Skip to main content

वावर

मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/08/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले पुस्तक हा धागा प्रतिसादानी ओसंडुन भरुन वाहु लागल्यामुळे नवा धागा सुरु करत आहे कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा एका पुस्तकावर जास्त सदस्य प्रतिसाद देऊ शकतात प्रतिसाद देताना ते पुस्तक तुम्हाला का आवडले/ त्यात वाचनीय काय आहे ते लिहावे ही विनन्ती मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत. पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत. त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत.

मला आवडलेले पुस्तक

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 27/08/2008 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत. पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत. त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत. कोठेही असली तरी प्रसंगी अखंडीत वाचीत जावे हे ब्रीद आपण सारेच पाळत असतो. चला मग आपण आपल्याला आवडलेली पुस्तके शेअर करुयात.

हू एम आय!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 20/08/2008 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
"चांगला धुतला त्या शोएब ला धोनी ने" असे उद्गार बर्‍याच वेळेला ऐकायला वाचायला मिळतात. इथे हे उद्गार एक भारतीय एका पकिस्तानी बद्दल बोलत असतो. कित्येक वेळेला सहज गप्पांमधून जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सिमा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान बद्दल वाईटच बोललं जातं. पाकिस्तानातून होणारि घुसखोरी, मुशरर्फ सरकारचा ओसामाबीन लादेन ला असणारा पाठींबा, दाऊद इब्राहिम ला पाकिस्तानात राहण्यासाठी आश्रय देण्याच्या बातम्या यांनी भारतीय मनात पाकिस्ताना बद्दल एक अढी निर्माण झाली आहे. भारतीय सामान्य जनता ही पाक सामान्य जनतेचा विलक्षण तिरस्कार करते.

जे.के.रोलींग यांचे हार्वर्ड विद्यापिठातील अभिभाषण

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 13/08/2008 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html साप्ताहिक सकाळ मध्ये अनुवादित स्वरुपात आलेले, 'हॅरी पॉटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नुकतेच म्हणजे ५ जूनला केलेले, अभिभाषण माझ्या आजच वाचनात आले. ते भाषण अतिशय आशयपूर्ण आणि सुंदर आहे. मला ते परत परत वाचावे असे वाटले. आपण सर्वांनी ते वाचावे आणि आनंद घ्यावा.

राम राम मंडळी...

लेखक स्मिता यांनी मंगळवार, 12/08/2008 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी..कसं काय चालुयं? समदं ठिकायं? दररोज ईकडुन जाणं-येणं व्ह्यायचंच... पुढं पुढं तरं ढुंकुन बघितल्या बगरं चैनचं पडेनाशी झाली बगां... तवा म्हटलं.. प्रवेश घीवुनचं टाकावा..आणि लागोलागं... "आपलचं लेकरु हायं..चुकल्या-माकाल्यासं सांभाळुन घेण्याची बी अटकळं घालावी.." आक्शी घरात असल्यासारखं वाटतं बगां... कोणं कानं पकडीतं, कोणं टपली मारतं, कोणं कौतीक करतं, कोणं कायं नि कोणं कायं.. :) चला निघते मगं, आणि सांजच्या वकुताला यीवुन बघते ...

सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण (नासाचे संस्थळ)

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 01/08/2008 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! आज सूर्यग्रहण आहे हे आपणाला माहितच आहे. नासाच्या या संकेतस्थळावर (http://www.nasa.gov/multimedia/nasatv) चीन मधून दिसणारे ग्रहण थेट दाखवत आहेत. या स्थळाची माहिती मला आताच समजली. नासाचे हे स्थळ जागातल्या अश्या काही घडामोडी नेहमीच थेट दाखवते असे दिसते आहे. म्हणजे पुढील वेळेस सुद्धा या स्थळाकडे लक्ष ठेवल्यास काही चांगले बघायला, ऐकायला मिळेल. या स्थळावर अजून काही स्वारस्यपूर्ण सापडल्यास कृपया प्रतिसादात लिहावे.

जी.एम.आर.टी. ला सहल- कोणकोण येणार

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/07/2008 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
जी.एम.आर.टी. ला सहल काढायचा बेत ठरतो आहे. जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप : http://www.misalpav.com/node/2738 जी.एम.आर.टी. ला अभ्याससहल: http://www.misalpav.com/node/2738#comment-38198 मी आत्ताच माझ्या एका बॉसशी बोलले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आपण जर आपला एक ग्रुप घेऊन गेलो तर चालेल. आपल्याला फक्त वाहतूक आणि जेवण यांची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा पुण्या-मुंबईच्या मिपाकरांना जर रस असेल तर आपण काहीतरी प्लॅन करू शकतो. माहितीजालावर लिहिलं आहे की फक्त शुक्रवारीच तिथे जाता येईल.

मिपा विरह - एक चिडचिड....अर्थातच 'आपल्या ह्या हव्याहव्याशा मिसळपाव विड्रॉवल सिंड्रोम चे काय करायचे?' :)

लेखक मनिष यांनी सोमवार, 28/07/2008 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
वि.सू. :- शीर्षक वाचून घाबरू नका...गंभीर काहीच नाही खाली! वाचून बघा....:) गेल्या आठवड्यात कामामुळे आणि करामुळे -- दोन्ही कर, आपले हात; सदा-सर्वकाळ गुंतले होते, त्यामुळे इथे येणे जमलेच नाही...नाही म्हणायला तल्ल्फ फार व्हायची पण सी.ए.