घरच्या घरी KFC.

गणपा's picture
गणपा in पाककृती
14 Nov 2009 - 4:57 pm

गेल्या आठवड्यात एका मित्राने विचारल होत की KFC च चिकन कस बनवतात ते महिती आहे का रे ?
हा प्रकार कधी घरी करुन पाहिला नव्हता पुर्वी. म्हटलं ट्राय करुन पहायला काय हरकत आहे.
गुगलुन कृती शोधली.
पहिलाच प्रयत्न त्यामुळे अगदी KFC सारखे निट नाही जमले, पण जे काही झालय ते शेअर करतोय..

साहित्य:
चिकनचे मोठ्या आकारचे तुकडे. (मी तंगड्या वापरल्यात.)
१ अंड.
१ कप दुध.
२ कप मैदा.
१ चमचा आल-लसुण पेस्ट.
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा लाळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.

कोलसॉ साठी:
१ गाजर, कोबी, मेयॉनिस, घट्ट दही, साखर, १ चमचा लिंबाचा रस/ व्हिनेगर.
गाजर किसुन घ्याव. कोबी बारीक चिरुन घ्यावा.
एका भांड्यात किसलेल गाजर कोबी आणि वरील साहित्य निट एकत्र करुन घ्याव.

कृती:


चिकन साफ करुन धुवुन त्याला टुथपिकने टोचे मारुन घ्यावे.


एका भांड्यात पाणि घेउन त्यात १/२ चमचा मीठ ताकुन चिकनचे तुकडे त्यात १/२ तास मुरत ठेवावे.


१/२ तासाने पाण्यातुन बाहेर काढुन पेपर नॅपकीनने/ स्वच्छ कपड्याने पुसुन घ्यावे.
त्याला आल-लसुण पेस्ट,लाल तिखट लावुन परत १०-१५ मिनिटं मुरत ठेवाव.


एका भांड्यात चवी नुसार मिठ टाकुन अंड फेटुन घ्याव. त्यात दुध टाकुन परत एकजीव करुन घ्याव.


दुसर्‍या भांड्यात मैदा, मीठ, काळीमिरी पुड एकत्र करुन घ्याव.

कढईत तेल तापवत ठेवाव. एकदम कडकडीत तापवुनये.
चिकनचा एक पीस आधी अंड्याच्या मिश्रणात घोळवुन मग पीठात घोळवावा. मग परत अंड्याच्या मिश्रणात घोळवुन मग पीठात घोळवावा.
ही घोळवण्याची क्रिया ३-४ वेळा करावी.

मध्यम आचेवर सगळे तुकडे गोल्डन ब्राउन होइस्तो खरपुस तळुन घ्यावे.

कोलसॉ बरोबर सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

14 Nov 2009 - 4:59 pm | ऋषिकेश

मार डाला!

(मृत)ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

सुनील's picture

14 Nov 2009 - 5:17 pm | सुनील

झक्कास.

एक शंका - अंडे अख्खे घ्यावे की फक्त पांढर भाग? कारण पिवळ्या बलकाची एक विशिष्ठ अशी चव चिकनला येईल, असे वाटते,

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

झंडुबाम's picture

14 Nov 2009 - 5:21 pm | झंडुबाम

काय बोलू यार्.एक से एक वसूल पाकॄ.
लोक सहज गाणी गुणगुणतात तसा तू सहज एक एक डिश बनवतो यार.

(चिकनप्रेमी )झंडु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Nov 2009 - 5:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लोक सहज गाणी गुणगुणतात तसा तू सहज एक एक डिश बनवतो यार.

अगदी!
गणपाशेट, शाकाहारी असले तरी या डीशमुळे मुद्दाच शाकाहारी बर्गरची पाकृ शोधली. (करणार कधी वगैरे विचारू नका!)

अदिती

सहज's picture

14 Nov 2009 - 5:41 pm | सहज

तुमचं गुगल वेगळं आहे का रे? आमच्या कडच्या गुगलने वेगळी रेशीपी दिली. कर्नल सँडर्स अंकलनी एक स्पेशल हर्ब मिक्स केले होते म्हणे. :-)

सॉरी ही "के एफ सी" रेसीपी वाटत नाही. हे एक साधे फ्राईड चिकन दिसतेय रे!

http://www.kfcchickenrecipe.com/kfc-fried-chicken-recipe.html

देवदत्त's picture

14 Nov 2009 - 7:53 pm | देवदत्त

मस्त :)
भूक लागली हे पाहून :(

पहिलाच प्रयत्न त्यामुळे अगदी KFC सारखे निट नाही जमले, पण जे काही झालय ते शेअर करतोय
सॉरी ही "के एफ सी" रेसीपी वाटत नाही. हे एक साधे फ्राईड चिकन दिसतेय रे!

