दुहेरी व्यक्तीमत्व

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
11 Nov 2009 - 3:19 pm
गाभा: 

मिपावर बरेच वेगळ्या नावाने सदस्य वावरत असतात.
बहुतेक वेळा असे दिसते की आपल्याला मनातून जसे वागायचे असते त्या व्यक्तीरेखेशी संदर्भीत आयडी लोक घेत असतात.
कुठेतरी अतृप्त राहिलेली इच्छा पूर्ण करून घेत असतात.
एखाद्या साईटवर एखादे नाव घेणे आणि हळूहळू त्या नावाप्रमाणे तसे व्यक्तीमत्व होणे हे ओघानेच येते.
एखादी व्यक्ती डॉन हे नाव घेते.एखादी व्यक्ती स्वतःला पेशवे म्हणवते . एखादी व्यक्ती नाटक्या हे नाव धारण करते त्यावेळेस त्यांच्या सूप्त मनातील भावना कळू शकतात.
सखाराम गटणे ही भाईसाहेबांची व्यक्तीरेखा एखादा त्या नावातून जगायला सुरुवात करतो. मॅन्ड्रेक सारखा जादुगार व्हावेसे असे लहानपणापाअसून एखाद्याला वाटत असते.
कोणाला मनातून परिकथेतील राजकुमार व्हायचे असते आणि दुष्ट राक्षसाशी लढादेऊन राजकन्या मिळवायची असते
सगळे आयडी अगदी ठाम खोटे असतात असे नाही. तो आयडी त्या व्यक्तीच्या स्वभावाशी/छुप्या व्यक्तीमत्वाशी कुठेतरी मेळ बसवत असतो.
मानसशास्त्र या प्रकाराला व्यक्तीमत्वातील दुभंग असे म्हणते.( दुभंगलेले व्यक्तीमत्व हे वेगळे असते)
प्रत्येक माणसात हे असे दुभंग असतातच. त्याला व्यक्त व्हायला वाव मिळाला की ते व्यक्तीमत्व बाहेर डोकावते.( रोल प्लेइंग)
संमोहना च्या वेळेस तर हे प्रकर्शाने जाणवते. एखाद्याला जर मनातून वाजपेई व्हायचे असेल तर ती व्यक्ती सम्मोहीत अवस्थेत वाजपेईंच्या अभिनीवेषात त्यांच्या सारखे हावभाव/वर्तन्/संभाषण करत असते
काही लोक तर एखाद्या नटी सारखेही वर्तन करू लागतात. तसेच पुरूष असूनसुद्धा काही स्त्री नावाचे आयडी घेतात. ( अर्थात त्यामागचे मानसशास्त्र येथे मांडणे हा माझा येथे हेतू नाहिय्ये. त्याबद्दल नन्तर कधी तरी.)
मिपावर बरेच सदस्य हे विशिष्ठ नावे धारण करून आहेत. त्यांचे स्वभावसुद्ध थोडेसे नावाला जुळतात. उदा : धमाल मुलगा ( याच्या स्वभावाबद्दल काय बोलु?), टारझन , अवलिया , भडकमक्र मास्तर , ३_१४ विक्षिप्त अदिती ,आनन्द यात्री , अजून कच्चाच आहे , मॅन्ड्रेक , विमुक्त ( याला मोकळे भटकायला आवडते) , धमाल बाळ , संताजी धनाजी , युयुत्सु , सर्कीट ( याच्या बद्दल काय सांगु?) , बेसनलाडू
या सदस्यांच्या लिखाणातून त्यांचे स्वभाव डोकावतात. ते त्यानी धारन केलेल्या नावाला बरेचसे साजेसेच आहेत.
काही आयडी अगदी एकसाअखे असतात.उदा : अमृतांजन , झंडु बाम . ते बहुधा एकाच स्वभाच्या व्यक्तींचे असतात.
पण काही सदस्यांची नावे आणि त्यांची व्यक्तीमत्व यांचा अंदाज बांधता येत नाही.
जृंभणश्वान ( अर्थ : जांभई देणारे कुत्रे) , अजानुकर्ण ( अर्थ : गुढग्यापर्यन्त ज्याचे कान लांब आहेत तो ) , खचलेला दरबार , नाम्या झंगाट ,मूखदूर्बळ ,
शेणगोळा , ज्ञानोबाचे पैजार (अर्थः ज्ञानी माणसाची चप्पल) हे असे आय डी घेण्यामागे त्यांची नक्की कोणती भूमिका असेल ते कळत नाही.

