त्रिपुरी पोर्णिमा

अश्विनीका's picture
अश्विनीका in कलादालन
3 Nov 2009 - 2:34 am

कार्तिक महिन्यातील पोर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पोर्णिमा. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. त्रिपुरासुराच्या अनिर्बंध वागण्याने त्रस्त झालेले देव त्रिपुरासुराचा अंत झालेला पाहून हर्षित झाले आणि त्यांनी हा विजय दिवे प्रज्वलित करून व आतषबाजी करून साजरा केला. म्हणून ह्या दिवसाला देवदिवाळी असेही म्हणतात.
तिथी एकच असते , तोच पुर्णाकृती चंद्र आसमंतात असतो तरी प्रत्येक पोर्णिमा वेगळी भासते. फाल्गुनातील होळी पोर्णिमा आणि पुरणपोळी , कोजागिरी आणि मसाल्याच दूध हे जसं जोडीनेच आठवतं तसं त्रिपुरी पोर्णिमा म्हटलं की लखलखत्या हजारो पणत्यांची आरास डोळ्यासमोर येते.
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या पाताळेश्वर मंदिरात त्रिपुरी पोर्णिमेला तेलवातीच्या पणत्यांची सुंदर आरास करतात. बोचर्‍या थंडीत अंधारलेल्या संध्याकाळी हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघालेले पाताळेश्वराचे मंदिर फारच सुंदर दिसू लागते.
गेल्या वर्षी पुण्याला गेलो असताना पाताळेश्वर मंदिराला आवर्जून भेट दिली. त्यावेळी टिपलेले हे काही फोटोज..

संस्कृती

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

3 Nov 2009 - 3:46 am | मदनबाण

मस्त फोटो... :)
या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन सुद्धा घ्यायचे असते...

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

प्राजु's picture

3 Nov 2009 - 8:20 am | प्राजु

सुरेख!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2009 - 9:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर फोटो. आधी माहित असतं तर काल जरूर पाताळेश्वराला गेले असते. तशीही काल गुरू नानक जयंतीची सरकारी सुट्टी होतीच.

अदिती

हर्षद आनंदी's picture

3 Nov 2009 - 9:47 am | हर्षद आनंदी

सारसबागे समोरील महालक्ष्मीच्या मंदीरातही दीपोत्सव होता..

अवलिया's picture

3 Nov 2009 - 11:24 am | अवलिया

मस्त फोटो ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

3 Nov 2009 - 11:56 am | प्रभो

मस्त फोटो !

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Nov 2009 - 1:01 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मिरजेला कृष्णामाईच्या काठावर जाणार्‍या पायर्‍यांच्या दोन्हीबाजुनी दिवे लावत असत.मी आजोबांबरोबर काशी विश्वेश्वराच्या देवळात एकादशी पासुन ते त्रिपुरी पोर्णिमेपर्यंत दिवे लावायला जात असे .ते जुने दिवस डोळ्यासमोर उभे राहिले ह्या फोटो ने.

अमोल केळकर's picture

3 Nov 2009 - 1:45 pm | अमोल केळकर

सुंदर फोटो
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मसक्कली's picture

3 Nov 2009 - 4:27 pm | मसक्कली

डोळे दिपुन गेले बगा.... 8> ;;)

स्वाती२'s picture

3 Nov 2009 - 6:56 pm | स्वाती२

खूप प्रसन्न वाटले.

अश्विनीका's picture

3 Nov 2009 - 10:18 pm | अश्विनीका

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.
- अश्विनी

JAGOMOHANPYARE's picture

4 Nov 2009 - 12:31 pm | JAGOMOHANPYARE

आमच्याकडेही असते. ( कुरुन्दवाडला) ..पणत्या आणि मेणबत्य्या लावतात...... त्याला शिखर पाजळणे असे म्हणतात..

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

नेहमी आनंदी's picture

5 Nov 2009 - 1:25 pm | नेहमी आनंदी

आमच्य कडे पण असते, क्षिप्रा नदीत सोडतात खुप दिवे द्रोणात घालून. खुप मनोहारी दृष्य असते..

पाषाणभेद's picture

5 Nov 2009 - 11:55 pm | पाषाणभेद

मनोहारी दृष्य आहे दिव्यांचे.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)