय= दिल ऐसा किसीने मेरा तोडा/ बर्बादी कि तरफ ऐसा मोडा/......... सागर कितना मेरे पास है/ मेरे जिवन मे फीर भी प्यास है/)

स्वाती२'s picture

8 Dec 2009 - 9:12 pm | स्वाती२

वाचतेय..

sneharani's picture

9 Dec 2009 - 10:57 am | sneharani

पुढचा भाग पटकन येऊ दे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Dec 2009 - 12:45 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त आहे.पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

Meghana's picture

9 Dec 2009 - 5:03 pm | Meghana

पुढिल भागाची.

भानस's picture

10 Dec 2009 - 4:43 am | भानस

सगळ्या वाचणार्‍यांचे व प्रतिक्रियांचे अनेक धन्यवाद. लोभ असू द्यात.:)