बघा तुम्हाला आठवताहेत का असे काही आयडी ...........आणि त्यांचे स्वभाव विशेष

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

11 Nov 2009 - 4:15 pm | सखाराम_गटणे™

:)
सुंदर धागा

चेतन's picture

11 Nov 2009 - 3:25 pm | चेतन

आणिबाणिचा शासनकर्ता

सुनील's picture

11 Nov 2009 - 3:27 pm | सुनील

मजेशीर धागा.

(सर्व संकेत स्थळांवर एकाच (खर्‍या) नावाने वावरणारा) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विशाल कुलकर्णी's picture

11 Nov 2009 - 4:46 pm | विशाल कुलकर्णी

<<<(सर्व संकेत स्थळांवर एकाच (खर्‍या) नावाने वावरणारा) सुनील>>>

ओ राजं, आमी बी हावो की जोडीला... ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2009 - 5:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अंमळ चूक होते आहे विशालभौ तुमची. हे सुनील, राजे वेगळे! ;-)

(जन्मापासूनच दोन नावं घेऊन आलेली) अदिती

गणपा's picture

11 Nov 2009 - 7:26 pm | गणपा

तै त्यांनी बहुतेक करुन राजं अशी हाक मारली , आपले राजे वायलेच हो जे सध्या पुण्य नगरीत भ्रमण करीत आहेत.

विशाल कुलकर्णी's picture

13 Nov 2009 - 10:19 am | विशाल कुलकर्णी

हांग अश्शी, लै भारी नजर तुमची गणपाभौ ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुनील's picture

11 Nov 2009 - 3:32 pm | सुनील

रामदास, सहज, विसोबा खेचर, ब्रिटिश, ब्रिटिश टिंग्या, मदनबाण इ.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ's picture

11 Nov 2009 - 3:36 pm | विजुभाऊ

नुसते आय डी सांगण्यापेक्षा त्यांच्या लिखाणातून डोकावणारा त्यांचा स्वभाव सुद्धा सांगा.
रामदास : हे त्यांचे पाळण्यातले नाव आहे

विनायक प्रभू's picture

11 Nov 2009 - 3:41 pm | विनायक प्रभू

हे कधीही कुणालाही पाळण्यात बसवु शकतात.

विनायक प्रभू's picture

11 Nov 2009 - 3:53 pm | विनायक प्रभू

खर्‍या नावाने आय्.डी घेणारे दुभंग व्यक्तिमत्वाची नसते असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना?

पर्नल नेने मराठे's picture

11 Nov 2009 - 4:12 pm | पर्नल नेने मराठे

8|
चुचु

विजुभाऊ's picture

11 Nov 2009 - 4:03 pm | विजुभाऊ

व्यक्तीमत्वाचा दुभंग आणि दुभंगलेले व्यक्तीमत्व हे दोन वेगवेगळे आहेत.
ड्वेल आयडेन्टिटी आणि स्प्लिट पर्सोनॅलिटी हे वेगळे आहेत.
व्यक्तीमत्वाचा दुभंग हा जाणतेपणी होत असतो. तर दुभंगलेले व्यक्तीमत्व हे नेणतेपणी होते.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Nov 2009 - 4:29 pm | प्रकाश घाटपांडे

आमी खर्‍या नावानेच वावरतो. पोटात येक आन *टात यक अस नाय
http://www.misalpav.com/node/8889#comment-138801 नुसार आम्हाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर आहे. आम्हाला ते मान्य देखील आहे. तो मोहरा पिच्चर पघितला पायजे राव!
आमची यक मय्त्रइन म्हंते कि मला यखाद्या/द्यीला माफ करता येत नाही . यखांदी गोष्ट मनात ठुतो. कोर व्हता येत नाई.
आसन बाबा तसबी पन आमच्या मुळे यखांद्या/द्यीला तरास झाला तर आमी "क्षमस्व" म्हनुन माफी माग्तो. त्यात आमाला कमीपना वाटत नाई. पन नंतर वाद नको म्हनुन संवाद बी नको आन संपर्क बी नको. एकी कड लईच बडबड :P तर एकी कड यकदम शांत निर्विकार चेहरा :| :-|
कदी कदी आमची कंड आमाला स्वस्त बसु देत नाई. आता खोडच ती तर काय कर्नार? विल्याष्टिक पर्मान प्लेक्जिबल व्हता आल पाहिजे. तुमी बी डिजाइन शोदा आमच्या साठी
(बहुपदरी)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नाम्या झंगाट's picture

