प्रार्थना.

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जे न देखे रवी...
23 Sep 2007 - 12:48 pm

संस्कृत भाषेत या चार ओळी सुचल्या त्या इथे देत आहे.

-- प्रार्थना --

द्वंद्वातीतं त्रिगुणातीतम्
प्रतिपाषाणे महेशरूपम् II धृ II

नाहं जाने माया भेदम्
हरे मुंचमाम् भवजलमीनम् II १ II

मतिमंदोऽहं अघपथगामी
मुक्तिवरं मे देहि स्वामी II २ II

विगतवारिजं मानसविमलम्
मुनिजनमानसहंसविहीनम् II ३ II

शिवपदारविन्दे मनशरणम्
प्रभो प्रभोदय चंचलभृंगम् II ४ II

-- अशोक गोडबोले, पनवेल.

कवितावाङ्मयविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

सहज's picture

23 Sep 2007 - 1:34 pm | सहज

अहं न कळमं पूर्णम संस्कृतम.
एखाद दुसरम कदाचीत शब्दम.

कींतूम चलामी त्वं प्रयत्नम
पाठींबस्य आहोत अस्मम

कालाव्यहं करोमी च ठावम
त्वं करोती क्षमा मतिमंदोऽहं मयम!

सर्किट's picture

24 Sep 2007 - 4:47 am | सर्किट (not verified)

अरे, मला उचला रे कुणी !!!
हसून हसून मुरकुंडी वळणे म्हणजे साधारणतः काय असते, त्याचा अनुभव आला !

जियो सहजराव !!!

- सर्किट

गुंडोपंत's picture

23 Sep 2007 - 2:56 pm | गुंडोपंत

"अहं न कळमं पूर्णम संस्कृतम.
एखाद दुसरम कदाचीत शब्दम."

कै च्या कै भन्नाट आहात सहजराव!
मानलं!!

आपला
गुंडोपंत

धनंजय's picture

24 Sep 2007 - 7:20 am | धनंजय

मराठीकरण पटते काय बघा -

द्वंद्वा पार, त्रिगुणा पार
दगडीं दगडीं महेश रूप ।

जाणे माया भेदा मी न
हरि! सोडवी संसारी मीन ।
(इथे मध्येच विष्णूला आळवणी :-) एकच देव आहे वगैरे ठीकच आहे)

मतिमंद मी पाप पथिक मी
मुक्त वर मज दे रे स्वामी ।

{हे कडवे मला समजले नाही : जसे कमळे गेलेले स्वच्छ मानस [?मन? संस्कृतात मानस चा अर्थ मन असा होत नाही...] मुनीजनांविना हेच मानस सरोवर हंस नसल्यासारखे??? या कवितेत याचा संदर्भ काय?}

शिवपद कमळीं शरणिं मनाच्या
प्रभू! उद्धरीं चंचळ भुंग्या ॥
(या कडव्यात मुळात छंदोभंग आणि वेडेवाकडे संधी झाले आहेत असे वाटते. जिभेची अभावित लडखड होते, आणि अर्थाचा अनर्थ होतो - सहज ठीक करण्यासारखा, कदाचित टंकनदोष असावा. मी स्वतः वृत्त वगैरे नीट सांभाळलेले नाही, क्षमस्व. वाचक्नवींच्या सूचनेनुसार शेवटच्या कडव्यात एक बदल केला. अजून अर्थ लागत नाही म्हणता? मला तरी कुठे लागतो आहे?)

शंकराचार्यानंतर या प्रकाराला भलतीच सद्दी आली आहे. चाल बसवली तर गोड गाणी बनतात, त्यामुळे माझी काही मोठी जळजळ नाही!

व्यंकट's picture

23 Sep 2007 - 10:32 pm | व्यंकट

चांगली जमली आहे.

वाचक्नवी's picture

24 Sep 2007 - 12:12 am | वाचक्नवी

शेवटच्या ओळीतला प्रभोदय म्हणजे काय? प्रबोधय तर नाही? किंवा प्रोदय? मानस हे 'मनापासून उत्पन्‍न झालेले 'अशा अर्थाचे विशेषण आहे हे खरे. पण माझ्याकडच्या एका कोशात भागिनीविलास (१.११३)या काव्यात मन अशा अर्थाने हा शब्द वापरला आहे असा उल्लेख आहे. दुसरा अर्थ 'गर्भित संमती 'असा दिला आहे. इथे संदर्भ न लागल्यामुळे कुठलाच अर्थ लागू पडत नाही .
तरीसुद्धा 'शिवपद कमळीं शरणा म्यां'--म्हणजे काय? म्यां म्हणजे 'मी 'ची तृतीया. म्हणजे कर्मणी प्रयोग हवा. क्रियापद कोणते? आणि शिवपद म्हणजे शंकराचे पद? शरणा हे कुठले रूप आहे? कमळींतल्या ळी वर अनुस्वार का? पदकमळाला असा अर्थ असेल तर द्वितीया हवी. द्वितीयेच्या जागी सप्तमी का? शरण‍ऐवजी लीन असते तर चालले असते. मूळ संस्कृत आणि मराठी रूपांतर दोन्हीमध्ये शंका आहेत.--वाचक्‍नवी

धनंजय's picture

24 Sep 2007 - 12:31 am | धनंजय

> 'शिवपद कमळीं शरणा म्यां'

टला ट रीला री
शिघ्र मम यमके भोवणारी

धनंजय

अशोक गोडबोले's picture

28 Sep 2007 - 12:15 am | अशोक गोडबोले

शेवटच्या ओळीतला प्रभोदय म्हणजे काय? प्रबोधय तर नाही?

टंकलेखनाची सवय नसल्यामुळे चूक झाली. प्रबोधयच म्हणायचं आहे.