गेल्या आठवड्यात एका मित्राने विचारल होत की KFC च चिकन कस बनवतात ते महिती आहे का रे ?
हा प्रकार कधी घरी करुन पाहिला नव्हता पुर्वी. म्हटलं ट्राय करुन पहायला काय हरकत आहे.
गुगलुन कृती शोधली.
पहिलाच प्रयत्न त्यामुळे अगदी KFC सारखे निट नाही जमले, पण जे काही झालय ते शेअर करतोय..
साहित्य:
चिकनचे मोठ्या आकारचे तुकडे. (मी तंगड्या वापरल्यात.)
१ अंड.
१ कप दुध.
२ कप मैदा.
१ चमचा आल-लसुण पेस्ट.
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा लाळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.
कोलसॉ साठी:
१ गाजर, कोबी, मेयॉनिस, घट्ट दही, साखर, १ चमचा लिंबाचा रस/ व्हिनेगर.
गाजर किसुन घ्याव. कोबी बारीक चिरुन घ्यावा.
एका भांड्यात किसलेल गाजर कोबी आणि वरील साहित्य निट एकत्र करुन घ्याव.
कृती:
चिकन साफ करुन धुवुन त्याला टुथपिकने टोचे मारुन घ्यावे.
एका भांड्यात पाणि घेउन त्यात १/२ चमचा मीठ ताकुन चिकनचे तुकडे त्यात १/२ तास मुरत ठेवावे.
१/२ तासाने पाण्यातुन बाहेर काढुन पेपर नॅपकीनने/ स्वच्छ कपड्याने पुसुन घ्यावे.
त्याला आल-लसुण पेस्ट,लाल तिखट लावुन परत १०-१५ मिनिटं मुरत ठेवाव.
एका भांड्यात चवी नुसार मिठ टाकुन अंड फेटुन घ्याव. त्यात दुध टाकुन परत एकजीव करुन घ्याव.
दुसर्या भांड्यात मैदा, मीठ, काळीमिरी पुड एकत्र करुन घ्याव.
कढईत तेल तापवत ठेवाव. एकदम कडकडीत तापवुनये.
चिकनचा एक पीस आधी अंड्याच्या मिश्रणात घोळवुन मग पीठात घोळवावा. मग परत अंड्याच्या मिश्रणात घोळवुन मग पीठात घोळवावा.
ही घोळवण्याची क्रिया ३-४ वेळा करावी.
मध्यम आचेवर सगळे तुकडे गोल्डन ब्राउन होइस्तो खरपुस तळुन घ्यावे.
कोलसॉ बरोबर सर्व्ह करावे.

वाचने
16959
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहा!
मस्त
नेहमी प्रमाणे जीवघेणी पाकॄ
लोक सहज
In reply to नेहमी प्रमाणे जीवघेणी पाकॄ by झंडुबाम
गणपा
मस्त भूक
मैद्यापेक
वॉव!
गणपाशेठ, मा
झक्कास!!
चांगला
एका फ्रेंच शेफने (chef) दिलेल्या टिप्स खर्या आहेत काय?
ही GFC पाकृ एकदम झक्कास जमली आहे.
सांगितलय
In reply to ही GFC पाकृ एकदम झक्कास जमली आहे. by वेताळ
जबहरा
सह्ही!! -
गणपा
मला एक मेल
ह्म्म
In reply to मला एक मेल by अविनाशकुलकर्णी
देवदत्त शी
In reply to ह्म्म by देवदत्त
स्नोप्स.कॉम
In reply to मला एक मेल by अविनाशकुलकर्णी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
झकास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन दादा
खरच चागलि