11 Nov 2009 - 7:14 pm | नाम्या झंगाट

लहान म्हणजे ५-६ वी ला असताना गावात यात्रेमधे चंद्रकांत ढवळ्पुरीकर यांचा लोकनाट्य तमाशा आला होता,(चंद्रकांत ढवळ्पुरीकर यांना आदरांजली) त्यावेळेस एक वगामधे नाम्या झंगाट नावाचे अतिशय विनोदी एक पात्र होते. आणि जिवन असावे/रहावे तर
नाम्या झंगाट सारखे...हा त्यावेळी आमच्या बालमणाला झालेला साक्षात्कार.....!! पण अजूनही सूखी जीवनासाठी "नाम्या झंगाट " ने मनात तयार केलेला बेंचमार्क अजुनही एका कोप-यात तसाच ठेवला आहे अगदी या कॉर्पोरेट आणी प्रक्टिकल युगामधे.....!

(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट

परिकथेतील राजकुमार's picture

11 Nov 2009 - 7:48 pm | परिकथेतील राजकुमार

बालमणाला का ? बर बर ..

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

12 Nov 2009 - 11:03 am | टारझन

तात्या नाम्या झंगाट हा माझा ड्युप्लिकेट आय.डी. असल्यासारखे टोमणे मारले जात आहेत. हा पराही नको दे हायलाईट करून मला फेक आय.डी.धारक म्हणतो. कृपया आपण खुलासा करावा. त्या खुलाश्याबद्दल आगाऊ धन्यवाद !

विषय संपला.

-- टारक्कली

प्रकाश घाटपांडे's picture

11 Nov 2009 - 7:47 pm | प्रकाश घाटपांडे

व्हाईट लिली आणी नाईट रायडर नावाचे नाटक कोणी पाहिले आहे का? त्यात एक मध्यमवयाकडे झुकणारी तरुण-तरुणी नाईट रायडर व व्हाईट लिली या आयडीने चॅटिंग मार्फत प्रथम संवाद चावटपणा,रोमान्स करतात नंतर प्रत्यक्ष भेटतात तेव्हा कसे अस्वस्थ होतात? कल्पनेत असलेल व्यक्तिमत्व आणि वास्तवात असलेली व्यक्ती यातील फरक. मग एकमेकांचे अंदाज घेणे. त्यातील सावधता, व्यवहार्यता कौटुंबिक पार्श्वभुमी याचे उत्तम चित्रण केले आहे. प्रत्यक्ष संवाद साधताना संकोच ,अढी, अमुर्त दडपण आल्यावर मग लॅपटॉप घेउन चॅटिंगला बसल्यावर कसे मोकळे होतात आणि मनमोकळे होतात. मग लैंगिक संबंध वगैरे ... पण तरीही कुठेही बटबटित पणा नाही इतका उत्तम संवाद व नाट्याविष्कार
मुद्दा हा कि व्यक्तिमत्व कसे विभाजित होत हे पहायला उत्तम आविष्कार आहे. भडकमकर मास्तर यावर सविस्तर लिहितीलच.
जालावरील आयडी आणि प्रत्यक्ष व्यक्तिमत्व यात अंतर असतच. अवलिया ही आयडी आणि प्रत्यक्ष व्यक्ति यात नेमक काय अंतर असेल अशी उत्सुकता आम्हाला असतेच. पण तस विचारण हे जाल शिष्टाचारात बसत नाही. तसेच त्यांनी याचा शोध घेउ नये असे सांगितले आहे . आमचा व आपलाही संवाद अवलिया या आयडी शी आहे व्यक्तीशी नाही. हे मी फक्त एक उदाहरण दिल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चित्रा's picture

