कॅलेब

लेखनप्रकार
कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... मध्यंतरी टीव्ही च्या कोणत्या तरी चॅनलवर एक गाजलेला मराठी चित्रपट लागला होता. ''मुक्ता''. सोनाली कुलकर्णी, विक्रम गोखले, डॉ. श्रीराम लागू, अविनाश नारकर ह्या अभिनय क्षेत्रातील नामवंत मंडळींचा समावेश, जब्बार पटेल ह्यांचे दिग्दर्शन... अशी भट्टी जमल्यावर खरे तर चित्रपट सुपर ड्यूपर हिट व्हायला हवा होता. पण बहुधा तसे झाले नसावे. चित्रपटात हाताळलेल्या संवेदनशील विषयामुळे असेल कदाचित. पण ह्या चित्रपटात एक व्यक्ती मात्र भरपूर भाव खाऊन गेली. कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... माझा वर्गमित्र. मला कॉलेजमधील ते सुरुवातीचे दिवस अजूनही आठवतात.

पहिलं प्रेमपत्र

लेखनविषय:
आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेमपत्र लिहायचं होतं..... मनात खूप धाकधूक वाटत होती.... छातीचे ठोके वाढायचे, तळहात घामेजायचे....सर्व नर्व्हस असण्याची लक्षणे उफाळून यायची! काय करणार?

उन्हाळ्याची तयारी

उन्हाळा आला की आमची दरवर्षीप्रमाणे 'उन्हाळ्याची बेगमी' सुरु होते. म्हणजे सर्व जाडजूड पांघरुणे, दुलया ह्यांना माळा दाखवायचा आणि त्या जागी डोळ्यांना शांत करणार्‍या रंगांच्या स्वच्छ सुती, तलम चादरी, पडदे वगैरे लावायचे. कूलरची साफसफाई करून ठेवायची! ठुमकत ठुमकत कुंभारवाड्यातून चांगल्यापैकी माठ आणायचा आणि त्याला दोन तीन दिवस आधी पाण्यात, मग उन्हात असे आलटून पालटून ठेवायचे.... त्याला तिपाईवर ठेवून त्यात पाणी भरायचे, वाळ्याची जुडी घालायची, ओले फडके बाहेरून गुंडाळायचे आणि थंडगार पाण्याच्या चवदार आस्वादाला सज्ज व्हायचे!

अर्ध्या तासाचा फरक

साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती!

विजापुरचा अजब किस्सा

लेखनविषय:
हा किस्सा विजापूरला घडलेला. वडीलांचे व्यवसायाच्या कामाअंतर्गत तिथल्या एका शेतकर्‍याने शेतजमीन सर्वेक्षणासाठी बोलावल्याने विजापूरला जायचे नक्की झालेले. आम्हाला शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग ठरले की सकुटुंब सपरिवार विजापूरला जायचे, वडील त्यांचे काम आटोपतील आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर विजापूर-दर्शन करू. ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे लाल डब्ब्यातून विजापूरला रवाना झालो. तिथल्याच एका बर्‍यापैकी लॉजमध्ये उतरलो. वडीलांची विजापुरात त्यांचे शेतकरी ग्राहक सोडले तर फार कोणाशीच ओळख नव्हती. त्यांचे काम अंदाजाप्रमाणे एका दिवसात आटोपले. आता कल्ला!! मग काय, आमची विजापूर-भ्रमन्ती सुरु झाली.

वीजेची गायब-जादू!

लेखनप्रकार
लहान असताना जादूच्या समस्त प्रयोगांनी मला जबरदस्त मोहिनी घातली होती. माणसाचे कबूतर होते, कबुतराची फुले होतात, फुलांचे रंगीबेरंगी रूमाल होतात.... आणि ह्या सगळ्या भरात मूळ कोणती वस्तू गायब झाली हेच तुम्ही विसरून जाता. जादूगार खूष, तुम्हीही खूष! पैसा वसूल!! पण गायब झालेली वस्तू मिळते का हो परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते. जादूच्या ह्या नियमाला शिरोधार्थ मानणारी मी.... त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही.

शब्दबंध २०१०

लेखनविषय:
२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे. =========================================================================== २००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०! परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय.

(नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग)

लेखनप्रकार
नमस्कार वाचकहो, आणि श्री. मनमोहन सिंग मागील लेखनात वाचकांस आधीच अवगत केल्याप्रमाणे आपल्या महान देशातल्या रस्त्यांवर रहदारी सुरळीत चालवण्याच्या नावाखाली हुकूमशाही चालू आहे. मी गाडी चालवत असताना माझ्या पुढच्या गाडीला हिरवा सिग्नल होता व तिला तसेच पुढे जाऊ देण्यात आले. मात्र मी तिथपर्यंत पोचताच दुष्ट सिग्नल लाल झाला. मी या माझ्याविरुद्धच्या कूटनीतीला न जुमानता तसाच पुढे गेलो तर पोलिसांनी मला पकडले व दंड केला. या अत्याचाराबद्दल मी रस्तोरस्ती बोंब ठोकल्याबद्दल काही नागरिकांनीही त्यांचे कान किटल्याची तक्रार केली.

बीटी पोर!

लेखनप्रकार
आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय. आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले. त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद! "तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? " "का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!" "अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?" "म्हणजे? मी नाही समजलो... " "अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय...
Subscribe to वावर