(खा घास हा)
लेखनविषय:
काव्यरस
विडंबन हा प्रकार तसा मला जास्त आवडत नाहि .. एक चुकुन विडंबन केले होते 'खेळ मांडला' याचे.. पण करुन विडंबन नसतेच असे ऐकुन घेवुन विडंबनातील काही कळत नाही म्हनुन गप्प होतो.. आज काल श्री वल्ली महाराज चिंचवडकर यांच्या प्रेरणेने आम्हास मनाच्या विरुद्ध जावुन विडंबन करायचे सुचले आहे, त्यात सकाळीच स्पा ने एक मोरपिस फिरवल्याने लिहायला घेतले ..
आता दारु न पाजता विडंबन कसे करायचे हे मात्र वल्ली महाराजांकडुन शिकले नसल्याने आम्ही भातच खायला घातला आहे.. गोड माणुन घ्या ...
-------------------------------
कधी दूर - दूर कधी तू समोर ..
भात तुज भरवते आज हा ?
खा हे कसे ,नाहि तसे
हा घास लागे जीवा..
कशी सावरू मी आवरू रे तुला ?
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
खा घास हा, खा घास हा..
का छळतो मला ,छळतो मला
खा घास हा..................
क्षणात सारे ,चिमन पाखरे.. झुळूक होऊनी जाती..
कधी दूर तू ,कधी हळुच जवळ वाटे
पण भाताखेरीज माझ्या, काहीच नाही हाती .....
मी अशीच बोलते, उगीच रागावते
पुन्हा तुला बोलवते ..
मग उठुन थोडे तुला भरवते
तुझ्याच साठी फिरते ...
तू असताना रोजचाच खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला
खा घास हा ........
मनात माझ्या हजार शंका
तुला मी जाणून आहे
तू असाच आहेस , तसाच नाहीस
डांबिस असा तू खरेच आहे
तू इथेच बस ना ,हळूच हास ना
असाच हवा मला तू ..
पण माहित नाही मलाही अजुनी ..
भात तसाच आहे का अजुनी ?
नवे रंग सारे , रोजचे हे पसारे तरी ..
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला
खा घास हा ...................
खा घास हा ,खा घास हा
तु छळतो मला ,छळतो मला
खा घास हा..................
----- शब्दमेघ
वाचने
3559
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
कविवर्य गणेशा यांनी कुठल्या गाण्याचं विडंबन केलय तेच झेपलं नाय हो आम्हास. गाण्यांच्या बाबतीत आमचा अभ्यास तोकडाच आहे.
तरी स्वतंत्र कविता म्हणूनच हे विडंबन वाचल्या गेले आहे.
In reply to कविवर्य गणेशा यांनी कुठल्या by प्रचेतस
घ्या आता खुद्द महाराजांनीच " यंदा कर्तव्य आहे" ला खो दिल्यागत झाल ना ..
आभास आहे सगळा .. आभास हा ..
In reply to घ्या आता खुद्द महाराजांनीच " by गणेशा
कुणाच्या तरी ख.व.मध्ये आत्ताच याचा स्रोत वाचल्यासारखा वाटतोय.....
खरंच वाटतोय की आभास हा? ;-)
In reply to कुणाच्या तरी ख.व.मध्ये याचा by प्रास
[:)]
मुंबई मध्ये पार्ल्याला एकदा, अश्विनी शेंडें बरोबर एक कार्यक्रम केला होता.. (बरेच दिवस झाले आता.. आपला मार्ग वेगळाय आता, ) तेंव्हा तीने नेमकी 'आई' कविता म्हंटली होती.. आता तिच्याच गाण्याचे विडंबन करता ना आईच सुचली मग ..
बाकी हे गाणे आमच्या आवडत्या गाण्याच्या यादीत होत काही दिवस ...
अवआंतर :
आणि काय प्रास भाऊ, तुम्ही किती सुंदर लेखमाला सुरु केली आहे, पण इंग्रजीच अन आमच वाकडड.. त्यात ती गाणी ऐकली की त्यात काय शब्द असतात इथपासुन आमची सुरुवात ..