12 Nov 2009 - 9:20 am | चित्रा

नावावरून जरा दबकूनच बघायला गेलो होतो, नाटक जरासे अंगावर आले, पण वेगळा प्रयोग म्हणून चांगलेच आहे.
जरासे डेडलीच आहे! :)

मुक्तसुनीत's picture

11 Nov 2009 - 7:59 pm | मुक्तसुनीत

इंग्रजी "फ्री व्हर्स" चे मराठी भाषांतर म्हणजे मुक्तसुनीत होय. (हे बहुधा ज्युलियनांनी दिलेले नाव आहे.)

निमीत्त मात्र's picture

12 Nov 2009 - 6:26 pm | निमीत्त मात्र

फ्री व्हर्स कसे काय बुवा? 'व्हर्स' म्हणजे कडवे आणि सुनित म्हणजे सॉनेट बहुदा.

'मुक्तकडवे' असे नाव घेतले असते तर फ्री व्हर्स चे भाषांतर वाटले असते. :)

मुक्तसुनीत's picture

12 Nov 2009 - 8:10 pm | मुक्तसुनीत

:-)
("निमीत्त मात्र" कसे काय बॉ ? "निमित्तमात्र" असते तर समजले असते.)

- सुनीत्त मात्र ;-)

धमाल मुलगा's picture

12 Nov 2009 - 8:19 pm | धमाल मुलगा

"सुनीत्त मात्र" ??????????

=)) =)) =)) =)) =))

दुहेरी व्यक्तीमत्व?????????

मुक्तसुनीत's picture

12 Nov 2009 - 8:20 pm | मुक्तसुनीत

शुक्रवार संध्याकाळच्या ऐवजी गुरवारीच का काय आज ? ;-)

धमाल मुलगा's picture

12 Nov 2009 - 8:29 pm | धमाल मुलगा

मी दाखवायलो हनुमान आन तुमी बघायले अंबाबाई!
सरकार, पहिलं वाक्य तुमच्यासाठी होतं आणी दुसरं वाक्य तुम्ही 'निमित्त मात्र आणी निमित्तमात्र ह्या शब्दावर केलेली कोटी ह्यासाठी होतं! ;)

Nile's picture

12 Nov 2009 - 8:31 pm | Nile

=)) =))

सूहास's picture

12 Nov 2009 - 8:42 pm | सूहास (not verified)

आईशप्पथ !!! धम्या ...

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

सू हा स...

निमीत्त मात्र's picture

12 Nov 2009 - 10:34 pm | निमीत्त मात्र

मी कुठं सांगत आहे माझे सदस्यनाम कसे आले? :)
सॉनेट म्हणजे कडवं असं सांगून तुम्ही जे ज्ञानाचे दिवे पाजळत आहात त्याबाबत लिहिले.

बाकी मुक्तसुनित म्हणा नाहीतर *त्तसुनित म्हणा मला काय फरक पडतो? :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Nov 2009 - 9:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते तुम्ही (वर जाऊन) माधव ज्युलियनांना का नाही विचारत?

अदिती
Translation is like a lady, when it's beautiful not faithful and when faithful ....

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Nov 2009 - 10:27 am | बिपिन कार्यकर्ते

ते तुम्ही (वर जाऊन) माधव ज्युलियनांना का नाही विचारत?

काहीतरीच बाई तुमचं... अहो, वर जाणं कसं शक्य आहे? तिथे फेक आयडी चालत नाही ना. जायचं तर खर्‍या नावाने जावं लागेल, मग सभ्यपणाचा बुरखा फाटेल... असं बरंच काय काय होईल. त्यापेक्षा नकोच ते.

काय निमाभाऊ/ताई ? हो की नाही हो?

बिपिन कार्यकर्ते

निमीत्त मात्र's picture

13 Nov 2009 - 10:42 am | निमीत्त मात्र

हाहाहाहाहा

काय निमाभाऊ/ताई ? हो की नाही हो?

होका बिका काका? म्हणजे मिपावर टोपणनावाने लिहिणारे सभ्यतेचा बुरखा फाटू नये म्हणून टोपणनावाने लिहितात ही नविनच माहिती मिळाली.

