मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

आझम अमीर कसाब यांस अनावृत्त पत्र

येडा खवीस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री आझम कसाब, नमस्कार, खरा म्हणजे तुला नमस्कार करायला नकोय...तुम्ही एवढा मोठ्ठा चमत्कार दाखवल्यावर आमच्या हिंदु प्रथेनुसार मी तो केलाय. तु आणि तुझ्या सहकाऱ्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ले करुन आम्हाला पार जेरीला आणलेस, जवळपास २०० नागरिक, कार्यक्षम दक्ष पोलिस अधिकारी यांचे बळी घेऊन मगच तुमच्या बंदुका थंडावल्या. परवा गेटवे ऑफ इंडीयावर झालेल्या रॅलीतुन यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, आता नागरिकच जागे होतायत. राजकारणी आणि एकंदर ब्युरोक्रसी किती होपलेस आहे ते आता सगळ्यांना समजलय( निदान त्यामुळे २०० जणांच्या आत्म्यांना गती मिळेलंस दिसतय)...तुमचा हल्ला हा एक भ्याड हल्ला होता असं मी काही म्हणणार नाही.

नगरसेवक आमदार खासदारांना खुषखबर!

सुनील मोहन ·
लेखनविषय:
निवडून आलेले अधिकारी, म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर भ्रष्टाचार रोधक कायदा १९८८ (prevention of corruption act 1988) याअन्वये खटला भरता येत नाही असे न्यायमूर्ती पी.एच.माळी यांनी निकालपत्रात म्हणत मुंबईतील महालक्ष्मी इथले नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांची मुक्तता केली.नगरसेवक पुगावकर यांच्यावर चार हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली खटला सुरु होता. १९८८ च्या या कायद्याखाली खटला भरला जाणारी व्यक्ती ही नेमणूक केली गेलेली असली पाहिजे, निवडून आलेल्या व्यक्तीवर असा खटला भरता येत नाही.

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

बबलु ·
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

अप्रकाशित...

सरपंच ·
लेखनप्रकार
राम राम, कायदे तज्ञांच्या सल्लामसलतीनुसार काही सुरक्षिततेच्या कारणांकरता सध्या सुरू असलेल्या मुंबईच्या हल्ल्याशी निगडीत सर्व धागे व प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येत आहेत... आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी या चर्चेत गांभिर्याने भाग घेऊन आपापली मते मांडली त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार... कृपया सहकार्य करावे... तात्या.

मिपाचे वैभव..!

विसोबा खेचर ·
राम राम मिपाकरहो.. नुकताच मिपाकर सुनील यांनी 'मिपाचे बंद पडणे..' अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीस तिथे आम्ही उत्तर दिले आहेच परंतु आमच्या उत्तराला सपोर्टिंग म्हणून आम्ही खाली काही चित्रे प्रकाशित करत आहोत.. या वरून मिपाची वाढती लोकप्रियता सहज लक्षात यावी.. आणि म्हणूनच आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त कृत्रीम ताण आणून मिपा वारंवार बंद पाडत आहेत हे उघड आहे... असो, या बाबतीत शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहेत.

मी परत एकदा

द्विज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जीवनात नसेल मिळवले "आरक्षण" आम्ही कारण आमची स्वतःवर निष्ठा आहे असे उठ्सुठ बोम्बा मारु नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? कर्मठ म्हणुन जीवभर आम्हालाच हीनवता चतुर्थीला बोलावुन कोणाला तुम्ही बनवता ? आम्हाला जातिवादी म्हणणार्या॑नो तुमच्यात स॑यम किती पक्का आहे ? असे डोळे फाडुन बघू नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? कितीही तुम्ही पुढे जावो बोट मात्र आमच्यावरच आम्ही शान्त्ततेचे घोट पिले तरी घोडे आड वळणावरच हा अन्याय न्यायदेवतेच्या डोळ्यामध्ये चिपडासारखा पक्का आहे असे बोट दाखवुन हिनवू नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? काळाच्या ओघात परिस्थितीसमोर नमते आम्ही घेतले घेतले त॑ घेतले सारे जीवावरच ब

काम

निमीत्त मात्र ·
काम करणं अथवा न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. अर्थात काम करणारे आणि काम न करणारे असे समाजात ढोबळ मानाने दोन गट असतात. परंतु एवढ्या ढोबळ वर्गीकरणातून हा विषय पूर्ण होऊ शकतो असं मला वाटत नाही. काम करणाऱ्या गटात अनेक उपगट असतात. आवडीनं काम करणारे, मनाविरुद्ध काम करणारे, काम एन्जॉय करणारे, मन मारून काम करणारे, सदा हसतमुख काम करणारे, रडत रडत काम करणारे, वेगानं काम करणारे, हळूहळू काम करणारे, आपणहून भरपूर काम करून नंतर त्याचीच तक्रार करणारे, केलेल्या कामाचा मोठा गाजावाजा करणारे, गुपचूप कामाचा डोंगर उपसूनही हूं की चूं न करणारे, आपलं काम करून इतरांचंही काम करणारे, आपल्यापुरतं काम करणारे....

पहिला दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्टा - ८ नोव्हेंबर २००८

नंदन ·
नमस्कार मंडळी, या शनिवारी ८ नोव्हेंबरला दक्षिण कॅलिफोर्नियातील पहिला मिसळपाव कट्टा - मराठी वाहिन्यांच्या भाषेत सांगायचे तर - मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी डांबिसकाका सॅन डिएगो मुक्कामी आले असताना त्यांची प्रथम भेट झाली होती. तेव्हाच मुंबई, पुणे, बंगळूर, जर्मनी, अमेरिकेचा पूर्व किनारा आणि बे एरियातील मिपाकरांप्रमाणेच लॉस एंजेलीस - सॅन डिएगो परिसरातही लवकरच एक कट्टा भरवावा अशी मनीषा पिडांकाकांनी बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे मिपावर हाळी देऊन घाटावरचे भट, भाग्यश्री आणि मी यांनी काकांच्या घरी भेटायचं असं ठरवलं.

डी जे

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डीजे म्हणजे डिस्क जॉकी असे वाटत असेल तर तो फुल्ल गैरसमज आहे. पी जे म्हणजे पुअर जोक्स असतील तर डीजे म्हणजे डबडे जोक्स असतात तुम्हाला येणारे सुपर डुपर डबडे डी जे अर्थात डबडे जोक्स लिहा. यात कोडी जोक्स चारोळी काही वर्ज्य नाही.विनोदी किस्सा सांगुनही ऐकणार्‍या माणसाला हसु येउ नये याची १०००% खबरादारी घ्यायची इतकेच पथ्य पाळायचे . उदाहारण म्हणून एक डीजे १) तीन गुडघे असणार्‍या माणसाचे नाव नीतीन ( नी = knee =गुडघा) सहा गुडघे असलेल्या माणसाचे नाव सहानी नऊ गुडघे असलेल्या माणसाचे नाव नितीन सहानी २) एक हत्ती झाडाखाली कोक पीत बसला होता त्यात एक मुंगी पडली.