ऋतूचक्र

वाचक's picture
वाचक in जे न देखे रवी...
2 Nov 2009 - 8:17 pm

आठवतोय मला वसंताच्या चाहूलीत मोहरलेला डेरेदार आंबा
घमघमणार्‍या सुगंधाची कोकिळा गातेच आहे अजून माझ्या मनात

अजूनही आठवतात मला ते तापलेले रस्ते आणि माझ्या हातात तुझा हात
पेटलेल्या गुलमोहरा खालून जाताना अंगावर पडलेला फुलांचा सडा, जळणार्‍या

आषाढाच्या पहिल्या पावसानंतरची घमघमणारी ओली माती
जमलेच नाही तो मॄद्गंध बंदिस्त करुन ठेवायला मनाच्या कुपीत कधी...

पावासाची झड लागलीये बाहेर आत्ताही आणि तेव्हाही असाच कोसळत होता
त्या अविरत पडणार्‍या पावसामध्ये शोधतो आहे तुलाच मी, माझ्याही नकळत

पानगळीचे दिवस आणि रंगांची उधळण, झाडे कात टाकतायत जुनी, जीर्ण
सामोरे जायचेय त्यांना एक नव्या जगण्याला; तयार व्हायचय नव्या वसंतासाठी

शिशिरातल्या थंडीची शिरशिरी बोचरी अन निखार्‍यांची अस्पष्ट तडतड राखेखालच्या
आठवतोय मला अजूनही तो शहारा तुझा हात हातात घेतल्या नंतरचा

आत्ता ह्मातले काहीच नाहीये माझ्या कडे, पण एक अस्पष्ट जाणीव आहे कुठेतरी
की भेटशीलच तू मला कधीतरी कुठेतरी; कारण बांधले गेलोय ह्मा ऋतूचक्रात आपण

कविता

प्रतिक्रिया

मस्तानी's picture

3 Nov 2009 - 3:06 am | मस्तानी

आवड्ली ...