Skip to main content

विडंबन

तो एक लाज-पुत्र

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 16/01/2012 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी पार्श्वभूमी-इथे एका कालीज(कॉलेज) कन्यकेने एका रोड-रोमिओमुळे त्रस्त होऊन काही मैतरणींना हाताशी घेऊन,त्याला धडा शिकवला आहे...(खरं म्हणजे प्रस्तुत प्र-संग आमच्या शालीन वयात ;-) ,आमच्या पल्याडच्या कालीजात आखो-देखे घडलेला होता, तो आज त्या कॉलेजला काही कामानिमित्त भेट दिल्यामुळे स्मृतिपटलावर आला...म्हणुन म्हटलं आलाय बाहेर..तर त्याला जमेल तसा मांडावा) तो एक लाज-पुत्र,मी ही-रान्टी फूलं। चारिन मी ,मी त्याला ग्राउंडची माती/धूळ॥धृ॥ कंठात बगळ्याचे हाड,केसात उवांची जाळी अंगाला सार्‍या बरबटुन शाई,घालीन चपलांची माळ।१। खाशील का पुंन्हा माती..?करशील का उचापती..?। ताई रे ताई म्हणुन स्वारी,भरशील नळावरी
काव्यरस

(खा घास हा)

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 13/01/2012 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन हा प्रकार तसा मला जास्त आवडत नाहि .. एक चुकुन विडंबन केले होते 'खेळ मांडला' याचे.. पण करुन विडंबन नसतेच असे ऐकुन घेवुन विडंबनातील काही कळत नाही म्हनुन गप्प होतो.. आज काल श्री वल्ली महाराज चिंचवडकर यांच्या प्रेरणेने आम्हास मनाच्या विरुद्ध जावुन विडंबन करायचे सुचले आहे, त्यात सकाळीच स्पा ने एक मोरपिस फिरवल्याने लिहायला घेतले .. आता दारु न पाजता विडंबन कसे करायचे हे मात्र वल्ली महाराजांकडुन शिकले नसल्याने आम्ही भातच खायला घातला आहे.. गोड माणुन घ्या ...
काव्यरस

तुम्ही पी एम बनणारच ..

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 09/01/2012 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा आमचे युवराज वदून गेलेत .......त्याला कोणीही रोखू शकणार नाही तेव्हा आम्हा झाला साक्षात्कार खरेच..... चोऱ्या, दरोडे, खून, बलत्कार, जुगार या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भेसळ, साठेबाजी, नफेखोरी, कर बुडविणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भ्रष्टाचार, स्वीस बँकेतील काळा पैसा, पैसे, दारू वाटून निवडून येणे या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही गावात अमंळ लोड शेडींग कचरा, घाण,रस्त्याचे कडे वरील ....विधी या गोष्टी चालूच राहणार त्याला कोणीही रोखू शकणार नाही शहरात चार दिवसाआड पाणी, पुतळ्यांची गर्दी रस्त्यांवरील खड्डे,....निष्पापा
काव्यरस

(चितळेबंधू सांगतायत बाकरवडीच्या युक्त्या )

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 08/01/2012 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या मित्र हो, चितळेबंधू मिठाईवाले आपणास माहीतच आहेत. त्यांच्याबद्दल आपण अनेकदा वाचले आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक पैलू सादर करत आहे. दरवर्षी अनेकवेळा तुम्ही चितळेबंधूंकडे मिठाई आणायला जाता, अर्थात दुपारी १ ते ४ ही वेळ टाळून कारण ही वेळ त्यांच्या झोपेची असते. सणांच्या दिवशी तुम्ही तर अधिकच गर्दी करता, २०११ च्या दिवाळीत मात्र चितळ्यांकडे लांबच लांब रांग लागली होती. पार पंचक्रोशीतून लोक गर्दी करत होते.

