सुट्टी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
2 Dec 2009 - 11:04 am

दिवसाची सुरवात तर मस्त झाली होती.
खुप दिवसानी पुर्ण दिवस सुट्टीचा योग जुळुन आला होता.
आंघोळ करुन परत ताणुन देण्याचा विचार होता.
खमंग थालीपीठाचा वास खुणावत होता.
"पाणी काढलय, ब्रेकफास्ट करुन घे"
आतुन साद आली.
'आनंदाचे डोही आनंद तरंग' हे आवडते गाणे गुणगुणत तो स्नान गृहाकडे निघाला.
देवपुजेला तुळस आणि फुले काढताना अंथरुणावर ठेवलेला लेंगा झब्बा त्याला दिसला.
कुणीतरी पाहूणे येतात की काय?
कालच ठरल होते.
विझीट टु पास्ट विदाउट एनी कॉम्प्रमाईज.
" अरे अल्पी येतेय"
???
"माझी शाळेतली मैत्रीण. लग्नाला आली होती. तु तीला 'सुबक उंच' म्हणाला होतास आठवते. जेउन जाईल"
दुपारचे का रात्रीचे?
"फक्त चार तास असेल"
ठीक आहे. तो पर्यंत मी एक मॉर्नीग शो बघुन येतो. उगाच माझी अडचण नको तुमच्या शॉप टॉक मधे.
" तुझे आपले काहीतरीच. तीला लग्नाची मुलगी आहे"
काय संबंध? नोट्स कंपॅरिझन होणारच.
काय करते ही कल्पी?
"अल्पी ही एक सायकॉलॉजिस्ट आणि काउंसेलर आहे ."
डेंजरस कॉम्बिनेशन.
"एच्.आय.व्ही. दिवसानिमित्त ती एका कॉन्फरन्स ला आली आहे दोन दिवसाकरता. भेटुन जा"
अल्पीत फारसा फरक पडला नव्हता. वयाच्या खुणा अगदी पुसट.
नमस्कार चमत्कार, थोडे फार संभाषण झाल्यावर तो बाहेर पडला.
निंजा असॅसिन बघताना घरातल्या असॅसिन ची आठवण त्याला अस्वस्थ करत होती.
काय पुड्या सोडणार ही बया कुणास ठाउक?
घरी आल्यावर बायकोचा चेहेरा वेगळाच दिसत होता.
"एक विचारु का"?
स्पष्ट विचार. जिलेबी न करता.
"म्हणजे"?
जिलेबी कुठुन सुरु होते कुठे संपते ते कळत नाही.
"अल्पी म्हणत होती की तु जंटलमन आहे"
(जिलेबी सुरु झाली होती)
कशावरुन?
"बाहेर जाताना तु तीला वळुन बघीतले नाहीस".
वेडा आहे का मी?
"तुझ्या नजरेत दु:शासन दिसला नाही तीला."
आयला, कठीण आहे तुझ्या कल्पीचे. प्रश्न काय?
लग्नानंतर तुझे काही अफेअर होते का रे?
नाही. आतापर्यंत नाही. उद्याचे माहीत नाही. पण दोनदा योग जुळुन आला होता मी काही ही न करता. अगदी सिल्वर प्लॅटर वर. पण नको वाटले. अफेअर फुकटात होत नाहीत. त्याला पैसा खर्च करावा लागतो. शिक्षणासाठी राखुन ठेवलेला अफेअर वरती खर्च करावा हे पटले नाही.
"माझा विश्वासघात वगैरे"?
(काय उत्तर द्यावे)
नाही.
(चेहेर्‍यावर निराशा)
"पण पुरुष अशी लफडी करतातच कशाला"?
बरीच कारणे असतात. शारिरीक, मानसिक, आर्थिक, भौगोलिक,इगो मॅनिफेस्टेशन व इतर. आणि ह्यात स्त्री आणि पुरुष दोघेही जबाबदार असतात.
आणि अल्पीला म्हणावे पुरुष एकटाच लफडे करत नाही. लफडे करायला एक स्त्री पण लागते. नाही का?
"अय्या हे लक्षातच नाही आले".
असे काही झाले तर ना पहील्यांदा तुला सांगीन, अंधारात ठेवणार नाही.
"इतके दिवसात केले नाहीस आता काय करणार आहेस तु"?
डोंट बी सो शुअर. आणि मी नाही म्हटले ते नाहीच हे कशावरुन. अल्पीने प्रमाणपत्र दिले म्हणुन. असे प्रामाणिक मुखवटे ओढणे अगदी सोप्पे असते.
हम्म.
तुला मिळाले का उत्तर. आता मी मोबाईल बंद करतो. तु दरवाजाची बेल बंद कर.
जाता जाता: एक स्त्री प्रधान मान्यवर संस्थेचा सर्वे:
लग्न झालेला पुरुष दर दोन महीन्याला स्वःताचे कपडे (बनियन वगैरे) स्व:त घ्यायला लागला की ओळखावे तो अफेअर मधे अडकलेला आहे.
ये तो बडा टॉइंग है.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Dec 2009 - 11:13 am | ब्रिटिश टिंग्या