KFC स्वत:ची रेसिपी जगजाहीर करत नाही असे ऐकले होते. मग त्यांच्यासारखेच बनू शकेल का? अर्थात त्यापेक्षाही चांगले बनू शकेल ;)

विंजिनेर's picture

14 Nov 2009 - 7:22 pm | विंजिनेर

मैद्यापेक्षा ब्रेड क्रंम्ब्स वापरावे. शिवाय तळण्याआधी तेल अगदी कडकडीत तापले पाहिजे. या दोन बदलामुळे चिकन आणखी छान कुरकुरीत लागेल.

विसोबा खेचर's picture

14 Nov 2009 - 7:35 pm | विसोबा खेचर

वॉव! :)

सुधीर काळे's picture

14 Nov 2009 - 7:48 pm | सुधीर काळे

गणपाशेठ,
मागे एकदा Readers' Digest मध्ये एक फ्रेंच आचार्‍याने दिलेल्या टिप्स वाचल्या होत्या व त्या, कां कुणास ठाऊक, माझ्या चांगल्या लक्षात राहिल्या आहेत.
१. कढई कडकडीत गरम होईपर्यंत त्यात तेल घालू नये. म्हणजे थंड कढईत आधीच तेल किंवा तूप घालून मग ती कढई गरम केल्यास पदार्थांना 'तशी' चव येत नाहीं. (या मुद्द्याला माझ्या पत्नीची मान्यता नाहीं.)
२. तेल कडकडीत गरम होईपर्यंत त्यात तळणी घालू नये! म्हणजे लहनपणी आईला मोहरीचे २-३ दाणे/बिया घालून तिचे तडतडणे चालू झाल्यावरच त्यात भाज्या किंवा वरण घालताना पाहिले आहे.
खरे काय?
अवांतरः स्वहस्ते स्वयंपाक करण्याच्या बाबतीत मी मोठे शून्य (Big Zero) आहे. पण पोलाद बनविणे म्हणजे एक प्रकारचा स्वयंपाकच आहे व तो मला झकास जमतो. म्हणून सेवानिवृत्तीनंतर पाककलेची उपासना करायचा निर्धार आहे. (माझी पत्नी म्हणते कीं स्वयंपाक करावा लागू नये म्हणून मी सेवानिवृत्ती नेहमी पुढे ढकलतो!)
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

लवंगी's picture

14 Nov 2009 - 7:56 pm | लवंगी

फ्राईड चिकन मस्त..
खरच, फार उत्साह आहे बाबा तुझ्यात.. थोडा उसना घ्यावा म्हणते...

स्वाती२'s picture

14 Nov 2009 - 8:35 pm | स्वाती२

चांगला प्रयत्न! पण हर्ब मिक्स शिवाय मजा नाही. हे ट्राय करुन बघा.
http://www.e-rcps.com/pasta/main/fowl/chick_kfried.shtml

गणपाशेठ,
मागे एकदा Readers' Digest मध्ये एक फ्रेंच शेफने (chef) दिलेल्या टिप्स वाचल्या होत्या व त्या, कां कुणास ठाऊक, माझ्या चांगल्या लक्षात राहिल्या आहेत.
१. कढई कडकडीत गरम होईपर्यंत त्यात तेल घालू नये. म्हणजे थंड कढईत आधीच तेल किंवा तूप घालून मग ती कढई गरम केल्यास पदार्थांना 'तशी' चव येत नाहीं. (या मुद्द्याला माझ्या पत्नीची मान्यता नाहीं.)
२. तेल कडकडीत गरम होईपर्यंत त्यात तळणी घालू नये! म्हणजे लहनपणी आईला मोहरीचे २-३ दाणे/बिया घालून तिचे तडतडणे चालू झाल्यावरच त्यात भाज्या किंवा वरण घालताना पाहिले आहे.
खरे काय?
अवांतरः स्वहस्ते स्वयंपाक करण्याच्या बाबतीत मी मोठे शून्य (Big Zero) आहे. पण पोलाद बनविणे म्हणजे एक प्रकारचा स्वयंपाकच आहे व तो मला झकास जमतो. म्हणून सेवानिवृत्तीनंतर पाककलेची उपासना करायचा निर्धार आहे. (माझी पत्नी म्हणते कीं स्वयंपाक करावा लागू नये म्हणून मी सेवानिवृत्ती नेहमी पुढे ढकलतो!)
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

फोटो बघितल्या नंतर मी पहिल्यादा जेवुन आलो.मग हा प्रतिसाद लिहला आहे. कृपया पाकृ. व फोटो भारतातल्या जेवणाच्या वेळेनंतर टाकत चला.काय त्रास होतो ह्याची तुम्हाला कल्पना नाही.
आता हे कोलसॉ कसे करायचे ते एकदा सांगा म्हणजे झाले.