मुद्दे संपले का?

तिकडे पुणे मुंबई प्रतिसादावर अजून उत्तर आलेले नाही. त्यावर खर्‍या खोट्या कुठल्याही आयडीतून असो पण उत्तर तरी द्या. ;)

मुक्तसुनीत's picture

13 Nov 2009 - 10:37 am | मुक्तसुनीत

चला शेवटी गाडी अपशब्दांवर आली. तुम्हाला खिजगणतीत मोजण्याची उरलीसुरली लायकी संपली.

(आणि हो, सडलेल्या शिव्या देताना ती फुल्याफुल्यांची लाज बाळगणे म्हणजे अंतर्वस्त्रेही नसताना टाय लावून फिरण्यासारखे आहे खरे.)

असो. तुमच्या गटारी शिव्या तुम्हाला लखलाभ. अंधारात अचकटविचकट काय बोलायचे ते बोलण्यास स्वतंत्र आहातच.

निमीत्त मात्र's picture

13 Nov 2009 - 10:46 am | निमीत्त मात्र

माननीय संपादक महोदय, इतका त्रागा कशासाठी? एक फुली आली म्हणून काही आकाश कोसळलेले नाही.

तसेही मिसळपावर शिव्या वापरायची खुल्ली सूट असुनही मी लेखनात शिव्या वापरायचे सहसा टाळतो. तुम्हाला शिव्यांचे इतके वावडे असेल तर मिसळ पचण्यास जड जाईल असे वाटते.

व्हर्स म्हणजे सुनित का? ह्याचा कृपया खुलासा करा. म्हणजे बाकीच्या कचर्‍याची गरज राहणार नाही.

मुक्तसुनीत's picture

13 Nov 2009 - 10:50 am | मुक्तसुनीत

हीन पातळी गाठलीत. तुम्हाला कसले हो खुलासे द्यायचे म्हणजे . चालू द्या अचकटविचकटपणा. हा माझा शेवटचा प्रतिसाद.

टारझन's picture

13 Nov 2009 - 12:52 pm | टारझन

हॅहॅहॅ ... जाऊच देत हो सुनित राव .. हा निमित्तमात्र अंमळ वेडझवाच आहे .. आणि त्याचा मानसिकबोळा ही तुंबलेला आहे :)

- खर्गटं पात्र

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Nov 2009 - 3:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंय मुसुसेठ, ते कॉन-व्हर्स असतील ...

अदिती

पाषाणभेद's picture

11 Nov 2009 - 7:59 pm | पाषाणभेद

विजूभौ, आमच्या बी नावाच कायतरी सांगाना जरासक. म्हंजे आमी कस हैत, आम्चा सौभाव, वाग्न कसा काय वाटतो त्ये सांगा ना काय तरी.

--------------------
G O मनसे (म्हंजे जियो मनसे)


पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

बाकरवडी's picture

11 Nov 2009 - 8:45 pm | बाकरवडी

माझं नाव :? :? :? :?

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

प्रभो's picture

11 Nov 2009 - 10:20 pm | प्रभो

चालू द्या...

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

नाटक्या's picture

11 Nov 2009 - 11:28 pm | नाटक्या

एखादी व्यक्ती नाटक्या हे नाव धारण करते त्यावेळेस त्यांच्या सूप्त मनातील भावना कळू शकतात

सुप्त नाही हो, खर्‍याच भावना आहेत. नाटकं (खरी, रंगमंचा वरची, आपण सगळे एरवी करतो ती नव्हे) करण्याची खाज अपार. नाटकं केली पण आणि पाहिली पण खूप. म्हणूनच नाटक्या नाव घेतले...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

पिवळा डांबिस's picture

12 Nov 2009 - 1:26 am | पिवळा डांबिस

बहुतेक वेळा असे दिसते की आपल्याला मनातून जसे वागायचे असते त्या व्यक्तीरेखेशी संदर्भीत आयडी लोक घेत असतात.
असं म्हणतां? खरंच?
असेल बॉ, आपल्याला काही अनुभव नाही!!
कायपण एकेक मेंबर असतात!!! ;)

पण विजुभाऊ, तुमच्या आयडीपेक्षा तुमच्या सिग्नेचर वाक्यामधून तुमच्या मनातील सुप्त भावना आम्हाला वेळोवेळी दिसत असतांत!! :))

आपलं,
दुभंगलेलं व्यक्तिमत्व!

