Skip to main content

बाई माझी, ही तंगडी मोडली

लेखक विदेश
शनिवार, 07/01/2012 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: बाई माझी, करंगळी मोडली) ऐन दुपारी, नमुना फेरी, गाडी नवी काढली - काढली बाई माझी, ही तंगडी मोडली || धृ || झणी मारून मी कट वळताना कुठून अचानक आला श्वान हा गुपचुप येऊन, पाठीमागून माझी साडी ओढली || बाई माझी ... समोर भुंके कसा आडवा पायच धरला, (-अंगाला घाम फुटायचं ते कारण होतं का?) माझा उजवा मी ओरडले, तिथेच पडले, उठताना मोडली || बाई माझी ...
लेखनविषय:

वाचने 1130
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

चाफा यांच्या कथेची आठवण झाली. फक्त "कुठून अचानक आला श्वान हा" इथे 'हा'जास्त झालाय. 'श्वान हा' च्या ऐवजी कोंकणी 'सूणा' नाहीतर 'श्वाना' चालतोय का बघा! ;)