तेव्हडे " आते जाते हसते गाते " हे माझे आवडते गाणे आहे म्हणुन " i just want to say , i love you" येव्हडेच काय ते ऐकले आहे ( आणि पाहिलेही [:)])
त्यामुळे तुमच्या धाग्यावर प्रतिसाद नसल्याबद्दल क्षमस्व .. जरा या की काव्य विभागात पण हळु हळू
अतिअवांतर : अवआंतर ला जाहिरात समजु नये, तो फक्त प्रास ला रिप्लाय आहे, इतरांना नाही.
just kidding
In reply to [:)]मुंबई मध्ये पार्ल्याला by गणेशा
i just want to say , i love youमाझेही आवडते गाणे.. अंध स्टीव्ही वंडरचे.. बादवे.. ते गाणे "I just called to say I love you " असे आहे हे नमूद करु इच्छितो. लायनेल रिचीचे "हॅलो"ही फार आवडते.
In reply to माझेही आवडते गाणे by गवि
स्टीवी आणि रिची दोघांचीही ही गाणी मलादेखिल आवडतात.
इंग्लिश गाण्यांची सुरूवात त्यात कोणते शब्द वापरले आहेत यापासूनच होते म्हणून मग लिरिक्स देण्याचा प्रघात ठेवतोय मी. आत्ताच आणखी एका गाण्याबद्दल लिहिलंय, जॉन लेननच्या. त्याचं मराठी स्वैर रुपांतरही करण्याचा प्रयत्न केलाय. सहज समजेल बघा हे गाणं आणि नक्कीच आवडेल.....
बाकी अधून मधून या विभागातही चक्कर मारतंच असतोय की, आता प्रतिसादही देईन....
अवांतर - ही जाहिरात नाही फक्त गवि आणि गणेशाला रिप्लाय दिलाय, हे सू. सां. न ल. ;-)
In reply to कविवर्य गणेशा यांनी कुठल्या by प्रचेतस
विडंबन छान :)
पण तुमच्या या विडंबनामुळ आम्हाला आमच्या ख व तले हे आमच अतिप्रिय गाणे बदलाव लागल
असो... :)
In reply to विडंबन छान पण तुमच्या या by पियुशा
पण तुमच्या या विडंबनामुळ आम्हाला आमच्या ख व तले हे आमच अतिप्रिय गाणे बदलाव लागलकाय संबंध? कुणी सांगितलं बदलायला? का बदललंत?
कवी गणेशाच्या ह्या विडंबनाचे विडंबन करायचा किडा खुळखुळत असल्याने पहिल्या दोन कडव्यांचे टुकार विडंबन करायचा प्रयत्न केला आहे.
बाकीच्या ओळींचे विडंबन अजून कुणी तरी करावे.
कधी दूर - दूर तर कधी समोर ..
कचराडेपो दिसे मज हा
बघू ते कसे, नाही तसे
हा वास लागे नाका...
कसा आवरू रे मी त्याला
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
घ्या वास हा, घ्या वास हा
का उग्र येतो पुन्हा
घ्या वास हा,
क्षणात सारा, डबा उधळुनी, चोहीकडे पसरूनी जाई,
कधी दूर तर कधी झटकन जवळच येत जाई
पण वासाखेरीज माझ्या काहीच नाही नाकी..
मी रूमाल लावतो, डोळेही पुसतो
पण तरीही वास येतो
मग उठुनी डिओ फवारीतो
वासालाच दूर पळवितो
कचराडेपोचा रोजचाच खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
घ्या वास हा.....
In reply to घ्या वास हा. by प्रचेतस
हसुन हसुन पुरेवाट ..
वल्ली महाराज चिंचवडकरांचा विजय असो ..
आजच आपुले दर्शनाकरिता, पवई परगण्यातुन प्रस्थान करिण्याचे योजिले आहे..
कळावे
सेवेची ठाई तत्पर
In reply to घ्या वास हा. by प्रचेतस
@कधी दूर - दूर तर कधी समोर ..
कचराडेपो दिसे मज हा
बघू ते कसे, नाही तसे
हा वास लागे नाका...
कसा आवरू रे मी त्याला
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
घ्या वास हा, घ्या वास हा
का उग्र येतो पुन्हा
घ्या वास हा,
In reply to @कधी दूर - दूर तर कधी समोर by अत्रुप्त आत्मा
विडंबनसम्राट वल्लि महाराज की जय!!!!
मस्त
कोणत्या गाण्याची विडंबनं म्हणायची दोन्ही??
कविवर्य गणेशा यांनी कुठल्या