"आकर्षक आयडी मिळाला नाही म्हणून निराश होऊ नका! कदाचित मिसळपाव हे तुमच्यासाठी मृगजळ असेल!!!"
:P

घाटावरचे भट's picture

12 Nov 2009 - 2:42 am | घाटावरचे भट

"आकर्षक आयडी मिळाला नाही म्हणून निराश होऊ नका! कदाचित मिसळपाव हे तुमच्यासाठी मृगजळ असेल!!!"

=))

दुभंगलेले व्यक्तिमत्व #२,
भटोबा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2009 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पिडांकाका जिंदाबाद! =)) =)) =))

(इरॅशनल अपूर्णांकात विक्षिप्त) अदिती

चतुरंग's picture

12 Nov 2009 - 9:45 am | चतुरंग

उणे वर्गमुळातला
(इमॅजिनरी)चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2009 - 9:48 am | llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ. एक नंबर पिडाकाका.

(12i कॉम्प्लेक्स नंबर)पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

छोटा डॉन's picture

12 Nov 2009 - 10:03 am | छोटा डॉन

वरिल सर्वांशी सहमत.

आंतरजालावर खरोखर एवढी हलकट माणसे असतील अशी खरोखर आम्हाला कल्पना नव्हती.
च्यायला तुम्हाला "स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर" असे तर वैद्यकिय उपचार घ्या ना, असे "आय डी" काहुन काढता भौ ???

फुक्कट्चा डॉक्याला शॉट !!!

------
( फिबोनाची सेरिजवाला ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2009 - 10:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डान्राव, "स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर" असे तर वैद्यकिय उपचार घ्या, हे ठीक आहे. पण स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे हे तरी तज्ञ माणसाला ठरवू देत ना! दोन बुकं वाचून स्वतःला मानसोपचारतज्ञ आणि कॉर्पोरेट गुरू समजणार्‍यांच्या सल्ल्यांची गरजच काय?

अदिती

छोटा डॉन's picture

12 Nov 2009 - 10:23 am | छोटा डॉन

बाय डिफॉल्ट सहमत आहे ....

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2009 - 10:26 am | llपुण्याचे पेशवेll

माझा या धाग्यावरील शेवटचा प्रतिसाद. नाहीतर नंतर लोक म्हणतील या भग्न- स्वभाववाल्या पेशव्याने पांचट धाग्याला ५०+ प्रतिसाद मिळवून दिले. ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2009 - 10:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी दस नंबरी, पेशवे!

अदिती

विजुभाऊ's picture

12 Nov 2009 - 11:00 am | विजुभाऊ

इथे थोडा गोंधळ होतोय डानराव
मी स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर" याबद्दल बोलत नसून ड्वेल आयडेन्टिटी बद्दल बोलतोय.
दोन बुकं वाचून स्वतःला मानसोपचारतज्ञ आणि कॉर्पोरेट गुरू समजणार्‍यांच्या सल्ल्यांची गरजच काय?

ऑ ! सल्ला कुणी कुणाला दिला? अन हे काय नवीन.... #:S

जे लिहिलेच नाही आणि जे अपेक्षीतही नाही त्याबद्दल उहापोह कशाला ?

निखिल देशपांडे's picture

12 Nov 2009 - 10:23 am | निखिल देशपांडे

सगळ्यांची सहमत...

बाकी खरे नाव घेतलेले लोक आपल्या मुळ स्वभावा पेक्षा वेगेळे वागत नाहीत असे म्हणायचे आहे का???

(प्राईम नंबरवाला)निखिल

Nile's picture

12 Nov 2009 - 10:30 am | Nile

खरे नाव घेणारे लोक हे आंतरजालावर नविन असतात एवढेच आम्हाला माहित आहे. ;)

निखिल देशपांडे's picture

12 Nov 2009 - 10:35 am | निखिल देशपांडे

खरे नाव घेणारे लोक हे आंतरजालावर नविन असतात एवढेच आम्हाला माहित आहे.