बाई माझी, ही तंगडी मोडली

लेखक विदेश यांनी शनिवार, 07/01/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: बाई माझी, करंगळी मोडली) ऐन दुपारी, नमुना फेरी, गाडी नवी काढली - काढली बाई माझी, ही तंगडी मोडली || धृ || झणी मारून मी कट वळताना कुठून अचानक आला श्वान हा गुपचुप येऊन, पाठीमागून माझी साडी ओढली || बाई माझी ... समोर भुंके कसा आडवा पायच धरला, (-अंगाला घाम फुटायचं ते कारण होतं का?) माझा उजवा मी ओरडले, तिथेच पडले, उठताना मोडली || बाई माझी ...

सर आले दुरुनी

लेखक विदेश यांनी मंगळवार, 03/01/2012 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
(चालः स्वर आले दुरुनी ) सर आले दुरुनी गेल्या सगळ्या त्या मैतरणी || खुर्चीत उसासे साऱ्यांचे होस्टेलमधील त्या पोरांचे कुजबुजही नव्हती पोरींची धुसफुसही नव्हती कोणाची ऐशा रमलेल्या त्या स्थानी || वर्गात मनोरथ किति रचले गालावर हासू पाघळले काही हृदयातचि ते घुसले बाणांतुनी स्पंदन जाणवले झेली सुंदर मैत्रीण कुणी || प्रतिसाद सरांचा तो न कळे अवसान परी का पूर्ण गळे संधीच न मिळता पोरांचे घबराट पुन्हा सर ते दिसले चहाडी चुगली का केली कुणी || (पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)

तोच थंडगार भात

लेखक विदेश यांनी मंगळवार, 27/12/2011 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : तोच चन्द्रमा नभात ) तोच थंडगार भात तीच प्लेट पाहुनी एकांती मजसमीप तीच भीति का मनीं ! खारट चटणी तशीच रोज तेच भांडणे पोळ्यांनी सोडियले नीट येथ भाजणे भाजीचा गंध तोच तीच कुबट फोडणी ! सारे जरि ते तसेच संधि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तीहि, दुसरी मेस ती कुठे ? ती कपात ना दरात अश्रु दोन लोचनी !
काव्यरस

वोडार

लेखक ajay wankhede यांनी रविवार, 25/12/2011 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी ओडार, नाही हो नागरिक या देसाचा जागा दिसली खुली का ताण डेरा न.. मंग सकाळ पासून दे दनादन घाल घाव काळ्या ठीक्कार दगडावर... घामाच्या धारा,छेनि, हातोडी टक.. टक..

(सावली)

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 17/12/2011 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: सावली आता ठरवलय की कवी व्हायचं नाही, पण तरीही येतो एक झटका जस जशा इतरांचा कविता दिसत जातात, कागदांच्या ढिगार्‍यात बसलेला वेचत असतो उमटलेले शब्द अन् शब्द, सोबतीला असतात ताव,कलमे, करत असतात सोबत जुळवणार्‍या यमकांशी, 'ट' ला 'ट' जोडून मुक्तछंदाच्या साक्षीने, आणि लिहीत असतो त्या कागदाच्या तुकड्यांवर उगाच काहिही, सोबतीला असते माझी आकांक्षा मी प्रसिद्ध कवी होण्याची वाट पाहात..... --- न्याहाळे कविछंद
काव्यरस

(ऐल-पैल)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/12/2011 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिथयश कवयित्री क्रांतीतैंचं अप्रतिम काव्य 'ऐल-पैल' वाचलं आणि मी सैरभैर झालो! मग काय आपोआप दाद निघालीच मनातून! ईर्शाद!! ऐल मळे पैल खळे भेटू मी कुठे, ना कळे टाकता पाऊल वळे बापूस माघारी! ऐल दिवा पैल वात भेट नाही पंध्रवड्यात आहे काळोख घरात खवीस दारी! ऐल साद पैल जाई चिंच फोक चोप देई ओरडा घुमत जाई भर बाजारी! ऐल 'चंद्रा' पैल 'निशा' अभिलाषा दशदिशा धुमसतात वेड्यापिशा पेटल्या सिगारी! ऐल जान पैल सखी बाप 'गाजरपारखी' दमदाटी हो सारखी 'वळ' 'माघारी'! ऐलपैलाच्याही पार तुझ्या परसाचे दार त्याच्या पायरीशी प्यार दे गं दुपारी! -चतुरंग
काव्यरस