मास्तर काय सुधारणार नाय! :)

विंजिनेर's picture

2 Dec 2009 - 11:23 am | विंजिनेर

अरेच्या!! म्हंजे 'त्याच्या' वाटचं थालिपिठ अल्पीनं हादडलन् काय? आणि वर कान फुंकुन गेली ... छ्या..

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Dec 2009 - 11:29 am | llपुण्याचे पेशवेll

बोधकथा छान. अल्पी बरी होती ना! पुढं...
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

टारझन's picture

2 Dec 2009 - 11:59 am | टारझन

तो बडा टॉईंग है !
पहिल्यांदा बरंच बाउंसर गेलं .. मग उलटं वाचलं .. मंग झेपलं !

-नालायक टारू

घाटावरचे भट's picture

2 Dec 2009 - 12:35 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो. तसंही मास्तरांचं निम्मं लेखन आमच्या डोक्यावरून जातं. असो.

- (मंदबुद्धी) भट

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 11:38 am | श्रावण मोडक

खरंय. मास्तर काही सुधारणार नाही.
बाय द वे, या लेखनातील विचारांना थेअरी म्हणावं की थेरं?

दशानन's picture

2 Dec 2009 - 12:00 pm | दशानन

+१

असेच म्हणतो.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Dec 2009 - 12:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
श्रावण काका, पुन्हा एका प्रतिसादात शेंचुरी!

अदिती

विनायक प्रभू's picture

2 Dec 2009 - 2:17 pm | विनायक प्रभू

अपनी अपनी

सहज's picture

2 Dec 2009 - 12:16 pm | सहज

>खुप दिवसानी पुर्ण दिवस सुट्टीचा योग जुळुन आला होता.

नियमीत सुट्या घेत जाणे म्हणजे मग कोणी अल्पी किंवा गृहशोभिका किंवा कुठला सर्व्हे असल्या जिलब्या घरात पाडू शकणार नाही.

विंजिनेर's picture

2 Dec 2009 - 12:42 pm | विंजिनेर

=))
हे खरे समुपदेशन.
मास्तुरे, होशियाऽऽर .. रात्र वैर्‍याची आहे ;)

श्रीयुत संतोष जोशी's picture

2 Dec 2009 - 12:29 pm | श्रीयुत संतोष जोशी

छान आहे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

गणपा's picture

2 Dec 2009 - 12:39 pm | गणपा

मास्तर मास्तर जबरा लेख मानल ब्वॉ..
श्रामो नेहमी प्रमाणे अव्वल प्रतिसाद..=))

-माझी खादाडी.

अवलिया's picture

2 Dec 2009 - 1:18 pm | अवलिया

छान !