गैरसमज एवढेच म्हणु शकतो... अजुन लहान आहात

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

पर्नल नेने मराठे's picture

12 Nov 2009 - 10:41 am | पर्नल नेने मराठे

आम्ही गेले १० वर्शे खर्या नावाने वावरत आहोत ;)
चुचु

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Nov 2009 - 10:55 am | बिपिन कार्यकर्ते

=))

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

13 Nov 2009 - 9:57 am | अवलिया

खरे नाव घेणारे लोक हे आंतरजालावर नविन असतात एवढेच आम्हाला माहित आहे.

ऑ ! मग आमचे प्राध्यापक डाक्टर तर तान्हुले बाळच की !
त्यांनी तर खरे नाव आणि (बहुधा) ख-या डिग्र्या पण लावल्या !!

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

Nile's picture

13 Nov 2009 - 11:34 am | Nile

'अवलिया' नाव घेतलं म्हणजे मुरलेलं असा अर्थ होत नाही बरका! ;)

अवलिया's picture

13 Nov 2009 - 12:08 pm | अवलिया

'अवलिया' नाव घेतलं म्हणजे मुरलेलं असा अर्थ होत नाही बरका!

अशा अर्थाचा दावा मी केल्याचे माझ्या स्मरणात नाही.
बाकी चालु द्या !

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

Nile's picture

12 Nov 2009 - 10:05 am | Nile

लै भारी! पटलं! ;)

-Nile. B)

शेखर's picture

12 Nov 2009 - 1:23 am | शेखर

काही व्यक्तीना पाऊस आणी परी च्या गोष्टीत आनंद मिळतो..

अडाणि's picture

12 Nov 2009 - 9:08 am | अडाणि

ह्या धाग्याचा जाहिर निषेध.

-
अफाट जगातील एक अडाणि.

एकलव्य's picture

12 Nov 2009 - 10:23 am | एकलव्य

अ ने ब केले... य ला ते पाहून क्ष वाटले पण प ला ते पटले नाही म्हणून त्याने फ पाशी बोंबाबोंब केली जी ऐकून ड कासावीस झाला आणि ढ च्या कानाशी लागला. ही कुजबुज अ पाशी पोहचली तेव्हा आता तो विचारात पडला की हा ब कोण बुवा?

एकूण काय कशात काय आणि फाटक्यात पाय

मिसळभोक्ता's picture

12 Nov 2009 - 3:46 pm | मिसळभोक्ता

सहमत आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवलिया's picture

12 Nov 2009 - 11:53 am | अवलिया

अरे वा मस्त धागा !

पण तुम्हाला एक सांगतो विजुभाउ.. असे लेख लिहिल्याने माय मराठीची सेवा होते असे तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. त्याच्या साठी केवळ अमेरिकेची तळी उचलणा-या लेखकांना घरी बोलावुन जेवु खावु घालावे लागते.

असो, तुमचे प्रतिसाद वांझत्व या निमित्ताने दूर झाले. आनंद आहे.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार

असो, तुमचे प्रतिसाद वांझत्व या निमित्ताने दूर झाले. आनंद आहे.

असेच म्हणतो !

आणि हो हे वांझत्व दुर करण्यात नाना, बुधवारचे पेशवे, डॉन्राव वगैरेंचा लागलेला हातभार बघुन अंमळ हळवे झालो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विजुभाऊ,
<<बहुतेक वेळा असे दिसते की आपल्याला मनातून जसे वागायचे असते त्या व्यक्तीरेखेशी संदर्भीत आयडी लोक घेत असतात.>>
तुम्ही लिहिलेल्या वरील वाक्याचा प्रत्यय मात्र कधी-कधी येतो खरा, पण क्वचितच.
बहुतेक वेळी वादग्रस्त लेखन किंवा केलेली वादग्रस्त विधाने लेखकापर्यंत पोचू नयेत म्हणूनच लोक जास्त करून टोपणनाव घेतात असे वाटते. व्यक्तीमत्वातील दुभंग ( दुभंगलेले व्यक्तीमत्व नव्हे) हे त्याचे कारण नसावे असे मला तरी वाटते.
अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच.
सुधीर

------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!