मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

शुभेच्छा...!

प्राजु ·
मिसळपाव वर प्रेम करणार्‍या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा...! प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमामध्ये चिंब नहावे जीवन हेच प्रेम असावे प्रेमासाठीच जगत रहावे... - प्राजु

ग्रस्तास्त चंद्रग्रहण दिनांक २१ फेब्रुवारी २००८

धोंडोपंत ·
नमस्कार, ग्रस्तास्त चंद्रग्रहण माघ पौर्णिमेला म्हणजे गुरूवार दिनांक २१ फेब्रुवारी २००८ रोजी येत आहे. हे ग्रहण भारतात अतिपश्चिमेकडील काही गांवातून दिसेल. ती गावे म्हणजे गुजरात मधील जामनगर, राजकोट, पोरबंदर, मोरवी, वेरावळ, जुनागढ व भूज ही आहेत. महाराष्ट्रात कुठेही हे ग्रहण दिसणार नाही, याची नोंद घ्यावी. त्यामुळे या ग्रहणाचे वेधादि नियम महाराष्ट्रातील लोकांसाठी लागू होत नाहीत. ज्या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे त्यांनी बुधवार २० फेब्रुवारी रोजी सूर्यास्तापासून वेधादि नियम पाळावेत. तसेच ग्रस्तास्त चंद्रग्रहण असल्याने गुरूवारी सूर्यास्तानंतर शुद्ध चंद्रबिंब पाहून मग भोजन करावे.

नातेसंबंध लाख मोलाचे - सचिन

बापु देवकर ·
यशाच्या शिखरावर असलेला सचिन जेव्हा नातेसंबंधांवर बोलायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडातून पहिलं वाक्‍य बाहेर पडतं, "ज्या यशाबद्दल मला श्रेय दिलं जातं हे यश माझ्या एकट्याचं नाही.' फार कमी वेळा सचिन क्रिकेट सोडून इतर विषयांवर बोलतो. या विषयावर मात्र तो भरभरून बोलला. ....... कोणत्याही मुलाचं सर्वांत मूलभूत नातं असतं ते आई-वडिलांबरोबरचं. निःसंकोचपणे मी सांगू शकतो, की माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल, तर तो माझ्या वडिलांचा. माझे वडील रमेश तेंडुलकर कमालीचे शांत होते. त्यांचे विचार प्रगल्भ असायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची भुलावण नव्हती. पैशाचा किंवा कशाचाच त्यांना अजिबात लोभ नव्हता.

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

सर्वसाक्षी ·
दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

शिर्डीतून मराठी हद्दपार? म.टा.तील लेख.

शरुबाबा ·
महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख . शिर्डीतून मराठी हद्दपार? शिर्डी महाराष्ट्रातच आहे का याची शका यावी अशा तामिळ, इंग्रजी पाट्या येथे बहुसंख्य दुकानांवर दिसतात. रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही .

दीदीना भाईकाकांच्या नावचा पुरस्कार!

चतुरंग ·
काय मोठा योग आहे, लतादीदींचा सत्कार भाईंच्या नावच्या पुरस्काराने! दीदीही धन्य, पुरस्कारही धन्य आणि ते पाहण्याचे भाग्य मिळालेले त्याहूनही धन्य!! भाईंच्या शेवटच्या दिवसातली दीदीनी सांगितलेली आठवण...भर ऑफिसमधे डोळ्यात पाणी हो! काय व्यक्तिमत्व असेल, जे स्वतःच्या टोकाच्या आजारपणात स्वतःवरच विनोद करु शकते! देवसुद्धा रडला असेल हो भाईकाकांना न्यायला लागलं म्हणून!! बातमी वाचा.

शाकंभरी पौर्णिमा = मंगळवार २२ जानेवारी २००८

धोंडोपंत ·
नमस्कार, या वर्षी शाकंभरी पौर्णिमा मंगळवार दिनांक २२ जानेवारी २००८ रोजी येत आहे. या दिवशी विविध पालेभाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. असे म्हणतात की प्राचीन काळी एकदा महाभयंकर दुष्काळ पडला असतांना सर्व ऋषिमुनिंनी देवीला साकडे घातले आणि तो दुष्काळ निवारण्याची विनंती केली. त्यावेळी देवीने पर्जन्यवृष्टी करून धरती पुन्हा हिरवीगार केली. त्यावेळी धरतीवरती विविध पालेभाज्या उगवल्या.

संक्रांतीच्या..

प्राजु ·
मंडळी, सगळ्या मिसळपाव वासियांना मकर संक्रातीच्या हार्दि़क शुभेच्छा..! तिळगुळ खाऊन इथे गोडच बोलू.. शिव्याशाप नको. - प्राजु.

पंचमदांना श्रद्धांजली

विसुनाना ·
आज ४ जानेवारी. महाराष्ट्राचे जावई श्री. राहूल देव बर्मन ऊर्फ पंचमदा यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! एस्.डी. बर्मन, पत्नी मीरा, पुत्र आर्.डी. बर्मन आणि स्नुषा आशा