--अवलिया

मिसळभोक्ता's picture

2 Dec 2009 - 2:24 pm | मिसळभोक्ता

मास्तर,

तू माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी सीनियर. आणि इथल्या इतर बहुसंख्य सभासदांच्या बापाएवढा.

आता हे सगळे लोढणे बाळगत असताना, तू अशी लफडी का करतोस ?

कोण ती अल्पी, आणि कोण कोण, त्यांच्याशी काय ते एकदा रिलेशन(*) एस्ट्याब्लिश कर, आणि मोकळा हो ना ! इथल्या बाल-सभासदांना (इन्क्लुडिंग मालक) कशाला त्रास देतोस ?

एकंदरीत तुझे लेखन बघता, कौन्सेलिंग (समुपदेशन म्हटले तर उगाच उचक्रमावर असल्यासारखे वाटते) ची गरज तुलाच अधिक आहे असे वाटते.

मास्तर, तू एकदा शांत बस (दारू न पीता, अल्कोहोलचे प्रमाण ०.०८% च्या खाली आण), आणि मग बघ काउंसेलिंगची गरज खरी कुणाला आहे, ते. वाटल्यास मला फोन कर.

- तुझाच प्रेमळ मिभो

बाय द वे (*) म्हणजे तुला कळलेच असेल. नसल्यास तू काउन्सेलर होण्याच्या लायकीचा नाहीस.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विजुभाऊ's picture

2 Dec 2009 - 2:37 pm | विजुभाऊ

जाता जाता: एक स्त्री प्रधान मान्यवर संस्थेचा सर्वे:
लग्न झालेला पुरुष दर दोन महीन्याला स्वःताचे कपडे (बनियन वगैरे) स्व:त घ्यायला लागला की ओळखावे तो अफेअर मधे अडकलेला आहे.
ये तो बडा टॉइंग है.

सहमत असू शकतो
रंगबीरंगी या नावाच्या (अमोल पालेकर /परवीन बाबी / दीप्ति नवल/देवेन वर्मा) सिनेमात म्हंटले आहे की
जेंव्हा नवरा अचानक रोमॅन्टीक वागायला लागतो/बायकोची जास्तच काळजी घ्यायला लागतो तेंव्हा ओळखावे की तो बाहेर जे प्रयोग करणार आहे त्याची रीहर्सल घरी करतोय म्हणून
( आता गटण्या बहुतेक एखादा एका ओळीचा धागा काढणार.... "तुम्ही बनियन किती दिवसानी बदलता ?" म्हणून )

विनायक प्रभू's picture

2 Dec 2009 - 2:30 pm | विनायक प्रभू

मी कौंसेलर आहे असे कुठे आणि केंव्हा म्ह्टले आहे ते दाखवुन दे बघु.
उलट ही मंडळी डेंजरस असतात असे मी म्ह्टले आहेत हे तु वाचले नाहीस का?
असो.
राहता राहीली माझ्या कौंसेलींग ची व्यवस्था.
कधी येतोस ते सांगुन ठेव.
म्हणजे वेळ काढायला हवा ना.

मिसळभोक्ता's picture

2 Dec 2009 - 2:41 pm | मिसळभोक्ता

मास्तर, तुम्ही फसलात !

साखर साखर साखर !!!

असो, वेळ काढूच...
बेटर लक (टू मी) नेक्स्ट टाईम..

अ‍ॅज यू नो, आय हॅव् हॅड सेवरल बॅड एक्स्पीरियन्सेस् देयर..

