डॉक्टर डॉक्टर

नेहेमी प्रमाणे ऑफिस मधून उशिरा न येता वेळेवरच आलो …. जरा चेंज म्हणून बरं असतं कधी कधी. थोडा घसा पण दुखत होता. तरल पदार्थाव्यतिरिक्त कुठलीही इतर खाद्य वस्तू घश्याखाली उतरताना आतून चिमटे काढत जात आहे असे वाटत होते. कदाचित आत्ताच गावी जाऊन आल्यामुळे तेथील पाण्याचा त्रास झाला असावा. तेथील पाण्या मध्ये घालून काही द्रव पदार्थ घेतला असल्याचे शल्य घशात डसत असेल असा मौलिक निष्कर्ष माझ्या बायकोने काढला होता. बऱ्याच बाबतीत आमचे जसे एकमत होत नाही ते या बाबतीत देखील झाले नाही हे उघड झाले.

चावडीवरच्या गप्पा - 'टोल'वाटोलवी

लेखनविषय:
लेखनप्रकार
अरे वा!, सामान्यांची, आम जनतेची काळजी घेणारे आहे कुणीतरी”, खणखणीत आणि अनुनासिक आवाजात बोलत घारूअण्णांनी चावडीवर हजेरी लावली. “काय झाले?”, कोणीतरी विचारले. “काय? आजकाल पेपर वाचायचा सोडून सकाळी सकाळी नातवासाठीच वापरता की काय?” घारूअण्णा एंट्रीलाच नाट लागल्यामुळे खवळले. “अरे त्या राजने, म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेतल्या राजसाहेबांनी टोलवसूली विरूद्ध आवाज उठवला आहे, टोल भरू नका असा आदेश दिला आहे जनतेला”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा आनंदाने फुलून गेला होता. “चला!

बांगड्या आणि गजरा !! ..( Confusing but soooo sweet ! )

लेखनविषय:
लेखनप्रकार
पुर्वप्रकाशित डिसक्लेमर : समस्या वैयक्तिक पातळीवरून मांडली असली तरी ती जागतिक समस्या आहे असे लेखकाचे मत आहे .शिवाय त्या समस्येचं आजवर कोणीही निवारण केले असण्याची शक्यता अतिशय कमी आहे (जे साक्षात ब्रह्मदेवाला जमलं नाही ते आम्हाला काय कप्पाळ जमणार आहे . शिवाय आमच्या मित्रांना, नवरा-बायकोच्या नात्यातला एक प्रकारचा जो गोडवा(भांडणातही आणि परस्परविरोधी सवयीतही ! ) असतो, त्याचा आंनद कसा लुटायचा हे ही सांगायचा आमचा एक झीण प्रयत्न ! ;) दिनांक : १ ऑगस्ट २००९ स्थळ : निळकंठेश्वर (कात टाकलेला रम्य निसर्ग) वेळ : साधारण सकाळी साडे आठ ती : खुप छान परिसर आहे रे हा.

फीस्ट (ऊर्फ फेसबुकचे इनोदी स्टेटस)

आजच चेपुवर एका ग्रुपमधे एका सदस्याने अत्रंगी फेसबुककरांच्या लीलांचा विषय काढला. त्याने (त्याची परवानगी न विचारल्याने नाव देत नाही, पण स्टेटस हा 'ओपन टू आल' मामला असल्याने इथे पेस्टायला हरकत नसावी.) त्याने एका फेक नावाने आलेल्या दीडशहाण्याच्या स्टेटस नोटस ची यादी दिलेली ती अशी. _______________ त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे: १)(भारतीय प्रमाणवेळ ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig.. २) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) oopeeth khayla yaa@Kurundwad 3)(भा.प्र.वे. ११.००) chyayla, raaw kantalaa ala raao..yetaaw kaa nadiwar dumbuya? 4)(भा.प्र.वे.

शुक् शुक्

लेखनविषय:
“सांजच्याला सूर्य बुडायची येळ आणि धोंडीबाची म्हस अडयची वेळ एकच येनार आणि वरून आज अमोश्या? मागच्या दोन चार टायमाला म्हशीची वीत जगतच न्हवती. कालच पारावर भेटला तवा उगा बोल लावत बसला होता. कुणाचा तरी कोप झालंय, मरीआईला बोकड द्यायला हवा. आणि नेमका मी भेटलो तसं लोटांगण घातलं, म्हनला या खेपेस या. तुमचा हात लागला तर ही वीत नक्की जगलं. आता मी काय द्येव हाय? जायला काय न्हाय पण येताना रातच्याला पंचायीत…. बरं घरी शहरातून पोरगं आलाय … कारभारणीने मस्त मटन केलंया. म्हन्जे रातच्याला परतायलाच हवं” सकाळचा बाजार उरकून घरी जाताना सदुभाऊ सवताशीच बडबडत जात होता. गाव तसं लहानच ५ – ५० घरांच. गाव कसलं मोठा पडाच तो.

सरप्राईज टेस्ट आणि गोंधळलेला परिक्षक.

लेखनप्रकार
मधली सुट्टी संपली आणि नव्या तासाचा टोला पडला. विज्ञानाच्या बाई वर्गात शिरल्या तसा पोरांचा कलकलाट थांबला. बाईंनी पुस्तक उघडुन नवा धडा शिकवायला घेतला. आजचा धडा होता 'मुळं'. बाईंनी फळ्यावर जमतील तशी चित्रं काढत वेगवेगळ्या मुळांचे प्रकार सांगीतले. उदाहरणं ही दिली. लेकीच्या मनात बाईंची परिक्षा घेण्याची लहर आली. उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला. "टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?" कुणी रताळं 'मुळ' की 'खोड' असं विचरल्यावर पटकन बेधडक 'मुळ' उत्तर आलं असतं. पण 'स्वीट पोटॅटो' म्हटल्यावर चटकन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे.

जाहिरातींची विनोदी "वाट"!! (पूर्ण संग्रह)

लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तुत आहेत, काही जुन्या प्रसिद्ध जाहिराती .... माझ्या ("व्यंगचित्रकाराच्या") मिस्कील तिरकस नजरेतून... वाचतांना मूऴ जाहिराती आठवल्यास वाचनाचा आनंद आणखी वाढेल यात शंका नाही.... अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयोग.... मूळ जाहिराती मुद्दाम येथे सांगत नाही... तो तुमच्यासाठी होमवर्क समजा! जागोजागी हिन्ट दिल्या आहेतच. (१) 'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो : "काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?" ती म्हणते : " असा ऊस खायला मजबूत दात हवेत. हे दातच नाही तर माझे शरिरसौष्ठव पण बघ.

वऱ्हाडी लोकगीत -उचाट नागोबुढा

काव्यरस
इयत्ता पाचवीत शाळेतल्या संगीत शिक्षकांकडून शिकलेलं व आजही तोंडपाठ असलेलं एक वऱ्हाडी लोकगीत. माझे योगदान केवळ टंकण्याचे. ------------------------------ पावसानं इचीबहीन कहरच केला गावच्या नदीले पूरच काय आला अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला बुढीबी बाप्पा भल्ली गया काढून रडे अन खोपड्यामध्ये इचीबहीन उठू उठू पडे यक जन पलीकडे जाऊन बी आला अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला नागोबुढा पोरीच्या घरीबी गेला अन तुपासंगं पोयी खाऊन बी आला तरी म्हने यक रस राहूनच गेला अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला पायटी पायटी बुढा कानी गावातची दिसे अन लोकाईकडे पाहून गालातची हसे लोक म्हने काबे काऊन नाही मेला अन लोक म्हणत न
Subscribe to विनोद