या जगात भरपुर पापे वाढली,आणी ........................
लोक मेल्यावर यम आपल्या रेडयावर येवुन सगळयाना चित्रगुप्ताकड नेत होता.चित्रगुप्त आत्माला एकेक करुन बोलवायचा पापाची बेरीज करुन हिशोब करुन, मग त्याप्रमाणॅ स्वर्ग अथवा नरकात पाठवायचा.या जगात भरपुर पापे वाढली,आणी स्वर्ग ओस पडू लागला आणी नरकात खुप गर्दी झाली.स्वर्गात अप्सरा,बागा,मदीरा आणी भरपुर मजा होत्या,तर नरकात होते चाबकाचे फटके,उकळलेले तेल.स्वर्ग आणी या मधे होती एक भिन्त,पापी आत्मे खुप बदमाश.त्याना स्वर्गात काय चालले आहे हे पाहायचे होते, त्या सर्वानी भिन्तीला छीद्र पाडायला सुरवात केली.त्याना स्वर्ग खुप आवडायला लागला ,पण तीकड जाणार कसे?