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

समंजस's picture

2 Dec 2009 - 4:08 pm | समंजस

मस्त :)

संजा's picture

2 Dec 2009 - 4:44 pm | संजा

खुपच छान

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2009 - 5:32 pm | परिकथेतील राजकुमार

लै भारी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

स्वाती२'s picture

2 Dec 2009 - 6:17 pm | स्वाती२

>>अल्पी म्हणत होती की तु जंटलमन आहे
सर्टिफिकेट देऊन बर्‍याच काड्या लावून गेली की अल्पी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2009 - 6:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>सर्टिफिकेट देऊन बर्‍याच काड्या लावून गेली की अल्पी.
असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

प्रभो's picture

2 Dec 2009 - 8:21 pm | प्रभो

जबहरा...चार वेळा वाचल्यावर काहीतरी समजलं....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

चतुरंग's picture

2 Dec 2009 - 8:37 pm | चतुरंग

अल्पी, कल्पी असलं काहीही लपत नाही बायकांपासून. लई चाणाक्ष असतात त्या.
"इतके दिवसात केलं नाहीस आता काय करणार तू?"
:D
हॅ हॅ हॅ. हे बी लई डेंजर चॅलेंज असतया! म्हणजे तुम्हाला वाटले पाहिजे की 'मेरे पौरुष को ललकारा?' आता करुनच दावतो काहीतरी आणि त्याचवेळी लई बारीक नजर असतिया हां! मास्तुरे जपून र्‍हावा!! ;)

का कोण जाणे 'नवर्‍याच्या पिवळ्या गंजीफ्राकची पर्वा न करता त्याच्या कुशीत शिरते तीच त्याची वहिदा!' असं एक वाक्य वपुंच्या एका कथेत वाचलेलं आठवलं. ;)

(आपले आपण गंजीफ्राक विकत न घेणारा)चतुरंग

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 8:40 pm | श्रावण मोडक

याला प्रतिसाद म्हणावं की कौन्सेलींग? :)

तुम्ही जर अल्पी, कल्पीवाले असाल तर काऊंसेलिंग, पिवळा गंजीफ्राकवाले असाल तर प्रतिसाद!! ;)

(भोकाभोकांचा गंजीफ्राकवाला)चतुरंग

प्रभो's picture

2 Dec 2009 - 9:05 pm | प्रभो

भोकाभोकांचा गंजीफ्राक वरून मला शेवेचा जोक आठवला...

=)) =))

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

चतुरंग's picture

2 Dec 2009 - 9:12 pm | चतुरंग

मला वाटलंच कोणालातरी तो आठवणार म्हणून!!! =)) =))

(फक्त सोर्‍यातूनच शेव पाडणारा)चतुरंग

टारझन's picture

2 Dec 2009 - 9:32 pm | टारझन

=)) =)) =)) =)) नेमकं तेच आठवलं !!

(फक्त सोर्‍यातूनच चकल्या पाडणारा) चक्लुरंग

श्रावण मोडक's picture

3 Dec 2009 - 1:15 am | श्रावण मोडक

चालू द्या... नगाला नग मिळाला असं म्हणतात ते आठवलं... ;)

शेखर's picture

3 Dec 2009 - 7:26 am | शेखर

>> फक्त सोर्‍यातूनच चकल्या पाडणारा

टार्‍या, सोर्‍या बिघडलेला असेल तर , चकली ऐवजी पापडी बनायची ;)

प्रभो's picture

3 Dec 2009 - 9:12 am | प्रभो

अरे नाय....मग बासुंदी...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 9:07 pm | श्रावण मोडक

अगदी, अगदी... ;)

टारझन's picture

2 Dec 2009 - 10:01 pm | टारझन

का कोण जाणे 'नवर्‍याच्या पिवळ्या गंजीफ्राकची पर्वा न करता त्याच्या कुशीत शिरते तीच त्याची वहिदा!'

जगदंब जगदंब !! आता रंगाकाकांच्या नावाने होतोय गावभर शिमगा =))

बरी वपुंनी "मात्रा" लावली नाही ;)

- फालुदा

मुक्तसुनीत's picture

3 Dec 2009 - 7:40 am | मुक्तसुनीत

लेख नेहमीप्रमाणे रोचक आहे.

मात्र कुणाच्या दृष्टीने "परत वळून न पाहिल्यामुळे" एखादी व्यक्ती जंटलमन ठरत असेल तर "सायकॉलॉजिस्ट कम काऊन्सेलर"ची विश्वासार्हता क्वेश्चनेबल आहे हे नि:संशय.