Skip to main content

विडंबन

(सौंदर्याचे प्रौक्षण करुनि)

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 28/10/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुच्या दिवाळीच्या कवितेचं मागल्या वर्षी विडंबन केलं होतं. यंदाही प्रयत्न करतो आहे! म्हटलं तर विडंबन म्हटलं तर निराळी कविता. कसंही.
काव्यरस

(हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 17/10/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रासस्टांझाज ने केलेली गजल आम्हाला आवडली त्यावर आमची ही दाद ;) हलकेच मलम लावू, किति या बुडास अजुनी? हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी? ही प्यांट फाटली अन्, तुटल्या जरी वहाणा 'क्षितिजा' दिसे बरी हा, भलताच ध्यास अजुनी? 'ज्योती' लगेच पटवू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल कानी, 'नियती'स आस अजुनी! उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी! ही स्यांडले खुणेची नेती मला घराशी! होतो मुशाफिरीचा 'रंग्या'स भास अजुनी! (इतरत्र पूर्वचाचणीसिद्ध)
काव्यरस

रक्तगंध

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 13/10/2011 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा हा विडंबनाचा चुकार टुकार प्रयत्न प्रेरणा -स्पा यांची ग्रहण ही कथा आणि गणेशा यांची स्पर्शगंध ही कविता. हे विडंबन रचण्यात ५०फक्त यांचे मोठे योगदान आहे, त्यांचे खास आभार. रक्तगंधाने बुजलेल्या वाटेवरती तो स्पर्श बोचरा होता सुरकुतल्या कोरड्या कातडीत मात्र रक्तनिर्झर खळाळत होता हलक्याच कुटील चाव्याने तो कुशीवर वळताच त्या हिरव्या डोळ्यांच्या मागे देह वेदनेत बुडाला होता तशातच आकाशात रात्रीने सोडला काळिमा अभद्र कौलारु खोल्यांमधुनी अजुनी तो रात्री भटकत होता जळमटलेल्या काळोख्या रात्री एक चांदणी ध

‘फोर लायन्स’ – बावळट जिहादींची आचरट ब्रिटिश कॉमेडी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 29/09/2011 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
Four Lions - Poster कोणतीही गोष्ट पवित्र न मानता कशाचीही यथेच्छ चेष्टा करण्यात ब्रिटिश लोक पारंगत आहेत. मग जिहादी दहशतवाद याला अपवाद कसा ठरेल? दहशतवाद्यांची आणि त्याला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांचीही खिल्ली उडवणारा ‘फोर लायन्स’ हा ब्रिटिश चित्रपट Channel 4वर नुकताच ११ सप्टेंबरच्या दशकपूर्तीनिमित्त दाखवण्यात आला. असला नमुना चित्रपट अशा वेळी दाखवून ब्रिटिशांनी आपली विनोदबुद्धी आजही शाबूत आहे याचाच निर्वाळा दिला.

(मालकीणोपदेश)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
(मालकीणोपदेश) संदर्भ "लिहावे की न लिहावे, उडेल की न उडेल, रुचेल की न रुचेल, संपादेल की नसंपादेल हाच मोठा प्रश्न आहे" - पाषाण भेद-फियर (करू नको) (वरील जगप्रसिद्ध वक्तव्य असणारा गहन प्रश्न आमच्याही मनात आला पण गावातील आजकालचे नवनवीन Items पाहून ती भीती कमी झाली.) काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी बृ-स्पतीवारात माझ्या क्लायंट्सना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला बृ-स्पतीवार परिसराची एक चक्कर पुरेशी असते.

(रमी)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 17/09/2011 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
यासाठी वापरलेला कच्चा माल पत्तेजुडग्याच्या मंथनातून १३ रत्ने बाहेर आली. एक्का, तिर्री, दश्शी, गुलाम राजा वगैरे वगैरे. पण कुशल खेळाडूला रमी ही जमवावी लागते. ती रमी प्रकट झाल्यावर पत्ते उघड करण्याआधीच्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला असीमकौशल्ये प्रकटे रमी एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा पाठराखीण जिची लक्ष्मी अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला लक्ष्मी ही जिची पाठराखीण आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली. :)
काव्यरस

जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !!!

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 15/09/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. जालरंग प्रकाशनातर्फे आपणही दिवाळीचे स्वागत साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी करूया. आपण नवोदित असाल किंवा अनुभवी, आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता. आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये.

(माझे लेख दान केले)

लेखक निनाद यांनी शनिवार, 10/09/2011 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
गंगाधर मुटे यांची अस्तित्त्व दान केले ही सुंदर गझल पाहिली आणि आमच्या अस्तित्त्वाची आठवण झाली. मुटे साहेबांची क्षमा मागून... असणेच आज माझे, नसण्यासमान केले माझ्याच बायकोने माझे लेख दान केले मागेच विसरलेल्या एकाच आयडीने अकाऊंट आज माझे, डुआयमान केले हळवा नकोस होऊ, मित्र मला म्हणाले संतप्त बायकोनी, जरी उपटून कान नेले चंचूप्रवेश होता घरी हळुवार पावलांनी तो वास येता, बायकोनी त्रस्त दिनमान केले वाचाळ बायकोला वैतागलो पुरेसा सेक्रेटरीसह जाणारै, बुक विमान केले ठेचल्या शरिराला मी चाचपतो अजूनी सासर्‍याने हाडांना माझ्या चूर्णासमान केले भेटले त
काव्यरस

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