वेताळ

स्वाती२'s picture

14 Nov 2009 - 8:54 pm | स्वाती२

सांगितलय की त्यांनी
कोलसॉ साठी:
१ गाजर, कोबी, मेयॉनिस, घट्ट दही, साखर, १ चमचा लिंबाचा रस/ व्हिनेगर.
गाजर किसुन घ्याव. कोबी बारीक चिरुन घ्यावा.
एका भांड्यात किसलेल गाजर कोबी आणि वरील साहित्य निट एकत्र करुन घ्याव.

प्रभो's picture

14 Nov 2009 - 9:13 pm | प्रभो

गणप्या, लै जबहरा बाबा....या वीकांती ट्राय मारायला हरकत नाही...

साला, काल पोळ्या करताना फायर अलार्म वाजला अन तू एवढा तेलाचा घाणा सोडायला सांगतोय्स.... :) =))

बाय द वे, भारतात परतताना स्टॉप ओवर नायजेरियात घ्यावा म्हणतो.... :)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्राजु's picture

14 Nov 2009 - 9:18 pm | प्राजु

सह्ही!!
:)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

आशिष सुर्वे's picture

14 Nov 2009 - 9:55 pm | आशिष सुर्वे

भारतात परतताना स्टॉप ओवर नायजेरियात घ्यावा म्हणतो....

>> परत येताना गणपालाही इथे घेऊन या .. ;)

गणपा ओगा..
तोडलंस रे लेका.. तोडलंस!!

एशे..

-
कोकणी फणस

अविनाशकुलकर्णी's picture

15 Nov 2009 - 11:55 am | अविनाशकुलकर्णी

मला एक मेल आली होति ..के.एफ सी चिकन बद्दल ति वाचली अन चिकन खाविशी वाटेना
==========================================
Guys beware of this stuff when u check this mail may be u wil not like me but this is an eye opener for our guys in india especially teens who are banking nowadays on fast food this is what KFC sells

Horrible N Fact about KFC

KFC has been a part of our American traditions for many years. Many people, day in and day out, eat at KFC religiously. Do they really know what they are eating? During a recent study of KFC done at the University of New Hampshire, they found some very upsetting facts. First of all, has anybody noticed that just recently, the company has changed their name?

Kentucky Fried Chicken has become KFC. Does anybody know why? We thought the real reason was because of the "FRIED" food issue.

IT'S NOT! !

The reason why they call it KFC is because they can not use the word chicken anymore. Why? KFC does not use real chickens. They actually use genetically manipulated organisms. These so called "chickens" are kept alive by tubes inserted into their bodies to pump blood and nutrients throughout their structure. They have no beaks, no feathers, and no feet. Their bone structure is dramatically shrunk to get more meat out of them. This is great for KFC.

Because they do not have to pay so much for their production costs. There is no more plucking of the feathers or the removal of the beaks and feet. The government has told them to change all of their menus so they do not say chicken anywhere. If you look closely you will notice this. Listen

to their commercials, I guarantee you will not see or hear the word chicken. I find this matter to be very disturbing.

I hope people will start to realize this and let other people know. Please forward this message to as many people as you can. Together we make KFC start using real chicken again.

From Blogger Pictures" alt="" />

From Blogger Pictures" alt="" />

देवदत्त's picture

15 Nov 2009 - 12:10 pm | देवदत्त

government has told them to change all of their menus so they do not say chicken anywhere. If you look closely you will notice this
काय राव, KFC च्या संकेतस्थळावरच तर किती मेनू आहेत चिकनचे.
मुख्य तर हा

इतर काही प्राणी पक्षी ते वापरत असतील जसे बीफ टर्की,
पण जर खरोखरंच ते चिकन वापरतच नसतील तर ह्या मेनू मध्ये ही दाखवले नसते.

टारझन's picture

15 Nov 2009 - 12:22 pm | टारझन

देवदत्त शी सहमत आहे !! केएफसी इज मोनोपॉली !!!
बदनाम करणार्‍या ... वावड्या उठवणार्‍या मेल्स की काय कमी असते का हो ?
असो !! गणप्या ... पाकृ झकास रे !!

- टारझन
इट चिकन ..स्लिप चिकन ... ड्रिंक चिकन .. थिंक चिकन ..

नंदन's picture

15 Nov 2009 - 1:14 pm | नंदन

अविनाशराव, अशा इ-मेल्स खर्‍या आहेत की वावड्या हे http://www.snopes.com या संकेतस्थळावर पडताळून पाहता येईल. वरील इ-मेल ही एक वावडी असल्याचे दिसते.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

नंदन's picture

15 Nov 2009 - 1:16 pm | नंदन

पाकृ मस्त आहे, ट्राय करून पहायला हवी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अविनाशकुलकर्णी's picture

15 Nov 2009 - 1:38 pm | अविनाशकुलकर्णी

नंदन दादा माहित नाहि..मेल आली होति पुर्वि..... ति तशीच डकवली आहे...........ख.खो.दे.व के.एफ.सी. जा.

झुनजार राव's picture

13 Feb 2010 - 5:52 pm | झुनजार राव

खरच चागलि रेशिपि दिलि