स्वीच on / स्वीच off हे असे शब्द मानसिक संतुलनाबाबत असंख्य वेळा ऐकायला मिळतात. मला तर अनेक सामन्यांतून हेच जाणवतं , शिकायला मिळतं. फक्त अनुभवी खेळाडूच नव्हे, तर नव-नवे खेळाडू देखील हल्ली त्यांचा खेळ अचानक पणे बदलून परिस्थितीनुसार बदलताना दिसतात. मग तो फक्त एकच फलंदाज (उमेश यादव) शिल्लक राहिला असताना अचानक t २० पद्धतीत सामना फिरविणारा हार्दिक पंड्या असो, किंवा युगंधर महेंद्र सिंह धोनी असो.
क्रिकेट खेळाचं वैशिष्ट्यच मुळी त्याचं लवकर न संपणे हे आहे. बघा ना, सर्वात लवकर संपणारा सामना देखील (टी २०) ४ तास चालतो. ह्याउलट इतर खेळ ४५ मिनिटे- १.५ तास , दोन तास असे चालतात. सांघिक बरं का.