Skip to main content

विडंबन

(राया मला अनफ्रेंड करू नका)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 01/09/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका आधुनिकोत्तर तरुणीची ही दारूण फेसबुककथा आहे. तरुण अन् तरुणी पूर्वी प्रत्यक्ष बागेत वगैरे भेटत. आजकालच्या व्हर्च्युअल विश्वात ते फेसबुकाच्या फार्मव्हिलमध्ये भेटतात. अशाच एका तरुणीला, आपल्या कवितेच्या नायिकेला एक तरुण भेटला. वॉल फोटो वगैरे तपासायचे कांदेपोहे झाल्यानंतर रीतसर फ्रेंड रिक्वेस्ट झाली. एकमेकांना त्यांनी बघितलं नव्हतं. तरी वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच कॉजेसना सपोर्ट करून, फार्मव्हिलमध्ये एकमेकांच्या झाडांना पाणी घालून त्यांची मैत्री वाढली. तिने त्याला आपल्या अकाउंटचा पासवर्ड दिल्यानंतर मात्र चित्र पालटलं.
काव्यरस

() हजामांना मार्गदर्शन करता येईल का? ()

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 30/08/2011 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाड्मयचौर्य नाही, फारतर कल्पना आणि शब्द उधारीवर आणले आहेत. कुठून? करा थोडं खोदकाम. सर्वच छोट्या मोठ्या शहरखेड्यांत हजाम अस्तित्वात आहेत. वेळोवेळी नवीन हजाम आपापली दुकानेदेखील उघडतात. (त्यातल्या काहींचा हजामपणाचा धंदा बसला. काहींनी वयोपरत्वे राजीनामा दिला. काहींनी तर पुन्हापुन्हा राजीनामा दिलेला आहे. तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. काही हजामांच्या मते आपण त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिल्लक असलेल्या) सर्वच हजामांना बिनपाण्याने सफाई करण्याची इच्छा असते.

संपादकाचे घासूगुर्जीस पत्र..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 26/08/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय राजेश घासू आण्णा यांसी, जय मिपाराष्ट्र! एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. मिपाकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या संपादकांबद्दल असूया कवितेच्या पाककृती विषयक लेखाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. सध्या आपण मिपाच्या मर्कटलीला मैदानावर एकूणच पिडीत लोकांसाठी स्लटवॉक नामक जबरदस्त युद्ध पुकारले आहे.

हॅलो.....हॅलो.....

लेखक गजा गाजरे यांनी शुक्रवार, 19/08/2011 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो..आबा , अव किती येळ लावलाय फोन उचलायला" "अरॅ दादा होय , अर बार लावला व्ह्ता. तू आमच लेका सगळच बंद करुन टाकलस. मंग असं गुमान खाव लाग्तया" "आवो पन कुठ अहात तुम्ही ? " "काय लेका एका माग एक लचांड माग लाव्ता तुमी..पार डोक्याची मंडई झाली . म्हून येऊन बसलोय हिकड म्हाबळेश्वरला आपल्या फार्म हाउस वर" "काय आबा तुमी बी..एव्हढ मनाला लाउन घेताय.

...

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 19/08/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

टून

लेखक कोदरकर यांनी बुधवार, 17/08/2011 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
cartoon