http://www.misalpav.com/node/42057#new
हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? ..... जणू काही ह्याच प्रश्नाची वाट बघत होते दोघे जण , बोलू लागले घडाघडा “काय सांगू डाॅक्टर पोरगा बारवीची परिक्षा देतोय, पण पुढचं काय करावं (आयुष्याचं) काही माहिती नाही, ऐकत नाही अजिबात ‘....