Skip to main content

विडंबन

तळतेस भजी तू जेव्हां -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 11/08/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: नसतेस घरी तू जेव्हां -) तळतेस भजी तू जेव्हां - जीव 'सुटका सुटका' म्हणतो.. मिरच्यांचे वरती तुकडे तोंडात घास का फिरतो ? बघ फेटून पीठ- कसाही का गोळा कच्चा जळतो ! ही जिव्हा रुचीहीन होते - अन्

(महावीर पांडू)

लेखक पॅपिलॉन यांनी गुरुवार, 11/08/2011 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा पोथी न पंचांग हाती मिरवत पांडू फिरतो डोलत डोलत दे आव्हाने येता-जाता - "काय कुणाची आहे हिंमत?" शुक्रावरुनी चंद्रावरती चंद्रावरुनी राहूवरती कधी कधी पण पुरता फसतो पराक्रमी तो पांडू असतो! प्रति-आव्हाने जर का येती पांडोबाचे पद लटपटती होराशास्त्री पांडू अमुचे रिंगण सोडून पळून जाती!!

मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं -

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 10/08/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
( मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं ) चाल : माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं मुंबैच्या दर्यामंदी साचले काळं पानी खुपते दृश्य सारं, किनारा पाहुनी कोळंबी,बांगडा धोक्यात जीवं येतं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं ! नावेची सागरात, जोरात धडक होई एमेसी चित्रा हंसा, बुडूनी त्यात जाई 'रेसक्यू ऑप्रेशन' नेहमीच फेल होतं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं ! फसतो कोळी
काव्यरस

आटपाट नगरात नवीन घर आणि ऑफिस...!!!

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 05/08/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय. नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो. आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे. त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्‍याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये..

(एकांत....)

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 05/08/2011 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
... पोरांनी पार धुडगुस घातला होता. येणार येणार म्हणून आम्ही पोरं ज्या मोठया विकांताची वाट पाहत होतो, तो विकांत एकदाचा आला होता. मी, चिंटू, अम्या, रव्या, जग्या आणि सम्या अशी सहा टाळकी केव्हाच ब्यागा भरून तयार होती. एंटरप्राईजमध्ये जीएमसी युकॉन बुक करुन झाली होती. गाडी कसली म्हणा, एक अजस्त्र धुडच होतं ते. अंगात नुसती सुरसुरी भरली होती. साहजिकच होतं म्हणा. कारण आम्ही सारे लाँग विकेंडला डिझ्नेलँडला जाणार होतो. यथावकाश ती शुक्रवारची संध्याकाळ आली. आणि आमचा लॉस एंजेलिसच्या दिशेने प्रवास सुरु झाला. सम्या व्हीलवर बसला होता. आधीच सम्याला वेगाचं भयानक वेड त्यात हातात युकॉनचं व्हील. मग काय विचारता.

लाचखोर लोकांनी -

लेखक विदेश यांनी रविवार, 24/07/2011 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...) लाचखोर लोकांनी, भ्रष्ट साऱ्या मार्गांनी स्वार्थासाठी कायदाही तोडीला पायबंद घालू त्यांच्या खोडीला |धृ| नवी कोरी गाडी काळ्या पैशाची भरली ती भेसळीच्या मालाची गुंड आले तडीपार, तडीपार जोडीला |१| पायबंद घालू.. जात येत विमानानं देशात, परदेशात दलालीत डल्ला मारी देशात, मायदेशात त्यांनी मायदेशाचा टॅक्स का हो बुडविला |२| पायबंद घालू.. चीड नाही त्यांना देशद्रोहाची मिरवित शेखी स्विस बँकेची घोळघालू नाती सारी भूखंडाच्या वाढीला |३| पायबंद घालू..
काव्यरस

(आली माझ्या घरी ही गटारी )

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 23/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी सौंदर्यं यांची ही गाथा वाचली आणि आम्हाला ही आता तयारी करावी लागणार याची जाणीव झाली. आली माझ्या घरी ही गटारी सर्व पेयांची झाली तयारी मस्त रात्रही,धूंद वास हा,मी तर पेग भरावे दर वर्षी रे,वेग वेगळी घेऊन मी पहावे कीक जोरात बसे,काडी ओठी घुसे दोस्त लोकांची मैफल न्यारी आली माझ्या घरी ही गटारी !!! विदेशी मारता नको असता,भानही हरपून गेले तंगडी बुर्जी पापड आणून, जेवण भरपूर केले हर्ष दाटे उरी, मित्र आले घरी आज बनली चिकन तंदुरी आली माझ्या घरी ही गटारी !!! अमोल केळकर --------------------------------------
काव्यरस

कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान

लेखक स्वप्ना_तुषार यांनी सोमवार, 11/07/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
कवीवर्य ग.दि.मांची माफी मागून कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान कपडे काढून दावी डोले शोले कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान बिगबॉसच्या ह्या सिज़न साठी किती गाळे घाम॥ध्रु॥ एक एक बाई नवी , फॅन गाई गीत एक एक लफ़डी जोडी कुणी न धरे ह्याचा हात, बिचारा हा नाथ॥1॥ कधी अ‍ॅश तर कधी कतरीना संगे, हाच होई त्यांचा दास एक एक प्रकरणी गुंते, फ़ेस येई तोंडास, खानांचा हा खान॥2॥ चाळीशीच्या उंबरठ्यावरती एकच आहे आस आतातरी कुणी यावे कुणी घ्यावे पास, व्हावे कुणाचातरी नाथ ॥3॥ हळूहळू उघडी डोळे पाही जो सलमान वापरूनी सख्या गेल्या कापूनी माझी मान,कुठे म्हणे सलमान॥4॥
काव्यरस